AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackrey : 5 तारखेपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी साधणार संवाद – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे ५ तारखेपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना सरकारकडून दिवाळीपूर्वी जाहीर झालेले मदतनिधी मिळाले की नाही, याची पाहणी करणार आहेत. खरडून गेलेल्या जमिनीसाठी पॅकेज, कर्जमुक्ती आणि दर हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मागणीसह इतर घोषित मदतीची काय स्थिती आहे, याचा आढावा घेतील.

Uddhav Thackrey : 5 तारखेपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी साधणार संवाद - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
| Updated on: Nov 03, 2025 | 1:01 PM
Share

येत्या 5 तारखेपासून मी मराठवाड्यात संवाद दौऱ्यावर जाणार आहे. शेतकऱ्यांशी मी थेट संवाद साधणार आहे. दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील असं पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. काही हजार कोटी तिजोरीतून रिलीज केले असं ते म्हणतात, तर ते पैसे मिळाले का याबद्दल विचारणार आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey ) यांनी सांगितले. नुसती आगपाखड करायला किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही, पण ते पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील संवाद दौऱ्याची योजना मांडली. शेतकऱ्यांना मदत मिळाली का याची पाहणी करणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

जे पॅकेज जहीर केलं त्यातलं तरी काय मिळालं ?

आज शेतकऱ्याला बाकी मदतीची गरज आहेच पण सर्वात आधी ज्यांची जमीन खरडून गेली आहे, ती पूर्ववत करण्यासाठी ते पहिले माती मागत आहेत. ती मातीच जर त्यांना मिळाली नसेल तर पुढच्या गोष्टी कशा होणार ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. दर हेक्टरी 50 हजार रुपये ही शेतकऱ्यांची मागणी आहे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही त्यांची मागणी आहे. इतरही अनेक बाबी आहे. मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे. जे पॅकेज जाहीर केलं होतं,त्यातलं तरी किती मिळालं असा सवाल शेतकऱ्यांना विचारणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांशी प्रामाणिकपणे वागलो, तसं हे सरकार का वागत नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

खरडून गेलेल्या जमीनीला तीन- साडेतीन लाख मनरेगातून देणार होते. दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यात टाका, मग पुढे पैसे नंतर द्या अशी मागणी आम्ही काढलेल्या मोर्चादरम्यान मी केली होती. पण तेही पैसे दिलेत असं वाटत नाही. सरकार नेमकं काय करणार आहे ? आत्तापर्यंत घोषित झालेल्या पॅकेजपैकी शेतकऱ्याच्या हातात काय मिळालं हेही पाहणार असल्याचं उद्धव यांनी सांगितलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...