जाती जातीत तेढ निर्माण करणं योग्य नाही; शिंदे सरकारमधील मंत्र्याचाच नितेश राणेंवर निशाणा
Nitesh Rane Statement : शिंदे सरकारमधील मंत्र्यानेच भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. जाती जातीत तेढ निर्माण करणं योग्य नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य काय आहे? नितेश राणेंवर कुठे गुन्हा दाखल झाला? वाचा सविस्तर...

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबता थांबत नाहीये. मुंबईतील धारावीतील मस्जिद प्रकरणावरून केलेलं वादग्रस्त वक्तव्य ताजं असतानाचा काल अमरावतीच्या अचलपूरमध्ये नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अचलपूरमध्ये आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. यावर शिंदे सरकारमधील मंत्री उदय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
उदय सामंत काय म्हणाले?
अमरावतीच्या अचलपूर ठाण्यात नितेश राणे यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विचारलं असता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे की नाही मला माहित नाही . पण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं योग्य नाही. आम्हाला आजही या संतांच्या मेळाव्यात देखील हेच ऐकायला मिळालं, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
आमची ज्यांच्या विरोधात लढाई आहे, ते किती कडंवत आहे. इस्लाममध्ये लिहलं आहे की, धर्म स्वीकारायला लावा किंवा संपवून टाका. तुम्हाला फसविण्यासाठी ते लोक जय श्रीराम पण बोलतील. आपल्या हक्काच्या लोकांकडून वस्तू विकत घ्या. पण भाईजान कडून घेऊ नका. अचलपूरमध्ये जिहादी लिकांनी आपल्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर आधी त्यांच्या तंगड्या तोडा व नंतरर पोलिसात तक्रार करा, असं नितेश राणे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.
नितेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल
आमदार नितेश राणे आणि सागर बेग यांच्याविरोधात अमरावतीच्या अचलपूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन धर्मामध्ये कटूता निर्माण होईल, अशी वक्तव्य केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर करण्यात आला आहे. काल झालेल्या अचलपूरच्या धर्मसभेत राणेंनी वादग्रस्त विधान केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान खान आणि असलम खान यांच्या फिर्यादीवरून राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम 196 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
