
राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन लढत आहेत. मनसे शिवसेना ठाकरे गटाची युती जाहीर झाली. पहिल्यांच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत निवडणुका लढवत आहेत. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची नुकताच एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोठे आरोप केले. यादरम्यान त्यांनी ठेवीबद्दल मोठे विधान करत भाजपावर आरोप केला. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा ठेवीबद्दल बोलतानाचा एक व्हिडीओही दाखवण्यात आला. आम्ही महापालिकेत 92 हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या. टोल फ्रि रोड केला. गडकरींसारखा खड्डेवाला रोड नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ बघितल्यानंतर म्हटले की, फडणवीस रेकतात कशाला. यांनी 70 हजार कोटींच्या ठेवी तोडल्या. यांनी भयानक माहिती दिली. 70 हजार कोटी गेले कुठे. 22 हजार कोटी खाल्ले की. कुणाच्या खिशात गेले. हे भयानक आहे. हा गौप्यस्फोट आहे. यांनी 22 हजार कोटी यांनी भाषणातच खाल्ल्या. कायमच उद्धव ठाकरे हे 92 हजार कोटींच्या ठेवी ठेवल्याचा दावा करतात.
गणेश नाईक म्हणतात नवी मुंबई कर्जबारी केली. ठेवी तोडल्या. त्यांना सांगा ना ठेवी काय चाटायच्या आहेत का. नवी मुंबईत एफएसआयचा घोटाळा ज्यांनी केला त्याला शिक्षा देणार आहेत का. आणखी मला कळलं की 17 हजार कोटी लाटणार आहेत. ठेवी चाटायला नसतात. कंत्राटदारांना द्यायला नसतात. बेस्ट कर्मचारी, बीएमसी कर्मचाऱ्यांचा फंड, ग्रॅच्युएटी, धरण, सोयी सुविधांसाठी हा या ठेवी असतात. आवक आणि जावकचा ताळमेळ घालावा लागतो. ऑक्ट्रॉय मारला. जीएसटी वर गेला.
आवक आणि जावकचा ताळमेळ घालावा लागतो. ऑक्ट्रॉय मारला. जीएसटी वर गेला. डायमंड मार्केट हे गुजरातला गेलं. महाराजांनी सुरत लुटली होती. स्वराज्यासाठी लुटली होती. हे मुंबई लुटत आहेत. इंग्रजांपेक्षा भयानक पद्धतीने मुंबई लुटत आहे. मुंबईच्या सर्व गोष्टी बाहेर नेऊन मुंबईला भिकारी करत आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.