राजू शेट्टी यांच्या आरोपावर मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया, थेट दाखवली कागदपत्रे आणि..
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचे थेट नाव पुढे आल्याने खळबळ उडाली. सतत होणाऱ्या आरोपांवर आता पहिली मोठी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यातील निलेश घायवळ प्रकरण ताजे असतानाच आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलीत. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचे थेट नाव पुढे आल्याने खळबळ उडाली. शेवटी यावर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले. राजू शेट्टी यांनी थेट या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केली. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राजू शेट्टी यांनी माझ्यावर आरोप करण्याच्या अगोदर एक वेळ माझ्यासोबत बोलायला हवे होते. मी त्यांना समजावून सांगितले असते आणि सत्य परिस्थिती ठेवली असती. जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार जो काही झाला, त्याला गोखले बिल्डर या व्यवसायिकाने विकत घेतलं, करार झाला, खरेदीखत झाला.
आता माझ्यावर आरोप असा झाला की, मी या गोखले बिल्डरचा पार्टनर आहे. मी माझ्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सर्वकाही माहिती दिली आहे. माझा शेतीचा व्यवसाय आहे आणि कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. पुणेकरांच्या मनात शंका राहू नये, म्हणून मी बोलतोय. मी गोखले यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये असताना कोणताही व्यवहार हा जैन बोर्डिंग हाऊसबद्दल झालेला नाही. एखाद्या राजकीय माणसाने व्यवसाय करू नये का?
पुढे बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, 25 नोव्हेंबर 2024 ला मी दोन्ही एलएलपीमधून बाहेर पडलोय. मंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी त्यासंदर्भातील कागदपत्रे दाखवताना देखील दिसले. डिसेंबर महिन्यात जैन मुनींनी जैन बोर्डिंग विकसित करण्याचा निर्णय बैठकीत घेतला, त्यावेळी मी या एलएलपीमधून अगोदरच बाहेर पडलो होतो. हेच नाही तर अनेक पेपरमध्ये याबद्दलची टेंडर नोटीसही टाकण्यात आली.
मुळात म्हणजे गोखलेंसोबत माझा कोणताही व्यवहार झाला नाही. जैन बोर्डिंगने ज्यावेळी हे विकण्याचा निर्णय घेतला, त्याच्या 11 महिने अगोदर मी एलएलपीमधून बाहेर पडलो होतो. तर मग मुरलीधर मोहोळचा या प्रकरणाशी संबंध कुठे आला? पुण्यातील जैन बांधवांचा माझ्यावर विश्वास आहे, पुण्यातील एकाही जैन बांधवाने माझ्यावर आरोप केला नाही, असेही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले.
