Maharashtra Assembly Session Live : वंदे मातरमवरील चर्चेचा निवडणूक हा हेतू : प्रियंका गांधी

देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Assembly Session Live : वंदे मातरमवरील चर्चेचा निवडणूक हा हेतू : प्रियंका गांधी
Big Breaking
| Edited By: | Updated on: Dec 08, 2025 | 11:30 PM

आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार अशा मुद्यांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच चार्टर विमानातून प्रवास केला. दोघेही एकाच विमानाने नागपूरला आले. महायुतीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये अचानक मनोमीलन झाल्याचं चित्र पहायला मिळालं. धोबतोला गावात बिअर बारविरोधात आंदोलन पेटले. महिलांचे सलग 11व्या दिवशी रस्त्यावर ठिय्या. मुख्य रस्त्यावर सुरू झालेल्या बारमुळे महिलांची असुरक्षितता वाढली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचीही चिंता. आंदोलनात सोबत बसू असं आश्वासन देऊनही आमदार गैरहजर. आंदोलनकर्त्या महिलांचा आरोप. बारला परवानगी आणि ग्रामस्थांचा विरोध आहे. बार तात्काळ बंद करा, महिलांचा ठाम पवित्रा. आता प्रशासनाची भूमिका महत्वाची.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Dec 2025 06:54 PM (IST)

    नायलॉन मांजा विकणाऱ्या तिघांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केली अटक

    छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आता नायलॉन मांजा विकणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. नायलॉन मांजामुळे गेल्या आठ दिवसांत सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत.  एखाद्या मृत्यूस हा नायलॉन मांजा कारणीभूत ठरू शकतो. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संजय नगर आणि सातारा भागातून बंदी असलेले नायलॉन मांजाचे 55 गट्टू जप्त केले. नायलॉन मांजा विकणारे आरोपी महिला रिजवाना निसार शेख, शेख फेरोज शेख हबीब आणि इस्माईल शेख या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे, हे तिघे सध्या पोलीस कोठडीत आहेत.

  • 08 Dec 2025 06:46 PM (IST)

    परंडा स्ट्राँगरूमभोवती राजकीय पक्षांचा पहारा, पोलिसांचाही तगडा बंदोबस्त

    धाराशिव जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. पण मतमोजणी लांबल्याने धाकधूक वाढली आहे. असं असताना परंडा नगरपालिकेतही उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर तर स्थानिक आघाडी आणि माजी आमदार राहुल मोटे गटाचे उमेदवार विश्वजीत पाटील यांच्यामध्ये लढत आहे. शिंदे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची लढाई असल्याने स्ट्राँगरूमभोवती शिंदे सेनेचा पहारा पाहायला मिळाला.

  • 08 Dec 2025 06:37 PM (IST)

    नालासोपाऱ्यात 5 दिवसापासून बेपत्ता मुलाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला

    नालासोपाऱ्यात 5 दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या मुलाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे. सोसायटीमध्ये दुर्गंधी सुटल्याने, पोलिसांना बोलावून शोध घेतला असता त्याठिकाणी मुलाचा मृतदेह मिळाला आहे. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलीस याचा तपास करीत आहेत. मेहराज शेख असे मृत 8 वर्षाच्या मुलाचे नाव असून तो इयत्ता तिसरीत शिकत होता. नालासोपारा पश्चिमेच्या टाकीपाडा येथील करारी बाग परिसरातील हयात मंजिल या इमारतीच्या तळमजल्यावरील इमारतीच्या पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह सापडलयाने खळबळ माजली आहे

  • 08 Dec 2025 06:26 PM (IST)

    आसारामचा जामीन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    सर्वोच्च न्यायालयाने आसारामचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. अल्पवयीन पीडितेने जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने अपीलची जलद सुनावणी करण्याचे निर्देश दिले. नोव्हेंबरमध्ये, गुजरात उच्च न्यायालयाने 2013 च्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.

  • 08 Dec 2025 06:06 PM (IST)

    वंदे मातरमवरील चर्चेचा निवडणूक हा हेतू : प्रियंका गांधी

    वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार असल्याने या चर्चेचे निवडणूक हेतू आहे. प्रियांका म्हणाल्या की, वंदे मातरम देशाच्या प्रत्येक कणात जिवंत आहे. ही चर्चा देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे.

  • 08 Dec 2025 05:59 PM (IST)

    बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांची एकहाती सत्ता

    बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांची एकहाती सत्ता

    18 पैकी 18 जागेवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार विजयी

    विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही

    18 जागांपैकी 16 जागांवर झाली होती निवडणूक 2 उमेदवार यांची बिनविरोध निवड

    माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत, फटाके फोडत जल्लोष

  • 08 Dec 2025 05:58 PM (IST)

    शिवसेना ठाकरे गटाचे 13 आमदार संपर्कात, संजय शिरसाट यांचा दावा

    शिवसेना ठाकरे गटाचे 13 आमदार संपर्कात, संजय शिरसाट यांचा दावा

    टिव्ही 9 मराठीला संजय शिरसाट यांची माहीती

    त्या सगळ्या आमदारांची नावे माझ्याकडे , वेळ आल्यावर सांगेन – संजय शिरसाट

    शिवसेना ठाकरे गटाच्या  कार्यपद्धतीला वैतागून शिंदेंच्या शिवसेनेत येण्याचा आमदारांचा मानस – शिरसाट

  • 08 Dec 2025 05:42 PM (IST)

    नागपूरच्या पारडी परिसरात बिबट्या वावर

    नागपूरच्या पारडी परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ व्हायरल

    बिबट्या रस्ता क्रॉस करताना व्हिडिओमध्ये कैद

    काही दिवसांपूर्वी याच भागात एका घरात शिरला होता बिबट्या

    आज पुन्हा त्याच परिसरात बिबट्याचे दर्शन

    नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

     

  • 08 Dec 2025 05:39 PM (IST)

    रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर एक तास रास्तारोको

    गावाला जोडणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करा या मागणीसाठी बीडच्या वांगी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बीड – परळी राष्ट्रीय महामार्गावर घोडका राजुरी फाटा या ठिकाणी तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

  • 08 Dec 2025 05:00 PM (IST)

    मनोज जरांगे यांचा चिलट आणि माकड म्हणून उल्लेख कुणी केला?

    जालन्यात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांचा चिलट आणि माकड म्हणून उल्लेख केला आहे. मनोज जरांगे नावाचा चीलट आता बावचळलेलं आहे, त्याच्या कर्मानेच ते मरणार आहे. जरांगे नावाच्या माकडाची एसआयटी पुन्हा लागली पाहिजे. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.

  • 08 Dec 2025 04:18 PM (IST)

    शिवसेना ठाकरे गटाचे 10 पेक्षा जास्त आमदार माझ्या संपर्कात, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा

    शिवसेना ठाकरे गटाचे 13 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांनी tv9 मराठीला याबाबतची माहिती दिली आहे. त्या सर्व आमदारांची नावं माझ्याकडे आहेत. मी आल्यावर वेळ सांगेन, असं संजय शिरसाट म्हणाले.

  • 08 Dec 2025 04:14 PM (IST)

    गोंदियाच्या स्ट्राँग रूमला कडेकोट सुरक्षा, 37 SRPF आणि 35 पोलीस जवान तैनात

    गोंदियाच्या स्ट्राँग रूमबाहेर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. या स्ट्राँग रुमबाहेर 37 SRPF आणि 35 पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत. पॉलिटेक्निक कॉलेज स्ट्राँग रूमभोवती त्रिस्तरीय बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

    ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी 24 तास CCTV चा पाहरा आहे. तसेच अनधिकृत प्रवेशावर कडक बंदी आहे. दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायती निवडणूक मतदानानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्ट्राँग रूमवर पोलिस सतर्क झाले आहे.

  • 08 Dec 2025 04:10 PM (IST)

    बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांची एकहाती सत्ता

    बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या बाजार समितीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांची एकहाती सत्ता आली आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या 18 ही उमेदवारांचा विजय झाला आहे. तर विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. 18 जागांपैकी 16 जागांवर निवडणूक झाली होती. तर 2 उमेदवार यांची बिनविरोध निवड झाली होती.

