मोदींसमोर वळवळ करणारे हे मांढूळ आहे, उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्याच राडा झाला होता.

मोदींसमोर वळवळ करणारे हे मांढूळ आहे, उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 9:34 PM

ठाण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘भाषण करूच नये. केवळ घोषणांचा कार्यक्रम करूया असं वाटतं. या केवळ घोषणा नाही. हा संताप आहे. उद्वेग आहे. संताप आहे. केवळ घोषणा देऊन निवडणुका जिंकता येत नाही. मिंधे सरकार करतंय घोषणाचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ.’

‘दुबार मतदान नोंदणीचा मुद्दा चांगला आहे. कलेक्टरने सांगू काही केलं नाही. तीन महिने थांबा. सरकारी कलेक्टर आणि मिंध्याचे कलेक्टर कुठे पाठवतो ते बघा. चांडाळ चौकडी आहे. त्यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया. ही काही गंमत नाही. हे ठाणं उभं राहिलं त्यामागे शिवसेनाप्रमुखांचं प्रेम, शिवसैनिकांची अपार मेहनत. ही मेहनत झाली नसती तर मिंधेंची दाढी उगवली झाली नसती.’

‘नमक हराम टूची उत्सुकता आहे. नागांचा मी अपमान करू शकत नाही. हे मांडूळ आहेत. गांढूळ नाही. हे दुतोंडी आहे. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांढूळ आहे. हे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही. फोन आल्यावरच खराब होते. जसे असाल तसे या. फोन येताच पळतात. नशिब पँट घातलेली असते.’

लबाडी करून ठाणे जिंकलं. मी ठाणेकरांचं कौतुक करायला आलोय. सर्व काही पळवलं. जोर जबरदस्ती आणि पैशाचं वाटप. तरीही सव्वापाच लाख ठाणेकर निष्ठेने आपल्या बाजूला राहिले. वैशाली ताई साधी कार्यकर्ती. समोर मिंध्याचं कार्ट. तरीही या साध्या शिवसैनिकाचा पराभव करायला विश्वगुरुंना आणलं. तरीही चार लाख मते मिळाली. हा आपला विजय आहे. प्रचंड पैसा ओतून मते मिळाली. तरीही विजय दिसत नाही म्हणून लांड्या लबाड्या केल्या. ४८ मतांनी मुंबईत आपला पराभव होऊ शकतो? होऊच शकत नाही. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. सर्व मुंबई मतदान करतात. आजपर्यंत कधीही मतदान होत नाही एवढं पदवीधर मतदारसंघात झालं. प्रचंड मताने आपला उमेदवार निवडून आला. शिक्षक आमदारही निवडून दिला. मुंबई ठाणे आणि कोकण आपलचं आहे..

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.