
नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. त्यातील राजकीय वादाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकाने मर्यादा ठेवल्या पाहिजेत. साहित्यिकांनीही पक्षांच्या भूमिकांवर प्रतिक्रिया देणं योग्य नसून त्यांनी मर्यादेचं पालन करावं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून केलेलं विधान मूर्खपणाचं आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकेची झोड उठविली. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागल्याने पाणीसाठा पुढील तीन ते चार महिने पुरवावा लागणार आहे. हा पाणीसाठा सहा महिने पुरेल इतका असला तरी पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाप्षीभवन होत असतं. तसंच उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरवावं लागणार आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
भारत-जपानचा सहावा संयुक्त लष्करी सराव ‘धर्म गार्डियन’ सुरू झाला आहे. भारत आणि जपानमधील सहावा संयुक्त लष्करी सराव ‘धर्म गार्डियन’ २४ फेब्रुवारी २०२५ पासून जपानमधील पूर्व फुजी प्रशिक्षण क्षेत्रात सुरू झाला आहे. या वेळी हा सराव पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच कंपनी-स्तरीय सैन्य सहभागी होत आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘काही वर्षांपूर्वी, २०१४ पूर्वी, रेल्वे आणि आसामसाठी फक्त २,२५० कोटी रुपये वाटप करण्यात आले होते. आज, ईशान्येसाठी १०,४०० कोटी रुपयांची तरतूद आहे. काही दिवसांपूर्वी मी गुवाहाटीला आलो तेव्हा, संपूर्ण ईशान्येचा नकाशा पाहिल्यानंतर, आम्ही चार-लाइन, तीन-लाइन आणि दोन-लाइन दुहेरीकरण, तिप्पटीकरण इत्यादी प्रकल्प कसे हाती घेऊ शकतो यावर सविस्तर चर्चा केली. आम्ही नवीन लाईन्स बांधू आणि ईशान्येकडील एकूण युनिटपैकी सुमारे ५० युनिट्समध्ये कार्गो टर्मिनल बनवले जातील जेणेकरून शहरात मालाची वाहतूक सुरळीत होईल.
यमुना प्रदूषणावरील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आता (दिल्लीत) सरकार बदलून सर्व वाद सोडवता येतील. बदललेल्या परिस्थितीत, चांगली अंमलबजावणी शक्य होऊ शकते.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी त्यांचे बंधून धनंजय देशमुख यांनी मस्साजोग येथे अन्नत्याग आंदोलन सुरु केले असून त्यांना भेटण्यासाठी आमदार क्षीरसागर मस्साजोगला आले आहेत.
धनंजय देशमुख यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करीत त्यांच्या उपोषणाच्या आंदोलनाला पाठींबा देत तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली आहे.
बुलढाणा : ज्यांना वाटते रविकांत तुपकर निवडणुकी नंतर संपले. त्यांना म्हणावं या सभागृहात येऊन पहा असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.
विमानतळ पार्किंगबाबत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. विमानतळ पार्किंगबाबत 15 ते 20 निर्णय घेणार असून याबाबत बैठकही घेण्यात येणार असल्याचं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्याच बैठकीमध्ये नाशिकमधील महाकुंभात होणारी प्रचंड गर्दी पाहाता त्याबद्दलही नियोजन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
नवीन वाळू धोरणासंदर्भात 28 फेब्रुवारीला अंतिम सादरीकरण असणार आहे. महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सादरीकरण करणार आहेत. नवीन वाळू धोरण संदर्भात महिनाभरात मागवलेल्या हरकती व सूचनांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रभर झालेल्या विविध पातळीवरील बैठकींचा आढावा देखील घेण्यात येणार आहे. महत्त्वाच्या 167 सुधारणा वाळू धोरण विचारात घेण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
नाशिकच्या कुंभमेळ्यात गर्दी वाढणार असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत गिरीश महाजन बैठकही घेणार आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घ्यावी लागणार असल्याचंही महाजन म्हणाले. दरम्यान याचबाबत नियोजन करण्यासाठी मुंबईत बैठक घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
इंद्रजीत सावंताना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. धमकीबाबतचे संभाषण सावंतांकडून फेसबुकवरही पोस्ट करण्यात आलं आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
गडचिरोली लगतच्या कठानी नदीवरून वाळू घाटामधून खुलेआम तस्करी- जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घातलं लक्ष.
नदीच्या पत्रावर सध्या वाळू तस्करांनी कब्जा केला असून रोज तीनशे बैलगाड्यांची वाळू तस्करी होत असल्याचे समोर आल्याने कारवाई करण्यात आली.
जिल्हा मुख्यालय परिसरात अनेक घरकुलाचे कामं सुरू असून वाळू मिळत नसल्यामुळे तस्करांमार्फत ट्रॅक्टर टिप्परनी वाळू तस्करी करण्यात येत आहे. त्यात बैलगाडाच्या प्रमाण वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालवून वाळू तस्करीवर कारवाई करण्याचे आदेश दिले .
पुण्यातील अलका चौकात संजय राऊतांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे. राऊत यांनी नीलम गोऱ्हेंबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.
भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. परप्रांतीय भंगार व्यावसायिकाने दिलेल्या घोषणांनंतर स्थानिक आक्रमक झाले. स्थानिक प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाई करण्यात आली.
