AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता त्यांनी माझी बॅग ऑटो चेकिंगला टाकली दिसलो की’.., उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते श्रीगोंद्यात बोलत होते.

'आता त्यांनी माझी बॅग ऑटो चेकिंगला टाकली दिसलो की'.., उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 14, 2024 | 4:45 PM
Share

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान त्यातच निवडणूक अधिकाऱ्यांकडून काही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे हे आज प्रचाराच्या निमित्तानं अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. त्यांनी श्रीगोंदामध्ये बोलताना याच मुद्द्यावरून जोरदार फटकेबाजी केली. मला प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता सत्ताधारी देखील म्हणतात माझी बॅग तपासा असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

उशीर झाला त्याबद्दल दिलीगिरी व्यक्त करतो, तिकडे सत्ताधाऱ्यांच्या सभा सुरु आहे लोक बिर्याणी खातात आणि निघून जातात. साजन पाचपुते यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि मला नाही तर अनुराधा नागवडे यांना तिकीट द्या म्हणाले. माझी बॅग ऑटो चेकिंगला टाकली आहे, उद्धव ठाकरे दिसले की बॅग तपासा, बरं झालं माझी बॅग तपासतात त्यामुळे मला देखील फोटो काढायला मिळतात.  आता मला प्रसिद्धी मिळाली आहे, त्यानंतर  सत्ताधारी देखील म्हणतात माझी बॅग तपासा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील बॅग तपासली पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपले कोण आहेत आणि आपल्यात घुसलेले शकुणी मामा कोण आहेत हे ओळखलं पाहिजे. निलेश लंके यांना देखील सांगतो भेदभाव न करता तुम्हला जसं लोकसभेत पाठवलं, तसं श्रीगोंद्यात येऊन अनुराधा नागवडे यांचा प्रचार केला पाहिजे. अनुराधा ताई तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, मात्र तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असेल तर गद्दारी होत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी सहकार खातं काढलं आणि स्वत:च्या बुडाखाली ठेवलं.  आता अमित शहा यांना मुंग्या लागणार, तुमचे साखर कारखाने आजारी पाडले जाणार. आम्ही महिलांना दीड हजार नाही तर 3 हजार देऊ, महिलांना सुरक्षा देऊ, महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे काढू महाराष्ट्र जर मोदी आणि शहा यांच्या हातात जात असेल तर शेतकऱ्यांप्रमाणेच आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या यांना एकदाच गाडा आणि आपल सरकार आना, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा