महिलांवरील असत्याचार रोखण्यासाठी तात्काळ ”शक्ती कायद्यास” चालना देण्याची गरज – नीलम गोऱ्हे

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन आरोपींना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे.

महिलांवरील असत्याचार रोखण्यासाठी तात्काळ ''शक्ती कायद्यास चालना देण्याची गरज - नीलम गोऱ्हे
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 10:37 PM

मुंबई : पेण इथल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात राज्यात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसत आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. अशा घटनांबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन आरोपींना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे. (Urgent need to launch Shakti Act to stop atrocities against women said by Neelam Gorhe)

पेण, रायगड इथल्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने एका 3 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. ही घटना 29 डिसेंबर 2020 रोजी समोर आली असून यातील आरोपी अद्याप फरार आहे. आरोपीला त्वरित अटक करण्यात यावे असे निर्देश स्थानिक पोलिसांना गोऱ्हे यांनी दिले आहेत.

पेणच्या प्रकरणामध्ये आरोपी हा पॅरोलवर बाहेर आला होता हे निष्पन्न झालं आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला पॅरोलवर सोडण्यात येऊ नये अशी विनंती न्यायालयास गृहविभागाकडून करण्याची सूचनाही गोऱ्हे यांच्याकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘शक्ती कायद्यात’ सायबर गुन्ह्यात देखील आरोपीला कडक कारवाई होण्याबाबत तरतूद केली गेली असली तरी देखील शक्ती कायदा लवकरात लवकर आस्तित्वात येण्यासाठी गृहविभागाकडून तात्काळ कार्यवाही अपेक्षित आहे. काही सामाजिक संस्थांना शक्ती कायद्यात काही उपयोजना सुचव्याचा आहेत. याबाबत सूचना मागविण्यासाठी स्वतंत्र ई-मेल घडण्याची आपणास सूचना करत असून कायद्याबाबत गठीत विधिमंडळाची बैठक लवकर घेण्याची सूचना गोऱ्हे यांनी केली आहे.

इतकंच नाही तर सर्व सोशल वेबसाईटवर लॉगीन करणाऱ्या सर्व व्यक्तीचे KYC च्या धर्तीवर त्याचे खात्याशी आधारकार्ड क्रमांक संलग्न करणे बंधनकारक करावे, जेणेरुन गैरप्रकार /सायबर गुन्हे/अत्याचार करणाऱ्या आरोपीची सर्व माहिती तात्काळ उपलब्ध होईल.

सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी मोठयाप्रमाणावर ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. किशोर वयापासून ऑनलाईन ॲप्‍लीकेशन वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑनलाईन माध्यमाचा वापर करुन होणाऱ्या गुन्हयांची/ गैरवापराची संख्याही वाढत आहे. यासाठी सायबर क्राईममधील तज्ञ व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ यांच्या समन्वयाने, विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन ॲप्लीकेशन वापर करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी ? कोणती माहिती/ फोटो शेअर करुन नये, याबाबतच्या शैक्षणीक घटकांचा शालेय अभ्यासक्रमांत अंतर्भाव करण्याबाबतही कार्यवाही करणे योग्य होईल. उपरोक्त नुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना निर्देश व्हावेत अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी गृहमंत्री देशमुख यांना केली आहे. (Urgent need to launch Shakti Act to stop atrocities against women said by Neelam Gorhe)

संबंधित बातम्या – 

अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, जामिनावर सुटलेल्या आरोपीचं दुष्कृत्य

रेखा जरे यांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी बाळ बोठेला अटक नाहीच, नगरमध्ये तीव्र पडसाद

मुंबईत धक्कादायक घटना! सासऱ्याने केली सुनेची हत्या, कारण वाचून हादराल

(Urgent need to launch Shakti Act to stop atrocities against women said by Neelam Gorhe)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.