AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे भावुक, मागितली थेट माफी, म्हणाले मी…

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, सहा खासदारांनी पक्षातून बंड केलं आहे. यावर आजच्या मोळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

मोठी बातमी! शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे भावुक, मागितली थेट माफी, म्हणाले मी...
Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 19, 2026 | 8:57 PM
Share

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 आमदार पक्षातून फुटले आहेत. या सर्व पार्श्वभूमीर शिवसेनेच्या वर्धापन दिनी आयोजित मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच बंडखोर खासदारांवर देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.  यावेळी बोलताना ते चांगलेच भावुक झाले.  आज गद्दारी झाली त्या वॉर्डातील मतदारांची मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज माझ्यावर टीका होत आहे. माझ्या पत्नीवर टीका होत आहे. तेजसवर टीका होत आहे. भाजपने दगा दिला म्हणून मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. मातोश्रीने फक्त सोसायचं. तुम्ही मंत्री व्हायचं, खासदार व्हायचं, तुमच्या मुलाने आमदार व्हायचं, पण मातोश्रीने काहीच करायचं नाही. नकोय आम्हाला? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज गद्दारी झाली त्या वॉर्डातील मी मतदारांची माफी मागतो. मोदींची लाट असताना माझ्यावर विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं, हे आम्हाला डिवचलं जात होतं. मोदींच्या चेहऱ्यावर खासदार निवडून आले म्हणत होते. मोदींचा चेहरा न वापरता आपले ९ खासदार निवडून आले. आज परत फोडाफोडी, कशासाठी फोडताय? काय मिळवायचं आहे. सत्तापिपासू किती व्हायचं, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्या समजा शिवसेना निवडणुकाच लढणार नाही. मग काय करतील? तुम्ही राहणार का माझ्यासोबत? मरमर मेहनत तुम्ही करायची, यांचे खोक्यावर खोके. शेतकऱ्यांना हमीभाव नाही, पण खासदारांचे हमी भाव ठरले. त्यांनी कर्जमाफी दिली ती फसवी आहे. शेतकरी म्हणत असतील मेलो तरी चालेल, पण कर्जमाफी नको. निवडणुकी आधी लाडकी बहीण, आता ८० लाख बहिणींचे पैसे काढून घेतले, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Follow Us
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प