
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्र खवळलेला असून उंच लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून तीन नंबरचा लालबावटा फडकवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व मच्छीमारांनी आपल्या नौका किनारी लावल्या असून समुद्रात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही तासांमध्ये पावसाची आणि वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात आज बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा धडकणार आहे. शेकडो ट्रॅक्टर्ससह हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सुकळी बाई या गावात बच्चू कडू यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा रात्रभर मुक्काम होता. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
ठाण्यात आढळला तब्बल 8 फूटांचा आजगर
नाल्यात आढळला प्रचंड मोठा आजगर
आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाने केली अजगराची सुटका
आजगराची सुटका करून सोडलं सुरक्षित अधिवासात
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतरान गावात मुसळधार पावसाची हजेरी
मुसळधार पावसामुळे पुन्हा शेतात पाणी साचलं
शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका
राज्यात आणखी काही दिवस पावसाची शक्यता
मुंबईतील कबुतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळानं आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. मुंबईतील नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्या जागा कबुतर खान्यांसाठी उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शभूषण गगराणी यांचेकडे केली आहे.
65 वर्षांच्या महिलेवर अत्याचार, करून तिची हत्या
भिवंडी ग्रामीणमधील घटनेनं खळबळ
वयोवृद्ध महिलेवर शेतात अत्याचार नंतर दगडानं ठेचून हत्या
चावेभरे गावच्या हद्दीत घडली घटना
सामूहिक अत्याचार असल्याचा स्थानिकांचा आरोप
परळी तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पावसामुळे उन्हापासून काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र, सततच्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या तालुक्यात कापूस आणि मूग पिकांची काढणी सुरू असून, या पावसाचा त्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते.
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी 9 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय चव्हाण यांना आश्वासन दिले आहे. त्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे मंत्री संजय राठोड आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा आंदोलन विजय चव्हाण यांनी आपला उपोषण मागे घेतलं. येत्या 31 तारखेला बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती उपोषण करते विजय चव्हाण यांनी दिली आहे.
नाशिक पोलीसांनी पीएल या गुन्हेगारी टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रकाश लोंढे या टोळीचे मुख्य सूत्रधार आहेत. टोळीविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी या गंभीर गुन्ह्यांसह 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गेल्या महिन्यात सातपूर परिसरातील गोळीबार प्रकरणी टोळीतील 17 पैकी 13 जण अटकेत आहेत तर प्रकाश लोंढेचा मुलगा सराईत गुन्हेगार भूषण लोंढेसह 4 जण अजून फरार आहेत. मोक्का अंतर्गत कलमं वाढवल्याने आता टोळीची अनाधिकृत संपत्ती आणि ईतर तपास पोलीसांकडून केला जाईल.
धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मुरूम पोलिस ठाणे हद्दीतील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायावर कारवाई करत दोन बांगला देशी तरुणींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तीन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
परभणी – बाबाजानी दुर्रानी यांची काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्तीचे पत्र जाहीर केले आहे. 7 ऑगस्ट रोजी बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आधी शरद पवार तर त्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत.
धाराशिव : देशभरातील तुळजाभवानीच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
धाराशिव- तुळजापूर -सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तुळजाभवानीचे तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर येणार असे परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या वतीने 157 नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाड्या जनतेच्या सेवेसाठी आज पासून दाखल झाल्या . या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलाबा बस आगार येथे संपन्न झाला . नवीन इलेक्ट्रिक बस मध्ये खालील प्रमाणे सोयी सुविधा आहे .या गाड्या मुंबईचया विविध आगारा मधून शुरु होऊन मुंबईकरांचया सुखकर प्रवासासाठी धावणार आहेत .
पुणे : ऑलिम्पिक महासचिव नामदेव शिरगावकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2022 साली गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्स करता महाराष्ट्र शासनाकडून 12 कोटी 45 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र या निधीचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप शिरगावकर यांच्यावर करण्यात आला होता. ऑडिटमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिरगावकर यांच्यावर करण्यात आला आहे.
मोठी बातमी समाोर आली आहे. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बच्चु कडु यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रामगिरी बंगल्याकडे येणारे रस्ते बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आले आहेत.
