Uddhav Thackeray: भाजप ऑपरेशन राम मंदिर राबवत आहे का? मंदिर लुटीचा पैसा खासदार… उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप काय?
Uddhav Thackeray big allegation on BJP : उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राम मंदिर लुटीचा पैसा हा भाजप खासदार , आमदार फोडाफोडीसाठी वापरत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

Uddhav Thackeray big allegation on BJP : उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील दानपेटीतील लुटीवरून भाजपवर घणाघाती टीका केली आहे. देशात खासदार आणि आमदार फोडाफोडासाठी राम मंदिर लुटीचा पैसा वापरला का असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या गंभीर आरोपासोबतच लूट करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तर याप्रकरणी ते आता मोठे आंदोलन छेडणार आहेत. त्यांनी आज मातोश्रीवर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी?
नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आज राम मंदिर वेगळ्या गोष्टीने चर्चिला जात आहे. दरोडेखोरी सुरू आहे. आमदार खासदार फोडले जात आहे. त्याला ऑपरेशन नाव दिलं जात आहे. आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करत आहे का. या बातम्या दाखवल्या जात असतील नसतील. पण चोरी होत आहे. राम मंदिरावर दरोडा टाकला जात आहे. काहींच्या मते हा चोरीचा पक्ष इतर पक्ष फोडण्यासाठी केला जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या नवीन दाव्याने खळबळ उडाली आहे.
रविवारी संध्याकाळी आंदोलन
राम मंदिर दानपेटीतील या चोरीविरोधात उद्धव सेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजता दादर कबुतरखान्याजवळ राम मंदिर आहे. तिथे तमाम हिंदूंना ज्यांना ज्यांना वाटतं भाजपच्या कालखंडात हिंदुत्व धोक्यात आलं म्हणून मोर्चे काढले त्यांना आमंत्रित करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी राम भक्त आणि हिंदूंना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले.
ज्यांनी हिंदुत्व सोडंल नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही. त्यांनी यावं. त्यांचं स्वागत करतो असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तर अयोध्येत जाऊन आंदोलन करायला लाजत नाही. महाराष्ट्र जागा झाला की देश जागा होतो असे ते म्हणाले. आता उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन आंदोलन करणार का, याची चर्चा होत आहे.
ठाकरे यांच्या आरोपाने खळबळ
उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत भाजपवर मोठा आरोप केला आहे. राम मंदिरातील दानपेटीतून कोट्यवधींचे दान चोरीला गेले आहे. त्यात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ट्रस्टचे प्रमुख चंपत राय हे बाजूला झालेले आहेत. राम मंदिरातील या चोरीविरोधात उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारतानाच चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.