  • 08 Dec 2025 03:50 PM (IST)

    नागपूरच्या पारडी परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ व्हायरल

    बिबट्या पारडी रस्ता क्रॉस करताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे. काही दिवस पूर्वी याच भागात एका घरात बिबट्या शिरला होता, आज पुन्हा त्याच परिसरात बिबट्याचे दर्शन. वन विभागाची चमू रेस्क्यू साठी पोहोचली

  • 08 Dec 2025 03:40 PM (IST)

    शिवसेना मंत्री आणि आमदारांची आज नागपुरात विशेष बैठक

    पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन. अधिवेशनाच्या कामकाजाबाबत उपमुख्यमंत्री शिंदे शिवसेना आमदारांशी संवाद साधणार. उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री ७ वाजता होणार बैठक

  • 08 Dec 2025 03:30 PM (IST)

    तपोवनमधील वृक्षतोडीला बीड मधील वृक्षप्रेमींचा विरोध

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये 7 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तीस लाख वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड व महा इव्हेंट प्रशासनाने केला होता. बीड शहरातील खंडेश्वरी दीपमाळ परिसरात स्वतः अजित पवार यांनी पिंपळ आणि वडाचे झाड लावले होते. आज त्या ठिकाणी फक्त वाळलेल्या झाडाच्या काड्या उरल्या आहेत.

  • 08 Dec 2025 03:20 PM (IST)

    पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यातील बैठक निष्फळ

    पालिका प्रशासनाकडून झाडांच्या बाबत कोणतीही योग्य माहिती मिळाली नसल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप. एक्झिबिशन सेंटर साठी झाडं तोडणार नसल्याचा मनपा आयुक्तांकडून खुलासा. मात्र त्याबाबतचा जीआर काढण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी. बैठक निष्फळ झाल्याने आंदोलन सुरूच राहण्याच्या मार्गावर

  • 08 Dec 2025 03:10 PM (IST)

    एकाच दिवसात जवळपास 2000 हजार इच्छुकांना अर्ज वाटप..

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी भारतीय जनता पार्टीने इच्छुकांना अर्ज वाटप सुरु करण्यात आलीय. एकाच दिवसात जवळपास 2000 हजार इच्छुकांना आज अर्ज वाटप करण्यात आलीय. भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुकांचे प्रयत्न सुरू असून..

  • 08 Dec 2025 03:04 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये SDPI संघटनेकडून रेल रोको

    छत्रपती संभाजीनगरमध्ये SDPI संघटनेकडून रेल रोको आंदोलन करण्यात आले आहे. संभाजीनगर रेल्वे स्थानकातील बोर्डवर उर्दूत नाव लिहा अशी मागणी केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

     

     

  • 08 Dec 2025 02:53 PM (IST)

    उच्च जातीचे नाव काय? 8 वीच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन सराव परिक्षेत प्रश्न

    उच्च जातीचे नाव काय, हा प्रश्न 8 वीच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन सराव परिक्षेत प्रश्न आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची आमदार विक्रम काळेंची मागणी आहे.

  • 08 Dec 2025 02:24 PM (IST)

    कोल्हापूरच्या पिंपळगावमधील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयावरून वाद

    कोल्हापूरच्या पिंपळगावमधील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयावरून वाद सुरु. ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी सही करून हा प्रस्ताव मंजूर केला त्या अधिकाऱ्यांनी येऊन इथे पाहणी करावी अशी मागणी तेथील स्थानिकांनी केली आहे.

     

     

  • 08 Dec 2025 02:11 PM (IST)

    मविआ नेते विधानसभा अध्यक्ष सभापतींची उद्या (9 डिसेंबर 2025) भेट घेणार

    मविआ नेते विधानसभा अध्यक्ष सभापतींची उद्या (9 डिसेंबर 2025) भेट घेणार आहेत. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत भेटणार आहे. आजच्या मविआच्या बैठकीतही नेत्यांची विरोधी पक्षनेत्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

     

  • 08 Dec 2025 01:55 PM (IST)

    सरकारला विरोधी पक्ष नेता नेमयाचा नाही- जयंत पाटील

    “सरकारला विरोधी पक्ष नेता नेमयाचा नाही. आज विरोधी पक्ष नेत्याची निवड व्हायला हवी होती. विरोधी पक्ष नेता नसेल तर सरकारला बरं असेल. किमान 2 आठवडे अधिवेशन चालवायला पाहिजे होतं. विदर्भातील जनतेचे प्रश्न अधिवेशनात मांडले जात नाहीत,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

  • 08 Dec 2025 01:45 PM (IST)

    विलेपार्लेमधल्या कॉसमॉस बँकेजवळ इलेक्ट्रिक सबस्टेशनला आग

    विलेपार्ले पूर्व इथल्या हनुमान रोड कॉसमॉस बँकेजवळ इलेक्ट्रिक सबस्टेशनला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली असून या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.