बाबाजानी दुर्रानी यांची काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी 7 ऑगस्टला काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आधी शरद पवार तर त्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष राहिले होते. निवडणुकीच्या तोंडावर दुर्राणी यांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला ताकद मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
देशभरातील तुळजाभवानीच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रशासनाकडून तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. त्यामुळे आता तुळजाभवानीचे तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. याबाबतची माहिती परिवहनमंत्री तसेच धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे 96 किमी लांबीचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार करण्यात येणार आहे. या लोहमार्गामुळे पंढरपुरासह तुळजापूरही रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.
मला 50 कोटी रणजितसिंह निंबाळकरांकडूनच उसने घ्यावे लागतील, असं उत्तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांनी दिलं आहे. निबांळकरांनी अंधारंवर अब्रुनुकसानीचा दावा केला होता. या दाव्यावरुन अंधारेंनी हे उत्तर दिलंय.
परभणीत शेतकरी संतापलेले पाहायला मिळाले. संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी दगड मारून फोडली. जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्याची प्रकृती सिडनीच्या रुग्णालयात स्थिर आहे.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची रचना, संदर्भ अटी आणि कालावधी पंतप्रधानांनी मंजूर केला आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. आयोगाच्या शिफारशीमध्ये संरक्षण सेवा कर्मचाऱ्यांसह सुमारे 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि जवळजवळ 69 लाख पेन्शनधारकांचा समावेश असेल.”
#WATCH | Delhi: The Union Cabinet, chaired by PM Modi, approved the Terms of Reference of the 8th Central Pay Commission.
Union Minister Ashwini Vaishnaw says, “The composition, the terms of reference, and the time period of the 8th Central Pay Commission have been approved by… pic.twitter.com/srQ5UYMk9N
— ANI (@ANI) October 28, 2025
बंगळुरूमधील पोलिसांनी ब्लिंकिट डिलिव्हरी एजंट आणि विद्यार्थ्याला ब्राझिलियन मॉडेलची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मॉडेलच्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या कृत्याची पुष्टी झाली असून आरोपीविरुद्ध बीएनएस 2023 च्या कलम75(1) आणि 46 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत सांगितले की, “महायुती सर्व निवडणुका जिंकणार आहे. त्यांचे (विरोधी पक्षाचे) सरकार हे स्थगितीचे सरकार आहे आणि आमचे सरकार प्रगतीचे सरकार आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षात आम्ही केलेले सर्व काम जनतेसमोर आहे. त्यांना (विरोधी पक्षाला) त्यांचा पराभव कळला आहे. आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत आणि ते त्यांच्या पराभवाची तयारी करत आहेत.”
बजरंग सोनवणे अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत. बजरंग सोनवणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा निर्माण झाल्या आहेत.
बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. कर्ज माफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दिल्लीत युवा कॉंग्रेसने आंदोलन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ‘बोगस सरकारचे बोगस मतदार’ या आशयाने आदित्य ठाकरे यांचे मतदार याद्यांमधील घोळाबाबत सादरीकरण पार पडले. ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी सादरीकरण केले. वरळी मतदार संघात देखील बोगस मतदान झाल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली. दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं,अगदी तशाच प्रकारे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचा सादरीकरण आदित्य ठाकरेंनी केले. त्यावरून फडणवीसांनी हा टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटातून रामदास पाटील सुमठाणकर, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार याच्यासह अनेक माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य करणार काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश होणार.
शिर्डीतील राहाता शिवानजीक पडक्या घरात आढळला 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह. तरुणाच्या अंगावर मारहाणीचे खुना असल्याने पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार विकी सुरेश भालेराव (वय 30) राहणार राहाता असे मृत तरूणाचे नाव.
शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र चालू करून अतिवृष्टीत खराब झालेले सोयाबीन हमीभावाने खरेदी करा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
शिवसेना शिंदे गटाला रायगडमध्ये मोठा धक्का. शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे पाचशेहून अधिक कार्यकर्ते फोडून आज अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. अजित दादांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश होणार आहे.
महाविकास आघाडीचे आणि मनसे नेते मंगळवारी दुपारी 12.30 वाजता मुंबई पोलीस आयुक्ताची भेट घेणार आहे. मोर्च्याच्या परवानगीविषयी पोलीस आयुक्ताशी नेते चर्चा करणार आहे. तसेच मोर्चाचा परवानगीबाबत नेत्यांच्यावतीने मुंबई पोलिसांना पत्र दिल जाणार आहे. या शिष्टमंडळात ठाकरेंच्या सेनेचे, मनसेचे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शेकाप आणि इतर पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्चासंदर्भात ही भेट असेल.
राज्यभरातले सर्व कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांनी आज एक दिवसीय बंद पुकारला आहे या एकदिवसीय बंदमध्ये राज्यभरातील 85 हजार बियाणे विक्रेते व कृषी केंद्र चालक सहभागी झाले असून सर्व दुकाने बंद आहेत. शासनाच्या साथी पोर्टल फेज 2 वापरण्याच्या धोरणाविरोधात कृषी केंद्र चालक तसेच बियाणे विक्रेत्यांकडून आज बंद पुकारण्यात आला आहे.या एकदिवसीय बंद मध्ये जळगाव जिल्ह्यातील 3 हजार 500 कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेते सहभागी झाले असून बंद पाळला आहे
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात २३० कोटी रुपये आलेत कुठून असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी विचारला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला धंगेकर आले आहेत. आपण कोणत्याही पक्षाविरोधात नाही तर प्रवृत्तीविरोधात असल्याचे धंगेकर म्हणाले. बढेकर, गोखले बिल्डरच्या ऑडिटची मागणी त्यांनी यावेळी केली.
परराज्यातून रिव्हॉल्व्हर खरेदी करून सांगलीच्या मिरजेत विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्याकडून 5 पिस्तुल आणि 12 जिवंत काडतुसे,असे करण्यात आली आहेत.मिरज शहरामध्ये तरुण रिवाल्वर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे 5 गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे यावेळी सापडली.दोघांच्याकडे अधिक चौकशी केली असता मध्य प्रदेश मधून रिव्हॉल्व्हर खरेदी करून ती विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी मध्यप्रदेश मधील मुख्य सूत्रधार व मिरज तालुक्यातील दोघासह तिघांवर मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी मोठे आवाहन केले आहे. सगळ्या शेतकऱ्यांना माझा आवाहन आहे कलेक्टर तुम्हाला मदत करू शकतो का ? तर माझं म्हणणं नाही.पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत नाही, दुखणं कुठे आणि औषध तिसरीकडे ते दुखणं कसं बरं होईल.ज्याला तुम्ही सत्तेवर बसवले तुम्हाला मदत द्यायची का नाही द्यायची हे सत्तेवर बसलेल्यांनी ठरवल्याशिवाय अधिकारी कुठून मदत देणार.गाड्या फोडायच्या न सगळे आमदार, खासदार सत्ताधारी पक्ष कोण कोण आहे, शिवसेना एकनाथ शिंदे सत्ताधारी आहे, अजित पवारांचा पक्ष सत्ताधारी आहे, भाजप सत्ताधारी आहे या पक्षांच्या नेत्याच्या गाड्या फोडांन तुम्हाला न्याय मिळेल असे आंबेडकर म्हणाले.
मराठा समाजातला एक वर्ग निजामी मराठा आहे आणि एक रयतेतील मराठा आहे.हे जोपर्यंत मराठा समाज ऐकत नाही तोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही.निजामी मराठे निजामाबरोबर राहिले आहेत रयतेतील मराठी शिवाजी महाराजांसोबत राहिले आहेत.
सोळाव्या शतकातील भांडण 22 व्या शतकात सुद्धा चालत आहे अशी परिस्थिती आहे. सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा आहे, निजामी मराठा हा रयतेतील मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेत नाही. लग्नाच्या भाषेत बोलायचं झालं तर जोपर्यंत तो निजामी मराठ्या कडून फारकत घेत नाही तोपर्यंत रयतेतील मराठ्याला आरक्षण मिळणार नाही आणि न्यायही मिळणार नाही असे मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.
एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी साठी आलेले चोरटे परिसरातील एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. पहाटे एक वाजून 54 मिनिटांनी दुचाकीवरून चोरटे करण्यासाठी आल्याचे दिसत आहे. त्यानंतर पुन्हा तीन वाजेच्या सुमारास चोरटे चोरी केल्यानंतर तीन ते चार बॅग सोबत घेऊन जाताना दिसत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) १ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या संयुक्त मोर्चासाठी नाशिकमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरासह संपूर्ण जिल्हाभरात मनसेकडून मोठमोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरच्या माध्यमातून मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांना मोर्चासाठी मुंबईत येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या नाशिकमध्ये सर्वत्र संयुक्त मोर्चाचे ‘चला मुंबई’ असे बॅनर दिसत आहे. यामुळे शहरात ठाकरेंच्या सेनेपेक्षाही मनसेच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. बैठका झाल्यानंतर लगेचच मनसेने ही बॅनरबाजी सुरू केल्याने, मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसे पूर्ण ताकद लावत असल्याचे दिसत आहे.
माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. आम्हाला मुंबईत बैठकीसाठी बोलावून अटक केली असती, हा त्यांचा नेम होता, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना आंदोलन सोडून बैठकीला जाणं शक्य नाही. आतापर्यंत अनेक बैठका होऊनही काही निष्पन्न झाले नाही, त्यामुळे आंदोलनाच्या दिवशीच बैठक का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने मुंबईऐवजी वर्ध्यात आंदोलनाच्या ठिकाणी यावे आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
फलटण (सातारा) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. बीड ते परळी या प्रमुख मार्गावर वडवणी आणि परिसरातील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामध्ये डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनीही सहभाग घेतला होता. तसेच, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे अनेक कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी झाले होते. आरोपींना त्वरित अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
नागपूर येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयातील व्हायरल झालेल्या लावणीच्या व्हिडिओवरून निर्माण झालेल्या वादावर नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड भाऊंनाच चौफुला फार आवडत असावा किंवा कावीळ झाल्यानंतर जसं पिवळं दिसतं, तसं त्यांना ते दिसलं असेल. सुप्रिया ताईंना सांगायचे आहे, कदाचित ती जागा चुकली असेल, पण कार्यकर्त्यांचा हेतू चुकला नाही. आमचं ते खाजगी कार्यालय होते. कौटुंबिक मिलन आणि मनोरंजन कार्यक्रम सुरू होता. आमच्या पक्षाची काळजी सुप्रिया सुळे किंवा जितेंद्र आव्हाड यांनी करू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी अद्यापही साचून असल्याने मक्याच्या शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतात उभे असलेले पीक आणि काढणी करून ठेवलेला मका पूर्णपणे पाण्यात भिजल्यामुळे मका उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक आणि काढणी केलेला माल नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज दुपारी फलटण पोलीस प्रशांत बनकरला फलटण कोर्टात हजर करणार… प्रशांत बनकर डॉक्टर महिलेच्या आत्महत्या करण्यापूर्वी सातत्याने संपर्कात होता… आत्महत्यापूर्वी महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला आत्महत्या करत असल्याची माहिती देखील दिली होती.. आज पोलीस प्रशांत बनकरची पोलीस कोठडी वाढवून मागणार
नारायण राणे यांचा आज दुपारी दोन वाजता जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम चिपळूण शहरात पार पडणार असून, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी, मागण्या आणि विकासकामांबाबत थेट संवाद साधण्यासाठी हा दरबार घेण्यात येत आहे. जनता दरबारानंतर नारायण राणे हे पत्रकार परिषद घेणार आहेत.
बीडच्या वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरने सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून केली होती आत्महत्या… काल सर्व पक्ष संघटनांनी वडवणी शहर बंदचं केलं होतं आवाहन… आज बंद दरम्यान मोर्चा आणि रस्ता रोको केला जाणार आहे… वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात होणार रस्ता रोको…
बाबरी प्रकरणानंतर देशभरात बाळासाहेबांची लाट होती… वाजपेयींनी बाळासाहेबांना निवडणुका न लढण्यासाठी विनंती केली… मतांचं विभाजन होईल अंसं वाजपेयींचं मत होतं… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी पाठिंबा जाहीर केला पाठिंबा… पाठिंबा जाहीर करत आंनोदलनात सहभाग… हिंगणघाट परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची अतुल वांदिले यांची माहिती…
एकनाथ खडसे यांचं चोरट्यांनी घर फोडलं. शिवराम नगर येथील घरी ही चोरी झाल्याची घटना. खडसे बाहेरगावी दिवाळीनिमित्त गेले असतानाही चोरी झाल्याची माहिती
स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले बॅनर काढण्याचे आदेश. नाशिक शहर पोलिसांनी गुंडा विरोधात राबविलेल्या मोहिमेनंतर पोलिसांच्या समर्थनार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करणारे लावण्यात आले होते बॅनर. पोलिसांच्या कारवाईमुळे सर्वसामान्य नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेक संघटनांकडून पोलिसांना पाठिंबा दर्शविण्यासाठी लावण्यात आले होते बॅनर
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका आधी कॉंग्रेसला मोठा झटका. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुंबई बाजार समिती संचालक प्रवीण देशमुख बांधानार हातावर घड्याळ. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत 30 तारखेला यवतमाळ मध्ये अजित पवार च्या उपस्थितीत करणार प्रवेश
जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बेमोसमी पावसाचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. जळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा , ममुराबाद या गावांमध्ये बे – मोसमी पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे…
4-5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो नंतर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर जाणार आहे.
