AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पेशल रिपोर्ट : विधानसभेसाठी जनतेचा कौल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने?

राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनं पसंती शरद पवारांनाच दिली. आता लोकसभेच्या निकालानुसार विधासभेचा कौल पाहिल्यास विधानसभेतही शरद पवार गटाचाच फायदा होताना दिसतोय.

स्पेशल रिपोर्ट : विधानसभेसाठी जनतेचा कौल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने?
शरद पवार आणि उद्धव ठाकरे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 11, 2024 | 10:18 PM
Share

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर, पहिली परीक्षा लोकसभा निवडणुकीत झाली, ज्यात जनता ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूनं असल्याचं दिसलं. ठाकरे आणि शरद पवारांची नजर विधानसभा निवडणुकीकडे आहे. लोकसभेच्या निकालानुसार जर विधानसभेचा कौल पाहिला तर, ठाकरेंच्या जागा अधिक येताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत 13 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली. लोकसभेच्या निकालानुसार, दोन्ही शिवसेनेच्या 53 आमदारांच्या मतदारसंघाचा विचार केला तर, शिंदेंच्या शिवसेनेचे 23 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 30 आमदार पुढे आहेत. याचाच अर्थ सध्या शिंदेंकडे जे 40 आमदार आहेत. त्यापैकी 13 आमदारांचं भवितव्य धोक्यात आहे आणि ठाकरेंकडे सध्या 14 आमदार असून त्यांना 16 आमदारांचा फायदा होताना दिसतोय.

राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनं पसंती शरद पवारांनाच दिली. आता लोकसभेच्या निकालानुसार विधासभेचा कौल पाहिल्यास विधानसभेतही शरद पवार गटाचाच फायदा होताना दिसतोय. अजित पवार गटाला 16 तर शरद पवार गटाला 52 जागांवर विधानसभेत आघाडी मिळताना दिसतेय. नुकत्याच झालेल्या लोकसभेत सुनिल तटकरे एकमेव खासदार निवडून आले. आणि अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत. पण लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचा कौल पाहिला तर अजित पवार गटाला 24 आमदारांचं नुकसान होताना दिसतंय. म्हणजे 24 आमदारांच्या जागा धोक्यात आहेत.

शरद पवार गटाकडे 13 आमदार आहेत. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार निवडून आलेत. त्यानुसार विधानसभेचा कौल बघितला तर 52 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. म्हणजेच 39 आमदारांचा सध्या फायदा होताना दिसतोय. अर्थात ही आकडेवारी लोकसभेत लढवलेल्या जागा आणि त्यावरुन आलेले निकालाच्या कलानुसार आहे. त्यावरुन जनतेचा कौल शरद पवार आणि ठाकरेंच्या बाजूनं आहे.

कौलनुसार, ‘या’ दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता

  1. पोलनुलार, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून 27 हजार 759 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  2. शिवसेना नेते तथा राज्याचे विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे परांडा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 81 हजार 177 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  3. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून 10 हजार 37 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  4. शिवसेनेच्या यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघातून 46 हजार 66 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  5. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून 21 हजार 20 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  6. शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघातून 23 हजार 659 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  7. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील हे 11 हजार 368 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  8. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातून 13 हजार 205 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  9. अजित पवार गटाचे आमदार संजय शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघातून 52 हजार 515 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  10. अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक हे अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून 29 हजार 83 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  11. अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 28 हजार मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  12. अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 55 हजार 951 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  13. अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे हे अकोलो विधानसभा मतदारसंघातून 54 हजार 379 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  14. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे कुडाळ मतदारसंघातून 26 हजार 236 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  15. शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मतदारसंघातून 10 हजार 118 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  16. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत हे कन्नड विधानसभा मतदारसंघातून 31 हजार 104 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  17. काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातून 14 हजार 483 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  18. काँग्रेसचे विकास ठाकरे हे 6 हजार 604 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  19. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे चक्क 63 हजार 798 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  20. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे तब्बल 48 हजार 200 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  21. भाजपचे संतोष दानवे हे भोरदन येथून 962 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  22. भाजपचे आमदार संभाजी निलंगेकर हे निलंगा मतदारसंघातून 20194 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  23. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा फुलंब्री मतदारसंघातून 29,856 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  24. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूर येथून तब्बल 52176 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  25. भाजपचे घाटकोपर पश्चिम विधानसभेचे आमदार राम कदम हे 15,772 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
  26. भाजपचे बबनराव लोणीकर हे परतूर येथे 25,344 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा