राजकारणापलिकडचे राजे! नरेंद्र पाटलांच्या आईला भेटण्यासाठी उदयनराजे हॉस्पिटलमध्ये!

राजकारणापलिकडचे राजे! नरेंद्र पाटलांच्या आईला भेटण्यासाठी उदयनराजे हॉस्पिटलमध्ये!

सातारा : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि उमेदवार उदयनराजे भोसले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या आईची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. नरेंद्र पाटील हे शिवसेनेकडून साताऱ्यातून उदयनराजेंविरोधात लढत आहेत.

शिवसेनेचे साताऱ्याचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची आई वत्सलाताई या आजारी असल्याने, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचा सुरु आहेत. वत्सलाताईंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट हॉस्पिटल गाठले. नरेंद्र पाटलांच्या आईच्या प्रकृतीची चौकशी केलीच, सोबत डॉक्टरांकडूनही उपचारासंदर्भात सर्व माहिती घेतली.

यासंदर्भात उदयनराजे यांनी ट्विटरवर म्हटलंय की, “महायुतीचे उमेदवार श्री नरेंद्र पाटील व आमचे मित्र जि.प.सदस्य श्री रमेश पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई यांची हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली व डॉक्टरांकडून आजाराची सर्व माहिती घेतली.”

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. साताऱ्यातून उदयनराजेंविरोधात लढण्याची इच्छा नरेंद्र पाटलांची होती. मात्र, साताऱ्याची जागा शिवसेनेच्या वाट्याला येत असल्याने, नरेंद्र पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना तातडीने तिकीटही मिळालं. त्यामुळे साताऱ्यातून नरेंद्र पाटील यंदा उदयनराजेंना टक्कर देत आहेत.

राजेरजवाडे, अलिशान गाड्या, जमीन-जुमला, पण उदयनराजेंकडे मोबाईल कोणता?

दुसरीकडे, उदयनराजे भोसले हे आपल्या दिलखुलास, दिलदार आणि मनमोकळ्या स्वभावामुळे अवघ्या महाराष्ट्रात परिचित आहेत. साताऱ्यातील जनता त्यांच्यावर भरभरुन प्रेम करते. प्रत्येक निवडणुकीत उदयनराजे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतात. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्यासमोर उदयनराजेंसारखं मोठं आव्हान आहे.

Published On - 1:45 pm, Thu, 11 April 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI