AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा; मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांनी शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा; मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
| Updated on: Feb 20, 2025 | 2:46 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांनी शिक्षा सुनावली आहे. 1995 सालचं हे प्रकरण आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात माणिकराव कोकाटेंवर आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणात न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  त्यामुळे आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून आमदारकी देखील धोक्यात आली आहे.

न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सुनावणी सुरू असून, थोड्याच वेळात जामिनाबाबत निर्णय होणार आहे. माणिकराव कोकाटे यांना  जामिन मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.  दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले कोकाटे? 

रितसर निकाल लागलेला आहे, ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो. मला न्याय मागण्याचा अधिकार त्यामुळे मी आता वरच्या कोर्टात आपील करणार आहे. हा खटला 1995 चा आहे, पण न्याय प्रणालीनुसार त्याचा निकाल आज लागला. त्यामुळे त्याला जरी उशिर झाला असला तरी आज निकाल लागला आहे. आता मी वरच्या कोर्टात आपील करणार आहेत. ही न्यायालयीन बाब असल्यामुळे मी या संदर्भात जास्त भाष्य करणार नाही. आता माझ्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ शकते अशी प्रतिक्रिया यावर माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.

 नेमकं काय आहे प्रकरण? 

1995  चं हे प्रकरण आहे.  कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात माणिकराव कोकाटेंवर आरोप करण्यात  आले होते. त्या प्रकरणात आता माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोन वर्षांची शिक्षा तसेच पन्नास हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. हा माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून, ते आता या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहेत.

Follow Us
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...