आमच्यासोबत अनेक दिव्यांग लोक आहेत, त्यामुळे पोलिस बळ वापरताना काळजी घ्या. लेखी मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
कल्याणमध्ये दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. 50 रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. नंतर बैलासमोर आला म्हणून भर रस्त्यात राडा घालण्यात आला. कल्याणमधल्या कोळसेवाडी-काटेमांवली रोड परिसरातील ही धक्कादायक घटना आहे.
बैलासमोर आल्याने एका व्यक्तीला चार-पाच जणांनी मिळून भररस्त्यात मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप जर मागत असेल तर अर्धी टर्म आम्ही देऊ शकतो, परंतु पहिली टर्म शिवसेनेची आणि दुसरी टर्म भाजपची असेल, असं विधान जालना महापालिकेच्या महापौर पदावरून आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं. विष्णू पाचफुले शिवसेनेचा पहिला महापौर होईल असं म्हणत अर्जुन खोतकर यांच्याकडून उमेदवार जाहीर करण्या आला. “आम्ही दोन पावलं पुढे टाकलेले आहेत आणि अजूनही दोन टाकू, त्यामुळे भाजपने या बाबींचा विचार करावा. नाही केला तर आम्ही ताकदीने लढणार,” असा इशारा खोतकरांनी दिला.
माजी नगरसेवक प्रकाश लोंढे टोळीवर अखेर मकोका लावण्यात आला आहे. प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे सह 17 जणांवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांना अडवून पैसे मागणे, दुकानदारांकडून खंडणी गोळा करणे , मारहाण करणे, गोळीबार, जमिनीचा ताबा देण्यासाठी खंडणी मागणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लोंढे पिता-पुत्रांसह टोळीतील सदस्यांनी संघटितपणे विविध गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
येत्या 1 नोव्हेंबरपासून नाशिकमध्ये रणजी क्रिकेटचे सामने रंगणार आहेत. रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाडसह स्टार खेळाडू चमकणार आहेत. महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा रणजी ट्रॉफीचा सामना नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. एक ते चार नोव्हेंबर दरम्यान चार दिवसीय सामना नाशिकमध्ये रंगणार आहे.
“युती होईलच अशी अपेक्षा करूया, नाही झाली तर आपण आपल्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकवल्या शिवाय शांत बसायचं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती म्हणून लढण्यासाठी आम्ही दोन पावलं पुढे टाकली आहेत. आम्हाला शिवसेना म्हणून लढायचं आणि युती म्हणून लढायचं, परंतु शेवटी हे काय बोलतात मला माहित नाही. सर्वांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर सुद्धा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हा संकल्प आम्ही केलाय,” असं आमदार अर्जुन खोतकर कार्यकर्त्यांना म्हणाले.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्र खवळलेला असून उंच लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून तीन नंबरचा लालबावटा फडकवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व मच्छीमारांनी आपल्या नौका किनारी लावल्या असून समुद्रात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही तासांमध्ये पावसाची आणि वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आज मुंबईतील हवामानात चढ-उतार दिसून येणार आहे. सकाळच्या सुमारास काही भागांत उन्हाची तीव्रता जाणवेल. तर दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने आज, 28 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात आज बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा धडकणार आहे. शेकडो ट्रॅक्टर्ससह हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सुकळी बाई या गावात बच्चू कडू यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा रात्रभर मुक्काम होता. नऊ वाजता बच्चू कडूंची पत्रकार परिषद होणार आहे.