
महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरु आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या वर गेले आहे. तसेच विदर्भात पावसाचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस आता देशभर पत्रकार परिषद घेणार आहे. देशातील ५७ ठिकाणी या पत्रकार परिषदा २१ ते २४ एप्रिल दरम्यान घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबईत पवन खेरा पत्रकार परिषद घेणार आहे. जुना पुणे मुंबई महामार्गावरील खंडाळा बोरघाटात विचित्र अपघात झाला. त्या अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला. भाजपने पुन्हा एकदा मनसेला डिवचणारे बॅनर लावले आहे. दादरच्या शिवसेना भवनजवळ भाजपने बॅनरबाजी केली आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
चंद्रपुरात उष्णतेची लाट
सर्वाधिक तापमानाची नोंद
चंद्रपुरात तापमान 45. 6 अंश सेल्सिअसवर
ब्रम्हपुरीचं तापमान 45 अंश सेल्सिअस
झारखंड माओवादी व कोब्रा बटालियनमध्ये तब्बल साडेतीन तास चकमक सुरू होती, या चकमकीत एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवादी संघटनेचा सी.सी सेंट्रल कमिटी सहित आठ माओवादी ठार झाले आहेत.
शरद पवार आणि संजय राऊत हे त्यांच्या राजकीय गरजेपोटी माझ्या शब्दांची कधीही तोडमोड करतील,अशा शब्दात शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटल यांनी टीका केली आहे. भाजपाला पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे,असे पण आपण कधीच बोललो नाही,सध्या एआय आहे,त्यातून शोधून काढा,असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा नाशिक महापालिकेला मोठा दिलासा देत सात पीर दर्गाप्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली
आहे. याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेने कारवाई केल्याने दर्गा ट्रस्टला नव्याने हायकोर्टात दाद मागण्याचा सल्ला न्यायालयाने दिला आहे.
राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला असून पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या 3 जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेलं उजनी धरण एप्रिलच्या मध्यावरच मायनसमध्ये गेलं आहे. आता उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा मायनस 4.73 टक्के असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी तसेच मुख्य कालवा आणि इतर पाणी योजनांद्वारे 7 हजार 510 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होतेय.
पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाबाबत सुनावणी होणार आहे. तनिषा भिसे मृत्यूप्रकरणाबाबत मुंबईत सुनावनी होत आहे. सुनावनीसाठी भिसे कुटुंब मुंबईत आले आहेत. तसेच भिसे कुटुंबीय महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलसमोर सुनावनीसाठी हजर राहिले आहेत. तसेच या प्रकरणात आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास भिसे कुटंबियांनी व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे उबाठा आणि मनसे कार्यकर्त्यांमध्येही याबाबत उत्सुकता आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी देखील आता या दोन भावांनी एकत्र यावं अशी इच्छा आहे. याच संदर्भातील बॅनर आता नाशिकमध्ये लावण्यात आले आहेत. ‘राज ठाकरेंना मातोश्रीचे निमंत्रण द्या’ असे बॅनर लावण्यात आले आहेत. दोंन्ही ठाकरे बंधूंनी आता मतभेद आणि मनभेद विसरून पुन्हा एकत्र यावं याबाबत हे बॅनर लावण्यात आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाळा दराडे यांनी हे बॅनर लावले आहेत.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका अशी सूचना राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना दिली आहे. संवेदनशील विषयावर बोलणं टाळा असंही सांगण्यात आलं आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची आज मुंबईत सुनावणी होणार आहे.
या सुनावणीत डॉ सुश्रुत घैसास आणि तनिशा भिसे यांचं कुटुंब आज महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल समोर सुनावणीसाठी हजर राहणार आहेत.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल समोर भिसे कुटुंबीयांची 1 वाजता सुनावणी पार पडणार असून या सुनावणीसाठी भिसे कुटुंब थोड्याच वेळात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई येथील कार्यालयात येणार आहे.
राहुल गांधी परदेशात जाऊन देशाबद्दल खोटं बोलले – देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.
त्यांनी परदेशात जाऊन भारताची, भारतीय लोकशाहीची बदनामी केली आणि सातत्याने ते अशा प्रकारे बदनामी करतात, हे निंदनीय कृत्य आहे. वारंवार निवडणुकीत हरल्याने त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे. पण
नॅशनल हेरॉड प्रकरणी काँग्रेसने केंद्र सरकार विरुद्ध केलेल्या आंदोलनानंतर आता अमरावतीत काँग्रेस विरोधात भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन सुरू आहे अमरावतीच्या मालटेकडी परिसरात काँग्रेस कार्यालयाच्या जवळच काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
भाजपा युवा मोर्चाच्या आंदोलनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेस आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकर प्रकरणाची पुढील सुनावणी 21 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. मात्र 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला दिले आहेत.
जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम राहील असे न्यायालयाने नमूद केलं.
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात अखेर न्यायायलयाने निकाल दिला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उर्वरीत दोन आरोपींना ७ वर्षांची शिक्षा. कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर या दोघांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोन आरोपीची शिक्षा पूर्ण झाल्याने त्यांना तुरुंगातून सोडण्याचे कोर्टाचे आदेश.
