AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं कसं होऊ शकतं? ते कोडं कधी सुटलंच नाही…, महापालिका निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं, मुंबई महापालिका देखील शिवसेना ठाकरे गटानं गमावली, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची या निकालावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

असं कसं होऊ शकतं? ते कोडं कधी सुटलंच नाही..., महापालिका निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Uddhav Thackeray
| Updated on: Jan 17, 2026 | 5:27 PM
Share

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. सर्व राज्याचं लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलं होतं. मुंबईमध्ये देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलं नाही, दरम्यान त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची या निकालावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.  काल महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सर्वच महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला मी जाऊ शकलो नाही. मुंबई, म्हाडा, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मी प्रचारासाठी गेलो होतो. चंद्रपूरमध्ये देखील शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आले. परभणीमध्ये देखील शिवसेनेला उत्तम यश मिळालं, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वात आधी मी आपल्या माध्यमातून जिथे जाऊ शकलो नाही  तेथील शिवसैनिकांची आणि मतदारांची दिलगिरी व्यक्त करतो. चांदा ते बांदा ज्यांनी शिवशक्तीला शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीला मतदान केलं त्या सर्व मतदारांचे आभार मानतो. या निवडणुका या फार विचित्र पद्धतीने किंवा घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून लढवल्या गेल्या. जणू ही निवडणूक काही त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशा पद्धतीने ही निवडणूक त्यांनी लढवली. त्यांनी साम दाम दंड भेद याच्या पलिकडे जाऊन निवडणूक लढवली. पैशांचं आमिष दाखवलं, आमच्या काही शिवसैनिकांना त्यांनी तडीपार करण्याची नोटीस दिली. काही ठिकाणी दंगली भडकवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

आमच्या ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधील उमेदवारांना पैशांची अमिषं दाखवण्यात आली. तर काही ठिकाणी जबरदस्तीने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले, मात्र या सर्व गोष्टींना न जुमानता ज्या ज्या उमेदवारांनी ही खिंड लढवली, ज्या -ज्या मतदारांनी मतदान केलं हे सर्व लोकशाहीचे रक्षक आहेत. मुंबईमध्ये आमचा महापौर व्हावा अशी आमची इच्छा होतीच. आजही आहे. मात्र तो आकडा आज तरी आम्ही गाठू शकलो नाहीत. पण त्यांच्या खेळ्यांना उत्तर देऊन आम्हाला जे काही यश मिळालं आहे, त्या यशानं सत्ताधारी पक्षांना घाम फोडला आहे, हे नक्की, असंही यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  मला अजूनही एका गोष्टीचं उत्तर मिळालेलं नाही, विधानसभेला की लोकसभेला माझ्या नक्की लक्षात नाही, पण शिवतिर्थावर मोदींची सभा झाली होती.पण खुर्च्या रिकाम्या होत्या, त्यानंतर यावेळी माझी आणि राज ठाकरे यांची शिवाजी पार्कमध्ये सभा झाली, आपण सर्व जण साक्ष आहात, शिवाजी पार्क कसं गर्दीने भरून गेलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांची सभा झाली नुसती खुर्च्यांची गर्दी होती. म्हणजे आमच्या सभेला गर्दी जमते, पण मतदान होत नाही, आणि त्यांच्याकडे फक्त रिकाम्या खुर्च्या होत्या, तरीही मतदान झालं. मग नुसत्या रिकाम्या खुर्चा कसं काय मतदान करू शकतात?  हे न सुटलेलं न उलगडलेलं कोड आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...