
अमरावती, चांदूरबाजार, संभाजीनगर, लातूर आणि नांदेड मधील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार आहेत. बच्चू कडूंच्या आंदोलनाला शेतकरी संघटना, महाविकास आघाडीतील अनेक आमदार, खासदार यांच्यासोबतच मनसेनेही चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर पुण्यात साखर महासंघ आणि साखर कारखाने कर्मचारी संघटनांमध्ये बुधवारी 10 टक्के पगारवाढीचा करार संपन्न झाला. दोनशेच्यावर साखर कारखान्यातून काम करणाऱ्या तब्बल सव्वा लाख कामगारांना ही पगारवाढ मिळणार आहे. या 10 टक्के पगारवाढीमुळे साखर उद्योगावर 419 कोटींचा बोजा पडणार आहे. पावसाची देखील मोठी अपडेट समोर येत आहे, नाशिकच्या घाटप्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 31 जुलैपर्यंत शहरासह जिल्ह्यात पावसाचे जोरदार ‘कम बँक’ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
मुंबई अहममदाबाद महामार्गावर रस्ता रोको केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या 17 जणांवर नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्यासह 4 जणांना कोर्टात हजर केले असून, तर 12 जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
दिल्लीतील जेएनयू विद्यापीठीत जेएनयूत कुसुमाग्रज आणि छत्रपती शिवाजी महाराज मराठी अध्यासनाचे केंद्राचे उद्गाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे.
दिल्लीत जेएनयू विद्यापीठात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. मराठी – हिंदी वादातून दिल्ली स्टुडट्स फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेचे आंदोलन कले. मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाले.
बारामतीच्या जिल्हा न्यायालयाने बारामतीतील एकास सुनावली आजन्म करावासाची शिक्षा सुनावली आहे. पाळीव श्वानाने अंगणात विष्ट्टा केल्याच्या रागातून आरोपीने केली एकाची निर्घृण हत्या केली होती.
ग्रुप बुकींगवरील 30 टक्के भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिंदेंनी पंढरपुरात ही घोषणा केली आहे. त्यामुळे ग्रुप बुकिंग करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. “परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भाडेवाढ रद्द करण्याच्या सूचना दिली आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राहुल गांधी यांना नाशिक कोर्टाने स्वातंत्रवीर सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात दिलासा दिला आहे. नाशिक कोर्टाने राहुल गांधी यांना जमीन मंजूर केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी पार पडली. राहुल गांधी या सुनावणीला व्हीडिओ कॉन्परन्सिंगद्वारे उपस्थित होते. श्रीमती नरवडे यांच्या कोर्टाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. 15 हजारांच्या जात मूचलक्यावर जामीन मंजूर केला गेला. याचिकाकर्ता देवेंद्र भुतडा यांच्या तर्फे ऍडव्होकेट मनोज पिंगळे यांनी दावा दाखल केला होता.
दिल्लीतील जे एन यू विद्यापीठात आता मराठी अध्यासन केंद्र सुरु होणार आहे. या केंद्राचा भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेएनयू विद्यापीठात पोहचणार आहेत.
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 300 तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर विना जीएसटी 99 हजार रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर 1 लाख 15 हजार रुपयांवर आले आहेत. सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 300 रुपयांवर पोहोचले होते. सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली होती.
गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर दागिन्यांची खरेदी केली तर घरात बरकत राहते अशी नागरिकांची धारणा आहे. त्यामुळे या दिवशी नागरिक थोडंफार का होईना सोन खरेदी करत असतात. गुरुपुष्यामृत योगाच्या पार्श्वभूमीवर सोन्याने चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी संसदेच्या प्रांगणात सांगितले की, “जेव्हा जेव्हा विरोधी पक्षाचे नेते बोलू इच्छितात तेव्हा त्यांना बोलू दिले जात नाही. आम्ही चर्चेची मागणी करत आहोत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी लंडनमध्ये युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टारमर यांची भेट घेतली.
२३ जुलै रोजी, जन सूराज पक्षाचे संयोजक प्रशांत किशोर आणि त्यांच्या समर्थकांवर बिहार विधानसभेजवळील प्रतिबंधित क्षेत्रात निदर्शने केल्याबद्दल आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पाटणा येथे एफआयआर दाखल करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने एनसीआरमध्ये बीएस VI मानक वाहनांच्या कालबाह्य तारखेशी संबंधित याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली आहे. पेट्रोल वाहनांसाठी आयुर्मान 15 वर्षे आणि डिझेल वाहनांसाठी 10 वर्षे आहे. प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार सरकार त्यात बदल करू शकत नाही, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. न्यायालय आता सोमवारी या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
मनसे नेते अविनाश जाधव ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागला अल्टिमेटम दिला होता. घोडबंदर गायमुख या ठिकाणी खड्डे बुजवले गेले नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना खड्ड्यात घालू असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला होता. आज गायमुख घोडबंदर परिसरातील रस्त्याची पाहणी ठाणे पालिका आणि सार्वजनिक बांधकाम प्रशासन करत आहे.
ठाकरेंचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. सुनील बागुल आणि त्यांचे मामा राजवाडे यांचा रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप कार्यालयात कोर कमिटीच्या बैठकीला बागुल आणि राजवाडे देखील उपस्थित होते. कोर कमिटीच्या बैठकीत आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार आणि माजी आमदार बाळासाहेब सानप उपस्थित होते. रविवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये होणार अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचं समोर आलं आहे.
मीरा भाईंदर इंद्रलोक परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून नवरा-बायकोमध्ये वाद झाले. रागात नवऱ्याने पत्नीचं डोक जमिनीवर आपटून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपीचं नाव शिवकुमार हरिजन असून तो मीरा भाईंदर शहरात एका कॅन्स्ट्राकशन साईडवर कामगार म्हणून काम करतो. त्याच ठिकाणी तो पत्नी सोबत एका झोपडीमध्ये राहत होता. लग्नाला चार वर्ष झाली होती. नवघर पोलिसांकडून तपास करत आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
निवडणूक आयोगाविरोधात आमच्याकडे पुरावे असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.तसेच हे प्रकरण गंभीर असून आम्ही मागे हटणार नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोग काम करत नाही असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोग काम करत नाही , निवडणूक आयोगाविरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. हे प्रकरण गंभीर आहे, आम्ही मागे हटणार नाही असं राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं आहे.
नाशिक – ठाकरेंचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजप कार्यालयात दाखल. सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा रविवारी भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
आज भाजप कार्यालयात कोअर कमिटीच्या बैठकीला बागुल आणि राजवाडे देखील उपस्थित असून या बैठकीत आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार आणि माजी आमदार बाळासाहेब सानप हजर आहेत.
दोन महिने उलटूनही पुरेसा पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून पिक सुकायला लागल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात सर्वत्र अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे मका, कापूस यासह वेगवेगळ्या पिकांची वाढ खुंटली असून पीक वाळत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांची पाने सुकायला लागलेली असून पिकांवर वेगवेगळे रोग पडत असल्याचे चित्र आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरावणीमध्ये शेतकऱ्यांचं चक्का जाम आंदोलन सुरू झालं असून संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी सरकारने कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बैल आणि ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले असून रस्त्यावर पत्त्यांचा डाव मांडून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली असून चक्का जाम आंदोलनामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
उत्तर प्रदेशातील हिंदू सेनेचे अध्यक्ष यति नरसिंहानंद उर्फ यतिराज संत यांनी शिर्डीतील साईबाबांविरोधात अपमानकारक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या विधानामुळे महाराष्ट्रासह देशभरातील साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
या प्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबई फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल एन. कनल यांनी महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री योगेश कदम यांना पत्र लिहून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
हर्षल पाटील यांनी सांगली जिल्ह्या अंतर्गत जलजीवन मिशन चा काम घेतल नाही आहे त्यासंदर्भात कोणताच करारनामा झाला नाही आहे. माध्यमांमध्ये आलेल्या या बातम्या खोट्या आहेत असा खुलासा सांगली जिल्हा परिषदेने केला आहे.
धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे आठ कोटी सोळा लाख थकवले. थकित ऊस बिलाचा प्रश्न घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील साखर आयुक्तांकडे गेले. सात दिवसात उसाची थकीत बिले मिळाली नाही तर साखर आयुक्तलयात आमरण उपोषणाचा इशारा दिला. तानाजी सावंत यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यात एकूण आठ कोटी 16 लाख थकीत असल्याच साखर आयुक्त यांना दिलेल्या पत्रात रणजीत पाटलांकडून माहिती दिली.
मंत्री माणीकराव कोकाटे यांच्यावरील आरोपाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांचे मंत्रिमंडळात बदलाचे संकेत दिले. मंत्रिमंडळात बदल होईल, असं वातावरण सध्या दिसत आहे. काही बदल होतील. मंत्रीमंडळात काही बदल होतील, कारण एनर्जी असलेले मंत्री हवे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना परफॉर्मन्स हवं, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारच्या वतीने चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील टेमुर्डा गावात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. प्रहारचे नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्व आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांचे सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
मुंबई २००६ ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती मिळाली आहे.
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालुक्यातील दुनगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचा रास्ता रोको करण्यात आला. बच्चू कडू यांच्या आवाहनानंतर आज राज्यभरात ठिकठिकाणी प्रहार संघटनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आक्रमक झाले.
गुन्हे दाखल करणाऱ्याला आम्ही घाबरत नाही. भगतसिंग गिरी आता सुरू झाली..शक्तीपीठला 80 हजार कोटी देत आहे. गडचिरोली मधील एका कम्पनी साठी हा महामार्ग बनवला जात आहे. आता न सांगता बच्चू कडू हा मंत्रालयात घुसणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
हर्षल पाटील या कंत्राटदराच्या आत्महत्येवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलही काम नाही तसच त्या योजनेवर कुठलही बिल प्रलंबित नाही. सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलेलं असावं. मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही असे स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.
