
आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी गर्दी केली आहे. वाढदिवसानिमित्त वांद्र्यासह अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, राज्यात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः रायगड, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, रत्नागिरीच्या कोकण किनारपट्टीसाठी भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) उंच लाटांचा इशारा दिला आहे. २८ जुलैपर्यंत समुद्राला मोठे उधाण येणार आहे. साधारण ४.५ मीटर ते ४.७५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे छोट्या होड्यांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक भागातील शेती हे पाण्याखाली आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबारी होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.
नांदेडमध्ये मराठा समाजाच्या राज्यव्यापी वज्रमुठ बैठकीला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी या वज्रमुठ बैठकीत सहभागी झाले आहेत. प्रवीण गायकवाड, विजयकुमार घाडगे यांच्यावरील हल्ला व मराठा आरक्षण यावर चर्चा सुरू आहे. बैठकीत विचार मंथन करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
कांद्याचे बाजार भाव वाढल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागामार्फत यंदा तीन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असून नाफेड, एनसीसीएफ मार्फत कांद्याची दोन जुलैला खरेदी सुरू झाली आहे. ही कांद्याची खरेदी 28 जुलै पर्यंत पूर्ण करण्याची मुदत कांदा खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थेला देण्यात आली आहे. मात्र कांदा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही बाकी असल्याने नाफेड एनसीसीएफने कांदा खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील आंबाटोली परिसरात रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्याचा बाजूला रेल्वे अंडरग्राउंड लोकांसाठी येजा करण्यासाठी तयार केला. मात्र हाच अंडरग्राउंड लोकांचे डोकेदुखी ठरली आहे. पाऊस आल्यामुळे या रेल्वे अंडरग्राउंड मध्ये दोन मीटर पर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
गोंदिया जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं
काल झालेल्या पावसामुळे शेती पाण्याखाली
शेतीला तळ्याचं स्वरुप, पिकांचं मोठं नुकसान
नुकसानाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी
गोंदिया जिल्ह्यात आज मात्र पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांना दिलासा
कचोरे परिसरात धक्कादायक घटना
टेकडीवरील माती खचल्याने सहा ते सात घरांचे नुकसान
सुदैवाने जीवितहानी नाही
सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे घडली घटना
नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
कित्येक पटीने आनंद झाला आहे. त्यामुळे नक्कीच पुढचा सर्व काळ चांगला होईल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्ताने मातोश्री निवासस्थानी जात शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी जात भेट घेतली. या भेटीनंतर “मला फार आनंद झाला”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची वाढदिवसानिमित्ताने मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी त्यानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला. यावरुन आता चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार बाळा नर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राज ठाकरे यांनी जे काही ट्विट केले आहे ते बरोबर आहे. खरं तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत.
एक दिवस, न्यायालयाच्या माध्यमातून, ती शिवसेनाही आमची होईल”, असा विश्वास बाळा नर यांनी व्यक्त केला.
पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. खडकवासला धरणातून दुपारी 3 पासून 15 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथा परिसर आणि धरण परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने विसर्ग वाढवणार असल्याची माहिती आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ते आनंद व्यक्त करत म्हणाले की “दोन भाऊ भेटले. एकमेकांना प्रेमाचं अलिंगण दिलं. गप्पा झाल्या. शिवसेना प्रमुखांच्या खोलीत व्यंगचित्रावर चर्चा झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बऱ्याच चर्चा झाल्या, दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाहीत. भेटणं गरजेचं आहे. त्यामुळे नातं दृढ होत आहे. याचा आम्हाला आनंद आहे.” असं मत संजय राऊंतानी व्यक्त केलं आहे.
45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का? असा प्रश्न विचारत प्रकाश सोळंकेनी खदखद व्यक्त केली. “माझी जात आडवी येते मी ओबीसी मध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती.”असं मत सोळंके यांनी व्यक्त केलं.
नाशिकमध्ये सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांचा आज वर्धापन दिन सोहळा आहे. कार्यक्रमाला गिरीश महाजन, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत उपस्थित राहिले. वर्धापन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय कामगार मेळावा आयोजित करण्यात आलं आहे.
राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर गेल्याने सर्वांनाच आनंद झाला. ठाकरे बंधूंची ‘मातोश्री’वर 20 मिनीटं चर्चा केली. आता ज्युनिअर ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील संध्याकाळी एकत्र येणार असल्याचं समोर आलं आहे.
पुणे- प्रांजल खेवलकर यांच्या हडपसर इथल्या निवासस्थानी पुणे पोलिसांनी धाड टाकली आहे. पुणे पोलिसांना एक लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह काही हार्ड डिस्क सापडल्याची माहिती आहे. तसंच काही कागदपत्रेदेखील पुणे पोलिसांना सापडले आहेत.
राज ठाकरे मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मला खूप आनंद झाला, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरेंनी मातोश्रीवर त्यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईसुद्धा यावेळी त्यांच्यासोबत आहेत.
जळगावच्या धरणगाव आणि एरंडोल तालुक्यातील कृषी केंद्रांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून अचानक तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मेळावा, विक्रेत्यांनी युरियाची कृत्रिम टंचाई करू नये यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रस्त्यावर युरियाचा ट्रक अडवून ट्रक अडवून युरिया साठ्याची माहिती घेतली.
जिल्ह्यात अनेक रस्ते हे पाण्याखाली पुलावरून पाणी पाहत असल्याने रस्ते बंद… पावसामुळे अनेक शेती पाण्याखाली… धरण साठ्यामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग सुरू…. आमगाव तालुक्यातील जवरी पूल अद्यापही पाण्याखाली…
गोंदिया जिल्ह्यात आज पावसाची विश्रांती आहे. जिल्ह्यात अनेक रस्ते हे पाण्याखाली पुलावरून पाणी पाहत असल्याने रस्ते बंद झाले. पावसामुळे अनेक शेत पाण्याखाली गेल आहे. आमगाव तालुक्यातील जवरी पूल अद्यापही पाण्याखाली आहे.
नाशिक मध्ये झालेल्या GST गुप्तचर विभागाच्या धाडीत सापडले मोठे घबाड सापडले आहे. काल नाशिक रोड भागात राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंता च्या घरी जीएसटी विभागाच्या गुप्तचर खात्याकडून छापेमारी झाली होती. याच छापेमारीत या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात रोकड अधिकाऱ्यांनी जप्त केले.
पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये पकडलेला एक जण क्रिकेट बुकी असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील रेव्ह पार्टीला भल्या पहाटे ३ वाजता सुरुवात झाली. पार्टीमध्ये गांजा आणि कोकेन या अमली पदार्थांचे सेवन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रांजल खेवलकर यांच्यासह ५ जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दोन दिवसांपासून खडसे हे सरकारच्या विरुद्ध खास करुन गिरीश महाजनांच्या विरोधात ठामपणे भूमिका मांडतात. त्यानंतर पुढील २४ तासात ही रेव्ह पार्टीची कारवाई झाली. एकनाथ खडसेंनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले, त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. ही पार्टी, ती पार्टी, मग तुमचं काय सुरु आहे. तुमचा संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही एक रेव्ह पार्टी आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतले आहे. त्यावरून आता वाद रंगला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा तपासाचा भाग आहे, असे महाजन म्हणाले. प्रत्येक वेळीच षडयंत्र कसे असेल, असा सवाल महाजन यांनी केला. 7-8 जणांचे मोबाईल तपासल्यावर समोर येईल. त्यांच्या जावयांना कोणी कडेवर घेतलं आणि तिथे नेऊन ठेवलं, असं तर झालं नाही ना? असा चिमटा महाजनांनी काढला.
जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडत आहे. परतूर आणि मंठा या तालुक्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नद्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे.परतूर तालुक्यातील कुंभारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू असल्याच समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे कुंभारवाडी ते गोळेगाव या रस्त्यावरील ओढ्याला पूर आला आहे आणि या पुराच्या पाण्यातूनच विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. परतुर तालुक्यातील गोळेगाव ते कुंभारवाडी वस्तीवरील पुलावरून सध्या पाणी वाहत आहे. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ या पुलावरून पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहे. या पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे…
काल नाशिक रोड भागात राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंता च्या घरी gst विभागाच्या गुप्तचर खात्याकडून झाली होती छापेमारी… याच छापेमारीत या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात रोकड अधिकाऱ्यांनी केले जप्त… श्रीकांत परे या संशयित युवकाच्या घरी झाली होती छापेमारी… जीएसटी विभागाचा कर चुकवल्याचा अधिकाऱ्यांना होतात संशय… याच संशय प्रकरणी छापेमारी केला असता करोडो रुपयांचे रोकड या संशयीताकडे सापडल्याची माहिती… 2 पेट्या भरून रोकड या युवकाकडे सापडल्याची माहिती
गणेशोत्सवापूर्वी नारळाला उच्चांकी भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये नारळाच्या उत्पादनात २५ टक्क्यांनी घट झाल्यामुळे ही दरवाढ झाली आहे. श्रावण महिन्यातील विविध सणांमुळे नारळांना आधीच मागणी वाढली आहे आणि गणेशोत्सवात तर नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे ही दरवाढ आणखी जाणवत आहे.
राज्य सरकारकडे सुमारे ९० हजार कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याने, ती मिळवण्यासाठी कंत्राटदारांनी आता न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या थकबाकीची लवकर परतफेड व्हावी या मागणीसाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीचे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी पैसे न मिळाल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती, ज्यामुळे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार मोठ्या अडचणीत असल्याचे समोर आले आहे. बीएआयचे अध्यक्ष अजय गुजर यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
बीड शहरातील मुख्य नगर रस्त्याचे काम १५९ कोटी रुपये खर्चून वर्षभरापासून सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यावर खड्डे पडले असून, पावसाच्या पाण्याने ते जलमय झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः, केवळ चार महिन्यांपूर्वीच काम केलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून येत आहेत. हे खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे, ज्यामुळे करडा – गोभणी आणि सरपखेड – धोडप बुद्रुक हे मार्ग गेल्या १२ तासांपासून बंद आहेत. पैनगंगा नदीवर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेल्या पेन टाकळी प्रकल्पात सध्या ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक सातत्याने सुरू असल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे २० सेंटीमीटरने उघडून त्यातून प्रति सेकंद १३३९ क्युसेक पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या पूरस्थितीमुळे प्रशासनाने पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुण्यात हवामानातील बदलांमुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याची माहिती समोर आली आहे. जूनमध्ये १२३ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती, तर २६ जुलैपर्यंत ही संख्या २६२ वर पोहोचली आहे. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळल्यामुळे महापालिकेने गेल्या सात महिन्यांत २ लाख २९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्याचा दावा डॉ. राजेश दिघे यांनी केला आहे.
आज शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्यांचा वाढदिवस आहे. ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी मातोश्री निवासस्थानी वाढदिवस साजरा केला. तर दुसरीकडे, शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनी दापोलीतील त्यांच्या गावी वाढदिवस साजरा करत आहेत.
पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सकाळी ९ वाजेपासून ४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. घाटमाथा आणि धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यता आला आहे.
निळवंडे धरणातून नदीपात्रात सांडव्याद्वारे विसर्ग वाढवून ८५०० क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीपात्रातील सर्व जंगम मालमत्ता, वस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे आणि इतर मानवी वापरासाठी उपयुक्त संसाधने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन केले आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात, राहुरी शहरातील बाजार समिती आवारात सकाळी १० वाजता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे, कारण माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत, तर त्यांचे काका अरुण तनपुरे काही दिवसांपूर्वी राहुरी साखर कारखाना निवडणूक जिंकल्यानंतर अजित पवार गटात सामील झाले आहेत. मेळाव्यानंतर अजित पवार त्यांच्या आजोळ असलेल्या देवळाली प्रवरा गावात कौटुंबिक स्नेह भेट देण्यासाठी जाणार आहेत, आणि त्यानंतर ते पुन्हा नगरकडे रवाना होतील.