कृषी क्षेत्रात AI वापरासंदर्भात बैठक झाली. कृषी क्षेत्रात AI चा वापर केल्यास पाणी, खंतांचा वापर कमी होतो. 6 पिकांसाठी एआयचा वापर अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
पूजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात. दिल्ली पोलिसांकडून पूजाच्या कोठडीची मागणी. “तुम्ही तिला चौकशीसाठी का बोलवत नाही? का नाही बोलावलं?” न्यायालयाचा सवाल. “आम्हाला कोठडीत चौकशी करायची आहे. सर्वसाधारण चौकशीसाठी बोलवायच नाहीय. खेडकरना अटकेपासून संरक्षण आहे” असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
धुळे- दोंडाईचा येथील गुलमोहर कॉलनी आणि गरीब नवाज कॉलनी परिसरात असलेल्या भंगारच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. रात्री दोन वाजताच्या सुमारास लागलेली आग अजूनही नियंत्रणात आली नाही. दहा तास उलटले तरी देखील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज गोडाऊनच्या मालकांनी व्यक्त केला. रहिवासी भागात असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने आजूबाजूच्या घरांना कुठलेही नुकसान झालेले नाही. परंतु गोडाऊनचं मोठं नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत राहुल गांधींनी टीका केली. अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये बोलताना राहुल गांधींनी जोरदार टीका केली. ‘मतदानाची वेळ संपल्यानंतर 65 लाख मतदारांनी मतदान केलं. असं घडणं अशक्य,’ असा दावा त्यांनी केलाय.
पुण्यातील तरुणीला झिपलाईन साहसी खेळ भोवलाय. झिपलायनिंग करताना 30 फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू झाला. भोर तालुक्यातील वॉटरपार्कमधील ही घटना आहे. तरल अटपाळकर असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे.
“उद्धव ठाकरे हे भविष्याचा विचार करणारे आहेत. सकारात्मकता ठेवा, असा संदेश ठाकरेंनी दिला आहे. राज ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाचं मत व्यक्त केलंय. राज यांच्यानंतर ठाकरेंनीही मत व्यक्त केलंय. दोघांनी मतं व्यक्त केलीत, आता तिसऱ्यानं का बोलावं”, असा सवाल संजय राऊतांनी केला.
“आमच्या शिवसेनेकडून कुणी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कुणी काही बोलू द्या, भूतकाळात डोकवायचं नाही हे आम्ही ठरवलंय. पुढे जाण्यासाठी मागचं सगळं विसरण्याची तयारी असावी”, असंही संजय राऊत म्हणाले.
“उद्धव ठाकरे- राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची भावना आहे. दोन्ही ठाकरेंनी आपल्या भावना मांडल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर शेतात जावं लागेल अशी काहींची भावना आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत काहींना भीती वाटत असेल”, असं संजय राऊत म्हणाले.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने 99 हजारांचा आकडा ओलांडला असून पुन्हा विक्रमी उच्चांकी गाठली आहे. सोन्याच्या दरात ७०० रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर Gst सह 99 हजार 300 रूपयांवर पोहोचले आहेत. जळगावमध्ये सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली असून सोन्याच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दर 99 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात सुद्धा एक हजार रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दराने पुन्हा एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचे दर जीएसटी सहित १ लाख ५०० रुपयांवर पोहोचले आहेत.
पार्थसारथीची ज्युनिअर बिली जीन किंग कप टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली असून १२ ते १७ मे दरम्यान होणार स्पर्धा… पार्थसारथी अरुण मुंढे ही धाराशिव तालुक्यातील हिवर्डा गावची रहिवाशी… कझाकिस्तान येथे होणाऱ्या ज्युनिअर बिली जीन किंग कप या प्रतिष्ठीत टेनिस स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड… पार्थसारथीने राष्ट्रीय स्पर्धेत सलग दोन वेळा १४ वर्ष वयोगटात मिळवले उपविजेतेपद… ती सध्या महाराष्ट्रातील क्रमांक १ ची टेनिसपटू असून तिचा भारतात १६ वर्ष वयोगटात ४ था तर १९ वर्ष वयोगटात १० वा क्रमांक आहे.
ही नव्हे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती… आशा अशाचे बॅनर ठीक ठिकाणी… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावर भाजपकडून ही बॅनरबाजी… हिंदी सक्तीच्या संदर्भात ही बॅनरबाजी
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनलाय… यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय… याची दखल शरद पवारांनी घेतली असून 23 एप्रिल रोजी रांजणगाव मध्ये भेट देणा… पवार निमगाव भोगी,कारेगाव,रामलिंग, या परिसरांना भेट देऊन येथील प्रदूषणाचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधणार.
ठाणे : पोलीस ठाण्यात वर्षभरात 22 गुन्ह्यांची नोंद… दोन समाजात तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे… या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियाद्वारे धमकी देणाऱ्याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली होती….
मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमधून २९ बालकांची सुटका करण्यात आली. संशयास्पदरीत्या वाहतूक करणारा मदरसा शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा शिक्षक मुलांना कुठे घेऊन जात होता, त्याची चौकशी पोलीस करत आहे.
सायन रेल्वेपुलाच्या पुनर्बांधणीच काम हाती घेण्यात आले आहे. या रेल्वे पुलाचा शेवटचा गर्डर रविवारी काढण्यात आले. या कामासाठी काल रविवारी मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलस ते विद्याविहार मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या पुलाच काम कधीपर्यंत पूर्ण होणार या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत.
वाशिम जिल्ह्यातील किन्हीराजा गावात पेढ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘हॉटेल ओंकार’ला आज पहाटे भीषण आग लागून संपूर्ण हॉटेल जळून खाक झालं. ही घटना सकाळी अंदाजे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी ९ मे रोजी सहा तास बंद राहणार आहे. सर्वाधिक व्यस्त विमानतळ अशी मुंबईची ओळख आहे. पावसाळ्यात विमानांचे सुरक्षित लँडिंग व टेक ऑफ होण्याकरिता दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
मुंबईतील दादरमधये भाजपने पुन्हा एकदा मनसेला डिवचणारे बॅनर लावले आहे. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विषयावरुन हे बॅनर लावले आहे. ही नव्हे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती…या आशयाचे बॅनर लावून मनसेला डिवचले आहे.