आम्ही दोघे भाऊ… मनसेसोबतच्या युतीबद्दल उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
येत्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र लढणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच आता ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी याबद्दल एक मोठं विधान केले आहे.

सध्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. त्यातच आता इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकारणाला एक वेगळं वळण मिळाले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन घडामोडी सुरु आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र लढणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच आता ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी याबद्दल एक मोठं विधान केले आहे.
उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होईल. त्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण असल्याने ठाकरे कुटुंबीय जेवणासाठी गांधींच्या निवासस्थानी जाणार आहे. या इंडिया आघाडीच्या बैठकीसोबतच शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाच्या खासदारांची सुद्धा उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यामध्ये बैठक घेणार आहेत. नुकतंच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंबद्दल भाष्य केले.
इंडिया आघाडीत अटतटी नाही. राज आणि आम्ही निर्णय घेण्यात सक्षम आहोत. आम्ही दोघं भाऊ सक्षम आहोत. जे करायचं ते करु. त्यात तिसऱ्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दोन तीन वर्षापूर्वी शेतकरी दिल्लीत येत होते. त्यांना रोखलं होतं. सहा महिने तळ ठोकून होते. काही शेतकरी मेले. तेव्हा शेतकऱ्यांची आठवण आली नाही. तेव्हा तर म्हणायचे शेतकऱ्यांची मुलं आहोत म्हणायचे. तेव्हा या शेतकऱ्यांसाठी का पुढे आला नाही. किल डाल दी, दिवारे खडी की, नक्षलवादी म्हटलं तेव्हा शेतकरी आठवले नाही का. त्यांचा चेहरा उघड झाला, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
सरकार परराष्ट्र नीती अपयशी ठरलं
“याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. ट्रम्प मोदींची थट्टा करत आहेत. खिल्ली उडवत आहे. आपण त्यांना एका अक्षराने उत्तर देत नाही. जाब विचारणं सोडा. देशाचं सरकार चालवतंय कोण? शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. तेव्हा मी मत व्यक्त केलं होतं. आपल्या देशाला पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्र्यांची गरज आहे. हे सध्या भाजपचे आहेत. पहलगाम हल्ला झाला तेव्हा मोदी बिहारला गेले. एखादा पंतप्रधान पहलगामला गेले असते. हे प्रचार मंत्री. पंतप्रधान देशाचे असते तर पहलागमला गेले असते. एकूणच हे सरकार अपयशी, असफल आणि असहाय आहे.यांना पररराष्ट्र नीती नाही. परराष्ट्र नीती अपयशी ठरलं आहे. कोणतंही खंबीर धोरण नाही. अमेरिका डोळे वटारणार असताना मोदी चीनला जातात. चीनलाही मित्रासाठी नवीन डोअर उघडण्यासाठी जात आहे. हे सरकार परराष्ट्र नीती अपयशी ठरलं आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारला नीतीमत्ता राहिली नाही. पाकिस्तान दुश्मन आहे. दिल्लीत आम्ही मॅच रोखली होती. मुंबईत रोखली होती. जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत मॅच खेळू नये हे आम्ही सांगोयचो. सुषमा स्वराज यांनीही म्हटलं होतं. हे मतलबी लोक आहे. आपल्याला धडे देतात. पण जय शहासकट मंत्र्यांची मुलं दुबईत जाऊन पाकिस्तानची मॅच पाहत आहेत. हे देशभक्त असूच शकत नाही. देशभक्तीची व्याख्या करायची असेल तर सच्चा देशभक्ताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवू नये, असेही उद्धव ठाकरे म्हटले.
