
गणेशोत्सवाचे वातावरण सर्वत्र बघायला मिळतंय. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांनी रांग लावली होती. शिवाय पुण्यातही दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी आहे. भाविकांमध्ये आज एक उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. दुसरीकडे कोर्टाने परवानगी नाकारून सुद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आज रवाना होणार आहेत. अंतरवाली सराटीमधून ते निघणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यास त्यांना परवानगी नाकारण्यात आलीये. मात्र, मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी ते मराठा बांधवांसह मुंबईला निघतील. आता आरपारची शेवटची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
दीड दिवसाच्या गणपतीपासून सात दिवस व अनंत चतुर्दशीच्य विसर्जन नियोजित. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मुर्तींसाठी समुद्र परिसरात तर इतर घरगुती व लहान मोठ्यांसाठी शहरभर विविध ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले गेले. निर्माल्य जमा करण्यासाठी मोठमोठ्या कुंड्यांची व्यवस्था. सार्वजनिक मंडळाच्या मुर्त्यांसाठी समुद्रकिनाऱ्यावर भरती-ओहोटीची माहिती देणारे फलक.
अकोल्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या एका आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे उकाडा सुरु झाला होता, मात्र आजच्या पावसाने नागिरिकांना दिलासा मिळाला.
जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथील मुस्लिम बांधवांकडून मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलकांना पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. तसेच मनोज जरांगे पाटलांचे स्वागत करण्यात आले.
आज गणरायाचे वाजतगाजत आगमन होतेय अशातच पुण्याच्या ग्रामीण भागात पाऊसाचे आगमन झाले आहे. आज या पावसामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची चांगलीच धावपळ झालेली पहायला मिळाली.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कुटुंबीयांसमवेत मोठ्या आनंदोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भरणे यांनी गणपती बाप्पाच्या भोवती शेतातील विविध फळ भाज्या व कडधान्यांची आरास केली आहे. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सुख समृद्धी यश व चांगले दिवस येऊ दे अशी प्रार्थना गणपती बाप्पाला केली.
पठाणकोटमधील माधोपूर हेडवर्क्सचा पूर दरवाजा तुटला आहे, ज्यामुळे धरणातून येणारे पाणी थेट रावी नदीत जात आहे. त्याच वेळी, माधोपूर हेडवर्क्सच्या गेटची तपासणी करणारे सुमारे 50 कर्मचारी जम्मूच्या लखनपूर बाजूला दुसऱ्या बाजूला अडकले, ज्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
गडचिरोली-नारायणपूर सीमेवर बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार नक्षलवाद्यांना ठार केले. पोलिसांनी ही माहिती दिली.
मंगळवारी दुपारी जम्मूतील वैष्णोदेवीच्या मार्गावर झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत मृतांचा आकडा 32 वर पोहोचला आहे. सततच्या आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान 20 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर वैष्णोदेवी मंदिरातील यात्रा स्थगित करण्यात आली.
मराठा आरक्षासाठी जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आझाद मैदानात बेमुदत आंदोलनावर जरांगे पाटील ठाम आहेत. असं असताना जरांगे पाटलांना फक्त एका दिवसाची परवानगी दिली आहे. त्यावर एका दिवसात मागण्या मान्य करा, कायद्याचं पालन होईल, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंढरपुरातून शेकडो रिक्षा घेऊन आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.
धुळे जिल्ह्यात जल्लोषात गणरायाचे आगमन झाले असून घरगुती गणेश मंडळासह सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती वाजत गाजत दाखल होत आहेत.
राज्यभरात गणरायाचा मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. धाराशिव चा तुळजापुरात आगळावेगळा पद्धतीनं गणरायांचं स्वागत केलं जातं. तुळजापुरातील साळुंखे गल्लीत असलेल्या ऐतिहासिक पुरातन विहिरीत गणरायांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. जय भारत गणेश मंडळाकडून गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो. पुरातन दगडी विहिरीच्या दगडी कमानीत गणराय विराजमान होतात. ऐतिहासिक विहिरीच्या संवर्धनासाठी आम्ही विहिरीत गणपती बसवण्याचा निर्णय घेतलाच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कोथळी येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आहे. त्यांनी दीड दिवसाच्या गणरायाची स्थापना केली आहे. रक्षा खडसे, एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे यांनी सहकुटुंब गणरायाची आरती केली.
गडचिरोली नक्षल विरोधी पोलीस पथक, सी सिक्सटीची भामरागड तालुक्यात मोठी चकमक सुरू आहे. दीड तासापासून माओवादी व सी सिक्सटी जवानांमध्ये चकमक सुरू आहे. परलाकोटा व इंद्रावती नदी परिसरातील भागात ही चकमक सुरू आहे
एकनाथ खडसेंनी सह पत्नीक विधीवत पूजा करत मुक्ताईनगरच्या फार्म हाऊस मध्ये गणरायाची स्थापना केली. महाराष्ट्रात शेतकरी, सह नागरिक महागाईने त्रस्त आहे अशा काळात सर्वांना दिलासा मिळावा अशी प्रार्थना एकनाथ खडसेंनी गणरायाकडे केली.
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या गणपती बाप्पाची उत्साह मिरवणूक सुरू झाली आहे. विष्णू नाद शंक पथकाने जिंकली पुणेकरांची मनं जिंकली. ढोल ताशांच्या गजरात शंक निनादात तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाची मिरवणूक सुरू आहे.
गोदिंयात गणपती बाप्पा मोरया च्या जल्लोषात गणपती बाप्पाचे आगमन झाले. घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणपती बाप्पांच्या मूर्तीला घेऊन जाण्यासाठी भक्तांची लगबग दिसून आली.
दुमदुमणारे ढोल आणि कडाडणारे ताशे पारंपारिक वाद्याच्या तालावर ठेका धरत पुण्यातील ऐतिहासिक व वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सवातील गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलेल पाहायला मिळत आहे. गणेश मंडळांच्या आगमन मिरवणूक मध्ये पारंपरिक वाद्यांचा आनंद घेत या वाद्यांच्या तालावर नागरिकांनी ठेका धरलेला पहायला मिळत आहे.
ठाण्यात उत्साहात गणरायाचा वाजत गाजत आगमन होत आहे. पर्यावरणाला नुकसान होणार नाही यासाठी पर्यावरण पूरक अशाच मूर्ती घ्यावा असे भक्त गणाचे म्हणणे आहे ,तर महाराष्ट्र मध्ये शेतकरी आणि सर्वांना सुखी ठेव अशी गणरायाकडे मागणी केली आहे.
छत्रपती सहकारी कारखाना भवानीनगर येथील कृषी प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडत आहे.
पुणे शहरासह उपगरात पावसाने हजेरी लावलीय. आज पुणे शहर,जिल्हा, आणि ग्रामीण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. तर पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
आता पाटील म्हणतील तसं असा निर्धार नांदेडच्या मराठा बांधवांनी व्यक्त केला. नांदेड मधून गावागावातून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचं नाही, असा निर्धार मराठा बांधवांनी व्यक्त केला.
दुमदुमणारे ढोल आणि कडाडणारे ताशे, पारंपारिक वाद्याच्या तालावर ठेका धरत पुण्यातील ऐतिहासिक व वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सवातील गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलेलं पहायला मिळत आहे. गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचा आनंद घेत या वाद्यांच्या तालावर नागरिकांनी ठेका धरलेला पहायला मिळत आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागणीसाठी मराठा समजाचे मोठे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. जालना अंतरवली सराटी येथून असंख्य कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.
पुण्यातील पाचवा मानाचा गणपती असलेल्या केसरी वाड्यातील गणपती बाप्पाच्या आगमनाची सुरुवात. केसरी वाड्यातील गणपतीच्या आगमनासाठी श्री राम पथकाच्या ढोल ताशा वादन. फुलांनी आकर्षक सजावट केलेल्या पालखी मधुन गोखले वाड्यातुन केसरी वाड्याकडे पाचव्या मनाच्या गणपतीचे प्रस्थान.
हैदराबाद वरून रायपूरकडे प्रवाश्यांना घेऊन जात असलेल्या खासगी बसच्या चालकाचा ट्रकला ओव्हर टेक करताना बस वरून नियंत्रण सुटलं. यात ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना आज कोहमारा-नवेगावबांध मार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली गावाजवळ घडली. या अपघातात बसमधून प्रवास करणारे 6 प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमीत एका 6 महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे.
मिरवणुकीमधील ढोल ताशा पथकाच्या सुरेख वादनाने नागरिकांची मन जिंकली. आगमन मिरवणूक मध्ये पथकाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाल महालामध्ये शाहिस्तेखाना ची बोट छाटलेला व क्रांतीवीर चाफेकर बंधूनी रँडचा वध केलेल्या प्रत्याक्षिकाचे सादरीकरण.
मुंबईत गणेशोत्सव सुरू, पण धार्मिक उत्साहासोबत राजकीय वातावरणही तापलं. मुंबईच्या गिरगाव, दादर, चर्नीरोड परिसरात ठाकरे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी
समाजावर संकट घोंगावत आहेत, काना डोळा करू नका. साथ दिली तर समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. गाड्या व्यवस्थित चालावा, शक्यतो मोटार सायकल वाल्यानी येऊ नये. अटी शर्थी मान्य करून परवानगी भेटणार आहे