  • 08 Dec 2025 01:34 PM (IST)

     कर्नाटक ते महाराष्ट्र बस वाहतूक तात्पुरती बंद

    बेळगाव अधिवेशनादरम्यान गोंधळ निर्माण झाल्याने कर्नाटक ते महाराष्ट्र बस वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरात कर्नाटक बसवर एमईएसकडून निषेध करण्यात आला. महाराष्ट्रात जाणारी केएसआरटीसी बस वाहतूक बंद करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी बस स्थानकापर्यंतच वाहतूक सुरू आहे.

    निपाणी बस स्थानकावर केएसआरटीसी बस थांबल्या आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीमुळे बस वाहतूक बंद करण्यात आली. महाराष्ट्रातील कोल्हापुरात जाणारी बस वाहतूक बंद झाल्यानंतर प्रवाशांनी निषेध केला. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

  • 08 Dec 2025 01:24 PM (IST)

    ऑपरेशन सिंदूरवर बोलताना मोदींकडून 14 वेळा नेहरुंचा उल्लेख- गौरव गोगोई

    ऑपरेशन सिंदूरवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 वेळा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला होता. याआधीही त्यांनी त्यांच्या भाषणात अनेकदा नेहरूंचा उल्लेख केला. मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते नेहरूंच्या प्रतिमेला डाग लावू शकत नाहीत, असं आसाम काँग्रेसच्या गौरव गोगोई यांनी म्हटलंय.

  • 08 Dec 2025 01:24 PM (IST)

    उच्च जातीचं नाव काय? आठवीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत प्रश्न

    उच्च जातीचं नाव काय? आठवीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत असा हा प्रश्न विचारला गेला आहे. याप्रकरणी शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात आला असून कारवाईची मागणी होत आहे. संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • 08 Dec 2025 01:14 PM (IST)

    अजित पवार, धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी रश्मी शुक्लादेखील भेटीदरम्यान उपस्थित असल्याचं कळतंय. मुख्यमंत्र्यांच्या दालनात या तिघांची बैठक झाल्याची शक्यता आहे.

  • 08 Dec 2025 01:07 PM (IST)

    आजची चर्चा भविष्यातील पिढ्यांसाठी मोठी शिकवण देणारी- मोदी

    आजची चर्चा भविष्यातील पिढ्यांसाठी मोठी शिकवण देणारी आहे. देशावर जेव्हा संकट आलं तेव्हा वंदे मातरम् चा जयघोष झाला. आपल्यावर वंदे मातरम् चं कर्ज आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 08 Dec 2025 12:28 PM (IST)

    गडावर अपघात झाल्यानंतर सप्तश्रृंगी ग्रामस्थ आक्रमक, रास्ता रोको सुरू

    गडावर अपघात प्रश्नी सप्तश्रृंगी ग्रामस्थ आक्रमक झाले असून अपघातस्थळी रस्ता रोको सुरू आहे. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. बांधकाम विभागाचा गलथान कारभार असल्याचाही आरोप करण्यात ग्रामस्थांनी केला आहे.

    दीड वर्षांपासून रस्ता काम सुरू असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लगत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. रास्ता रोकोमुळे वणी सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

  • 08 Dec 2025 12:19 PM (IST)

    ‘वंदे मातरम्’ वर पंतप्रधान मोदी यांचं संबोधन

    ‘वंदे मातरम्’ ला 150 वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन सुरू आहे. आजची चर्चा ही भविष्यातील पिढ्यांसाठी मोठी  शिकवण देणारी ठरेल असं पंतप्रधान म्हणाले.

  • 08 Dec 2025 11:50 AM (IST)

    विठ्ठलाची पाद्यपूजा 11 दिवस बंद राहणार – मंदिर समितीचा निर्णय

    श्री विठ्ठल दर्शनाकरता पंढरपुरात गर्दी वाढत असल्याने 11 दिवस विठ्ठलाची पाद्यपूजा बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यामुळे येता 21 ते 31 डिसेंबर पर्यंत श्री विठ्ठलाची पाद्यपूजा बंद राहील.

    नाताळच्या सुट्ट्या असल्याने अनेक भावीक हे विठ्ठल दर्शनाकरता पंढरपुरात येत असतात. त्या आलेल्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाने  हा निर्णय घेतला आहे.  मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.

  • 08 Dec 2025 11:27 AM (IST)

    बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक

    बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाताना एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. बेळगावच्या खानापूर शहरात ही घटना घडली. कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, परवानगी नसतानाही नेते महामेळाव्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांना तिथे अटक करण्यात आली.

  • 08 Dec 2025 11:13 AM (IST)

    अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर ग्रामस्थांचा रस्ता रोको

    बिबट्याच्या हल्ल्यात किन्ही गावातील भागूबाई खोदडे यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ आक्रमक, अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर किन्ही ग्रामस्थांकडून रास्ता रोको.

    नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र आठवड्याभरानंतरही  वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी विरोध केल्याने काही काळ तणावाणाचं वातावरण होतं.

  • 08 Dec 2025 11:01 AM (IST)

    बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती मतमोजणी सुरु, निकालाकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष

    बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एकूण चार टेबलवर ही मतमोजणी सुरू असून, यात प्रामुख्याने दोन प्रमुख पॅनेल्सचे भवितव्य ठरणार आहे. माजी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडी आणि विद्यमान आमदार दिलीप गंगाधर सोपल यांच्या नेतृत्वाखालील बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी यांच्यात थेट लढत आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले असून, लवकरच कोणती आघाडी बाजार समितीवर वर्चस्व गाजवते, हे स्पष्ट होईल.

  • 08 Dec 2025 10:54 AM (IST)

    हिवाळी अधिवेशनाचा निषेध, बेळगावात शिवसेना आणि म. ए. समितीच्या नेत्यांना अटक

    बेळगाव पोलिसांनी कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाविरुद्ध महामेळावा घेण्यासाठी येणाऱ्या शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (म. ए. समिती) नेत्यांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना शहरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी बेळगाव आणि निप्पानी सीमेवर कडक बंदोबस्त लावला होता, तसेच शहरात संभाजी सर्कल येथे शंभराहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. खडेबाजार, कॅम्प, तिलकवडी आणि मार्केट पोलिस ठाण्यांच्या हद्दीसह प्रमुख चार ठिकाणीही विशेष पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.

  • 08 Dec 2025 10:45 AM (IST)

    बीडमध्ये वर्षभरात ३६५ शस्त्र परवाने रद्द

    बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात एकूण ३६५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर आणि त्यानंतर गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

    • रद्द झालेले परवाने: ३६५
    • सुरुवातीला असलेले परवाने (जानेवारी): १,२८१
    • स्वयंस्फूर्तीने समर्पित केलेले परवाने: ४९
    • नव्याने दिलेले परवाने: ४ (यात बँकांचा समावेश आहे.)
    • सध्या जिल्ह्यात असलेले परवाने: ९१६
  • 08 Dec 2025 10:32 AM (IST)

    वन्यजीव हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव

    राज्यात वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना सरकार थेट सरकारी नोकरी देण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे. याबद्दल लवकरच कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

  • 08 Dec 2025 10:18 AM (IST)

    बीडच्या स्ट्राँग रूमबाहेर महाविकासआघाडीचा 24 तास पहारा

    बीड नगरपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, ज्याच्या सुरक्षेसाठी एसआरपीएफ आणि पोलीस दलाची दोन टप्प्यांत नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागू शकतात, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तात्काळ पंडॉल उभारून २४ तास पहारा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये उमेदवार आणि कार्यकर्ते आठ-आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये बदलून चोवीस तास सुरक्षा व्यवस्था राखत असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.

  • 08 Dec 2025 10:08 AM (IST)

    नांदेड मनपा निवडणुकीत शिवसेनेला ६० टक्के जागा द्या – आमदार बालाजी कल्याणकर

    नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मित्रपक्षांना जागावाटपाबाबत स्पष्ट प्रस्ताव देत एक मोठा इशारा दिला आहे. नांदेड महानगरपालिकेवर १०० टक्के भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा निर्धार आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला.  यसत्ताधारी पक्षाच्या आमदाराला ६० टक्के जागा आणि मित्र पक्षांना ४० टक्के जागा असे सूत्र निश्चित करावे. शिवसेनेला ६० टक्के जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा प्रस्ताव महाविकास आघाडीतील तसेच युतीतील मित्रपक्षांनाही लागू असेल, असा कडक इशारा आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिला आहे.