ठाणे येथील भविकाकडून श्री तुळजाभवानी चरणी अर्धा किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे भाविक कुटुंबीयांचा देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. भाविकाने ओळख गुपित ठेवण्याची विनंती केली आहे.
डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपण आल्याची एका व्यक्तीची मंडळाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बहिरेपणाचा बनाव असून जयंती बदनाम करण्याचा डाव आहे. संबंधित व्यक्तीला बहिरेपणा आला नसल्याचा सीसीटीव्ही फुटेज मराठा क्रांती मोर्चाकडून जारी करण्यात आला आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट असा दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता, असा खुलासा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. माझ्यावर माध्यमाचा दबाव होता. मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचे पालन करणं बंधनकारक असतं. त्या नियमांमुळं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला. नैतिकतेचा ही माझ्यावर दबाव होता. सलग चाळीस दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम दिसला असता. हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं, असे ते म्हणाले.
आपल्याकडे मंत्रालयातील 16 फिक्सरची नावे आहेत. त्यातील 13 हे शिंदे गटाची तर उर्वरीत पवार गटाची असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तर राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी फिक्सरचे नाव जाहीर करावीत असे आवाहन त्यांनी केले. तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या निर्णयाबद्दल जाहीर कौतुक सुद्धा केले.
मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सेना अलर्ट झाली आहे. उद्धव सेना 6 मार्च रोजीपासून विभागीय मेळावे होत आहे. विक्रोळी येथे पहिला मेळावा होणार आहे. शिवसैनिक सवाद दौरा असे त्याला नाव देण्यात आले आहे.
सात मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आजपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. तर दोन दिवसांनी पाणी पण त्याग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अतिवृष्टीचे 137 कोटी रुपये जमा झाले. बाधित असलेल्या बाकी शेतकर्यांना ही केवायसी पूर्ण करण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आवाहन केले आहे.
धाराशिव जिल्ह्यात 2024 च्या एप्रिल महिण्यात झालेला आवकाळी पाऊस आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये बाधित एक लाख सहा हजार पाचशे शेतकऱ्यांच्या खात्यावर 137 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तर बाकी बाधित असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
ठाणे पालघर सह संपुर्ण कोकण किनारपट्टीवरील तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता… पुढील तीन दिवसांसाठी कोकण किनारपट्टीवर तापमान वाढीचा यलो अलर्ट जारी… सरासरी तापमानापेक्षा तापमान उद्यापर्यत हे ४ ते ५ डिग्रीने अधिक असणार आहे… उत्तरेकडून येणारे थंड वारे येत नसल्याने तापमानाचा पारा वाढण्याचीच शक्यता… कमाल तापमान २५ तर किमान तापमान ३६ अंशाच्या पुढे जावू शकण्याचा हवामान विभागाचा अंदाज…
हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थानी घेणार होते दर्शन… हिंगोली जिल्ह्यातील इतर कार्यक्रमांना लावणार होते हजेरी… शरद पवार यांचा तिसऱ्यांदा दौरा रद्द… राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील थोड्याच वेळात नांदेड विमानतळावर होणार दाखल… नांदेड विमानतळावरून हिंगोली कडे होणार रवाना
मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट सलग दुसऱ्या दिवशीही वाहतुकीसाठी बंद… वाहतूक नवीन कसारा घाटातून एकेरी मार्गाने वळविली… लतिफवाडी ते घाटणदेवी मंदिरापर्यंत अशी नवीन कसारा घाटातून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू… घाट 8 किमी लांबीचा असून काम सुरू आहे… घाटात दुरुस्तीचे काम सुरू
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र लिहिलं आहे. यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, असं त्यांनी म्हटलंय.
ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर बोराटवाडी ता. माण जिल्हा सातारा येथे आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक झाली आहे. सोमवारी बाजार समितीत जवळपास 13 हजार हरभऱ्याच्या पोत्यांची आवक झाली. हरभऱ्याला सोमवारी किमान 5 हजार 150 ते 5 हजार 700 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. बाजार समितीत कृषी मालाची आवक जास्त असल्याने माल विकायलाही वेळ लागला.
नाशिक- सातपीर दर्गा हटवण्याची प्रक्रिया सुरू असून अपर तहसीलदारांनी प्रस्ताव पाठवला आहे. बेकायदेशीर नोंद रद्द होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रांत अधिकाऱ्यांनी दिले. ७.१६ चौरस मीटर जागेला सातपीर दर्गा नाव लावले. वक्फ बोर्डाच्या नोंदीवर न्यायालयात खटला सुरू आहे.
सध्या हापूस आंब्याची रत्नागिरीच्या बाजारपेठेत फेब्रुवारी महिन्यातच आवक झाली आहे. पण अजूनही सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडणारा आंबा नाही. 1600 ते 2200 रुपये डझन आंबा बाजारात आला आहे. रत्नागिरीच्या बाजारपेठेत नाखरे गावातून आंबा दाखल झाला आहे. होळीच्या अगोदर हापूस बाजारात दाखल झाल्याने खवय्यांची चलती आहे.
कल्याण: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात नवं वळण आलं असून भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला आरोपपत्रात क्लिन चीट देण्यात आली आहे.
गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच सहा राऊंड फायर केले होते. या प्रकरणी उल्हासनगर कोर्टात पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली असून, यात फक्त दोन आरोपींचा समावेश आहे – नागेश बडेराव आणि कुणाल पाटील.