उज्वल निकम आज घेणार खासदारकीची शपथ. संपूर्ण कुटुंब संसदेच्या दिशेने रवाना झालं आहे. आज आनंद आहे की मराठी माणसांचं माझ्यावर प्रेम आहे ते प्रेम कायम राहो. राष्ट्रपती कोट्यातून नामनिर्देशित करण्यात आलं त्याचा आनंद आहे. ते आजपासून राजकीय क्षेत्रात जातायेत याचा आनंद. निकम यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया
जळगाव शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ८ रुग्ण आढळून आले असून २०० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. अशा गंभीर परिस्थितीत महापालिकेच्या कथित दुर्लक्षावर मात करत माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी संभाजीनगर परिसरात डेंग्यू प्रतिबंधक फवारणीचा पुढाकार घेतला आहे.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानला पुन्हा एकदा बॉम्बने मंदिर उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. bhagvanthmann@yandex.com या ईमेल आयडीवरून ‘भगवंत मान’ नावाखाली साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, भाविक आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ मंदिरातून बाहेर काढण्याची सूचनाही या मेलमध्ये केली होती. या धमकीनंतर साई संस्थानकडून तातडीने शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.
अमरावती: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज राज्यव्यापी ‘चक्काजाम’ आंदोलनाची हाक दिली आहे. अमरावती-परतवाडा रस्त्यावर स्वतः बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले असून, यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. आजच्या आंदोलनात बच्चू कडू अमरावती, चांदूरबाजार, संभाजीनगर, लातूर आणि नांदेड येथील चक्काजाममध्ये स्वतः सहभागी होणार आहेत. त्यांच्या या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना, महाविकास आघाडीतील अनेक आमदार, खासदार तसेच मनसेनेही पाठिंबा दर्शवला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत आज मुस्लिम धर्मगुरू आणि बुद्धिजीवींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. ही बैठक आज सकाळी 8 वाजल्यापासून दिल्लीतील हरियाणा भवन येथे होणार आहे. या बैठकीला संघाचे सर कार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल, रामलाल आणि इंद्रेश कुमार उपस्थित राहणार आहेत. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर इलियासी यांच्यासह अनेक प्रमुख मुस्लिम धर्मगुरूही या चर्चेत सहभागी होणार आहेत. ही बैठक सलोखा आणि परस्पर संवाद वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे राज्य सरकारच्या जल जीवन मिशन योजनेचे दीड कोटी रुपयांचे थकीत बिल मिळत नसल्याने एका तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल पाटील (वय ३५) असे या मृत कंत्राटदाराचे नाव आहे. हर्षल पाटील यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. या दुर्देवी घटनेमुळे तांदुळवाडी गावात आणि जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न आणि त्यातून होणारे असे गंभीर प्रकार यामुळे प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर हर्षल पाटील यांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री, छगन भुजबळ हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी १० वाजता ते भिडे वाड्याला भेट देणार आहेत. भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं काम सुरु आहे. छगन भुजबळ या कामाची पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे, याच ऐतिहासिक ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. स्मारकाच्या कामासोबतच भुजबळ भिडे वाड्याच्या बांधकाम स्थितीचीही पाहणी करणार असल्याची माहिती आहे. या भेटीदरम्यान ते फुले वाड्यालाही भेट देतील.
कृषी केंद्रात अनियमित आढळल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 38 कृषी केंद्रावर कारवाई… कृषी केंद्रात अनियमता आणि जास्त दराने विक्री केल्यामुळे कृषी विभागाने केले परवाने निलंबित..
श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार… तर प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडं राहणार… श्रावणात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन सर्व भाविकांसाठी बंद… आलेल्या प्रत्येक भाविकाला त्र्यंबकेश्वराचं दर्शन व्हावं, यासाठी निर्णय… तर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था.. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राजगिरा लाडूचा प्रसाद मिळणार…
पुणे : मलनिस्सारण विभागाच्या कामात तक्रारीनंतरही सुधारणा होत नसल्याने अधीक्षक अभियंताचे तडकाफडकी बदली. तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्ताने दिला होता… मलनिस्सारण विभागाचे अभियंता संतोष तांदळे यांची पाणी पुरवठा विभागात आयुक्तांनी बदली केली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे… येत्या दोन-तीन दिवसात प्रारूप प्रभाग रचनेचे काम संपणार असून त्याच्यानंतर महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा 4 ऑगस्ट रोजी नगर विकास विभागाला सादर केला जाणार आहे… पुणे महापालिकेमध्ये चार सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहेत 2011 च्या जनगणनेनुसार शहरात 165 नगरसेवक असतील त्यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंग चा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे
मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ता गेला पाण्याखाली… पुलावरून पाणी वाहत असतानाही मुलांना घेऊन नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू… ओढ्याच्या पाण्यातून नागरिक विद्यार्थ्यांना घेऊन मार्ग काढताना आले दिसून… अक्कलकोट तालुक्यात दोन दिवसात 130 मिलिमीटर पावसाची नोंद… अक्कलकोट तालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक शेतात पाणी… या पावसामुळे खरीप हंगामाच्या पिकांना मिळलं जीवदान.