  • 08 Dec 2025 09:53 AM (IST)

    एकनाथ शिंदेंची आज सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांसोबत आज रात्री ८ वाजता एक महत्त्वाची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मनपा निवडणुकांची तयारी, विकास निधीचे योग्य वाटप आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये चांगला समन्वय कसा साधायचा या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात आजची ही बैठक दिशा देणारी ठरू शकते.

  • 08 Dec 2025 09:41 AM (IST)

    छत्तीसगड पोलिसांना मोठे यश, १२ माओवाद्यांनी पत्करली शरणागती

    छत्तीसगड – माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीच्या सदस्य रामघेर मज्जी आपल्या १२ साथीदारांसोबत आत्मसमर्पण केले.  12 अत्याधुनिक शस्त्रांसह या माओवाद्यांनी छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात आत्मसमर्पण केले. Ak 47 रायफल सह इंसास, 303, SLR असे आत्याधुनिक रायफल घेऊन माओवादयांनी शरणागती पत्कारली. या बारा माओवाद्यांमध्ये जवळपास सहा माओवादी मोठे कॅडरचे आहेत. या सर्वांवर जवळपास दीड कोटी रुपयांचे बक्षीस होते.

  • 08 Dec 2025 09:30 AM (IST)

    मनसेच्या नगरसेविकाने केला शिवसेनेत प्रवेश

    मनसेच्या नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ⁠सोबत विभाग अध्यक्ष बंदेश जाधव, अशपाक मांडेकर, लोकेश जाधव, सनी गायकवाड, सिद्धार्थ भोईर, अक्षय राऊत, अशोक चिमटे, दिशान खलिपा, सुनील नेतकर, प्रवीण करोतिया, नामदेव जाधव, भारत जाधव, रोशन जाधव, रोहन जाधव यांनी ही शिवसेनेत प्रवेश केला

  • 08 Dec 2025 09:22 AM (IST)

    धुळे शहराचा जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला

    धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 5.4 अंश सेल्सिअस. जनजीवनावर परिणाम. गेल्या काही दिवसापासून सतत तापमानात घट होत आहे. थंडीचा गहू आणि हरभरा पिकांना मोठा फायदा.

     

  • 08 Dec 2025 09:08 AM (IST)

    नांदेड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला 60 टक्के जागा द्या

    नांदेड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला 60 टक्के जागा दिल्या पाहिजेत. सत्ताधारी आमदाराला 60 टक्के जागा तर मित्र पक्षाला 40 टक्के जागा. शिवसेना उत्तर मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा भाजप व दादाच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव. नांदेड महानगरपालिकेवर 100% भगवा फडकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमदार बालाजी कल्याणकर यांचा महाविकास आघाडीसह युतीतील मित्र पक्षांना इशारा.

  • 08 Dec 2025 08:55 AM (IST)

    थायलंडचा कंबोडियावर एअर स्ट्राइक

    थायलंड आणि कंबोडिया दरम्यान पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. थायलंडने पुन्हा एकदा कंबोडियाच्या सीमेवर एअर स्ट्राइक केला आहे

  • 08 Dec 2025 08:46 AM (IST)

    विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे

    विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे. भास्कर जाधव यांचं नाव केवळ चर्चेत ठेवून आदित्य ठाकरेंच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे केल्याची सुत्रांची माहीती.

  • 08 Dec 2025 08:34 AM (IST)

    निफाडचा पारा घसरला

    निफाडचा पारा घसरला. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.4 अंश सेल्सिअस किमान तापमानची नोंद. अचानक थंडीच्या लाटेत वाढ झाल्यामुळे 11 अंश सेल्सिअस वरून पारा 6.4 अंशावर. उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या.  अचानक थंडीत वाढ झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांची वाढली डोकेदुखी. फुगवणीच्या स्टेजला असलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची द्राक्ष उत्पादकांना भीती.

  • 08 Dec 2025 08:24 AM (IST)

    आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस

    आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार या मुद्यांवरुन हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.