मराठा असो की कोणीही असो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करा: उदयनराजे भोसले

आरक्षण फक्त मागासवर्गीय समाजाला लागू होतं हे चुकीचं, असं ते म्हणाले. जर लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवणार नसतील तर लोक काय करतील? लोक दुसरा मार्ग निवडणारच ना. | Maratha Reservation

मराठा असो की कोणीही असो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करा: उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले, भाजप खासदार

सातारा: मराठा आरक्षणासंदर्भात आधी राज्य सरकारने त्यांची भूमिका जाहीर करावी. त्यानंतर आम्ही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कोणी करायचे, याचा निर्णय घेऊ, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले ((Udayanraje Bhosale) यांनी केले. संभाजीराजे, शिवेंद्राजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेशी आमची विसंगती असण्याचे कारणच नाही, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले. (BJP MP Udyanraje Bhosale on Maratha Reservation)

ते रविवारी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यावेळी बोलत होते. यावेळी उदयनराजेंनी मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा असो की कोणीही असो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करा. त्याचा वेगळा अर्थ लावू नका. आरक्षण फक्त मागासवर्गीय समाजाला लागू होतं हे चुकीचं, असं ते म्हणाले. जर लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवणार नसतील तर लोक काय करतील? लोक दुसरा मार्ग निवडणारच ना. आज अनेकजण फास लावून घेतायेत, मात्र आता लोक फास लावून घेणार नाहीत. तर राज्यकर्त्याना फास लावतील, आता ती वेळ लांब नाही, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला.

‘आधी सरकारने भूमिका जाहीर करावी, मग आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं ते ठरवू’

उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही तो राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. सरकार खोटं बोलण्याचं दिशाभूल करण्याचं काम करत आहे. सरकारने आधी त्यांची भूमिका जाहीर करावी मग मराठा आरक्षणाचं नेतृत्व कोणी करावं, हे आम्ही ठरवू, असे उदयनराजे यांनी सांगितले.

संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत: उदयनराजे भोसले

संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे उद्या उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. पक्ष कोणता का असेना मराठा आरक्षणासाठी आता अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत: उदयनराजे भोसले

खासदार संभाजी छत्रपतींची रायगडावर घोषणा, पहिला मराठा मोर्चा 16 जूनला; ठिकाणही ठरलं

त्यांना कामधंदा नाही म्हणून ‘ती’ गोष्ट उकरून काढताहेत; अजित पवारांचा भाजपला टोला

(BJP MP Udyanraje Bhosale on Maratha Reservation)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI