AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार?’, नारायण राणे उद्धव ठाकरेंवर कडाडले

"मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती आलीय का? कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार?", असे सवाल नारायण राणेंनी केले.

'कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार?', नारायण राणे उद्धव ठाकरेंवर कडाडले
| Updated on: Nov 06, 2022 | 3:03 PM
Share

मुंबई : राज्यातील राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या साडेतीन महिन्यांपासूनच्या घडामोडी तेच सांगत आहेत. भाजपकडून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेसारखी फूट पडेल, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय. तसेच काँग्रेस पक्षातील तब्बल 22 आमदार फुटणार असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केल्याने खळबळ उडालीय. या सगळ्या राजकीय घडामोडींदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्यात मध्यावधी निवडणुका कधी लागू शकतात. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. पण त्यांच्या याच सूचनांवरुन भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडकून टीका केलीय.

“मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती आलीय का? कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? काही कारण असलं पाहिजे ना! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कारण सांगावं की, या कारणासाठी मध्यावधी निवडणूक होईल. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात का? पण तसं नाही होत. त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं, असं मला वाटत नाही. कारण अभ्यासू किंवा वैचारिक पद्धतीने त्यांनी सूचना दिलेली नाही. घरबसल्या बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं”, असा घणाघात नारायण राणेंनी केला.

राणेंची ऋतुजा लटकेंवर टीका

दरम्यान, नारायण राणेंना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चत आहे. त्यामुळे लटके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरही टीका केलीय. त्यांच्या या टीकेवर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं.

“आधी जिंकून या, विजयी म्हणून शिक्कामोर्तब होऊ द्या, मग बोला. कधी काय बोलावं हे त्यांना अजून अवगत नाहीय. भाजपची मतं कुणाला पडली हे आम्ही आधी त्यांना पाठिंबा देऊन स्पष्ट केलं. आम्ही मध्येच लटकत नाहीत. आमचा निर्णय पक्का असतो. मी पोटनिवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं नाही. कारण सगळ्याच पक्षांनी लटकेंना पाठिंबा दिलेला होता”, अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.

‘अजित पवारांची नाराजी फडणवीसांना कळेल’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील चिंतन शिबिरात काल अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे ते नाराज आहेत, अशी चर्चा आहे. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता अजित पवारांची नाराजी मला कशी कळेल? असा उलटसवाल केला. तसेच “अजित पवारांची नाराजी त्यांच्या जवळचे आहेत, आमचे देवेंद्र फडणवीस यांना जास्त माहिती आहे. त्यांना विचारुन सांगतो”, अशी मिश्किल टीप्पणी त्यांनी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.