AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शहा पुन्हा महाराष्ट्रात; पुण्यापाठोपाठ मुंबईचा दौरा, काय आहे नेमकं कारण?

amit shah : अमित शहा हे दोन दिवशीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील चर्चा करणार आहे.

अमित शहा पुन्हा महाराष्ट्रात; पुण्यापाठोपाठ मुंबईचा दौरा, काय आहे नेमकं कारण?
| Updated on: Aug 08, 2026 | 9:15 AM
Share

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे काही दिवसांपूर्वी पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या पुण्याचा दौरा विरोधकांच्या आंदोलनामुळे चर्चेत राहिला. पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीने अमित शहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान आंदोलन केलं. पुण्यापाठोपाठ आता अमित शहा मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई दोन महत्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. अमित शहा हे मुंबई विभागीय भाजप आणि प्रदेश भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेत राजकीय आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

अमित शहा यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचे अधिकृतरित्या उद्‌घाटन करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी या संस्थेचं नवीन कार्यालय बांधण्यात आलं आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला सहकार आमि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा हे मुंबई शेअर बाजारातील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहे. दोन्ही कार्यक्रमांत सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधणार असल्याचे कळतंय. या दौऱ्यादरम्यान राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे.

अमित शहा रात्रीच मुंबईत पोहोचले 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता विमानाने मुंबईत पोहोचले. मुंबई अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत केलं. शहा यांचे मुंबईच्या विमानतळावर आगमन झालं, त्यावेळी स्वागताला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा देखील होते.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी अमित शहा पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात अमित शहा यांनी देशातील घडामोडींवर भाष्य केलं नव्हतं. परंतु आता मुंबईतील दौऱ्यावर देशातील घडामोडींवर काय भाष्य करतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल