याचं कार्ट क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष झालं ते… उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली; अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला

Uddhav Thackeray vs Amit Shah: अमित शाह यांनी भाजप हा घराणेशाहीद्वारे चालणारा पक्ष नाही असं म्हणत विरोधकांवर टीका केली होती. अमित शाह यांच्या या विधानाला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

याचं कार्ट क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष झालं ते... उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली; अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला
uddhav thackeray and jay shah
| Updated on: Oct 27, 2025 | 8:07 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबईत आले होते. शाह यांच्या हस्ते भाजपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना अमित शाह यांनी भाजप हा घराणेशाहीद्वारे चालणारा पक्ष नाही असं म्हणत विरोधकांवर टीका केली होती. अमित शाह यांच्या या विधानाला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यात ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अॅनाकोंडा येऊन गेला…

निर्धार मेळाव्यात अमित शहांवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांचा उल्लेख अॅनाकोंडा असा केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘अॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप. तो येऊन गेला. त्यांना मुंबई गिळायचीय. पण त्यांना मुंबई कशी गिळू देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही. भूमिपूजन करायला आला. तरी टीका. फोड ना नारळ. डोक्यावर फोड. नारळ फोडतानाही घराणेशाहीवर टीका.

याचं कार्ट क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष झालं…

जय शाह आणि अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘याचं कार्ट क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष झालं ते त्याच्या क्रेडिटने झालं. मेरिटने झालं. आणि घराणेशाही कुणाची ठाकरेंची. अरे उभा राहून दाखव. त्या अब्दालीला सांगायचं. आमच्या आईवडिलांचे ऋण माणणारे पाईक आहोत. तुमची ब्रह्मचार्याची पिल्लावळ आमची घराणेशाही नाही. ब्रह्मचार्याला 40-40 पोरं होती. झाली कशी. तुकारामांचा अभंग आठवला. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेले. तशीच भाजपची परिस्थिती आहे. तुम्ही अर्थ शोधा.’

शिवसेनाप्रमुख आपली परीक्षा घेत आहेत…

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी, ‘गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही. म्हणून पैसे देऊन मुंबई विकत घेण्याचा प्रयत्न आहे. इमान विकणारे खूप आहे. गुडघे टेकत आहे. वाईट वाटतं अशा लोकांना आपण पोसलं कसं. आईच्या कुशीवर वार करणारे हे लोक आहेत. आपली परीक्षा सुरू आहे. शिवसेनाप्रमुख आपली परीक्षा घेत आहे. मी काय दिलं तुम्हाला. तुम्ही काय दिलं हे शिवसेनाप्रमुखांनी विचारलं तर काय सांगाल. कितीही अमित शाह आले तरी आपली धमक हरवू देऊ नका असे आवाहन शिवसैनिकांना केले आहे.