AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valmik Karad Surrender: वाल्मिकी कराड याचा शरण येण्याचा टाइमिंगवर काँग्रेसचा प्रश्न? तर रोहित पवार म्हणाले…

Valmik Karad Surrender: खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलिस किंवा सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाही. तो स्वतःच्या गाडीतून पोलिसांना शरण आला. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

Valmik Karad Surrender: वाल्मिकी कराड याचा शरण येण्याचा टाइमिंगवर काँग्रेसचा प्रश्न? तर रोहित पवार म्हणाले...
वाल्मिक कराड
| Updated on: Dec 31, 2024 | 2:20 PM
Share

Valmik Karad Surrender: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मास्टर माईंड संशय असलेला वाल्मिक कराड अखेर २२ दिवसांनी पोलिसांना शरण आला. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी वाल्मिकी कराड याला शरण येण्यासाठी २२ दिवस लागले, त्या दरम्यान त्याने काय केले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या २२ दिवसांत वाल्मिकी कराड याने सर्व पुरावे रद्द केले, असा दावा विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी जनतेच्या उठावामुळे वाल्मिकी कराड शरण आल्याचे म्हटले.

विजय वड़्डेटीवार काय म्हणाले?

सोशल मीडिया एक्सवर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलिस किंवा सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाही. तो स्वतःच्या गाडीतून पोलिसांना शरण आला. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही. इतके दिवस वाल्मिक कराड याला लपायला कोणी मदत केली? तो कोणाच्या संपर्कात होता? कोणाच्या सांगण्यावरून तो आता पोलिसांना शरण आला? हे सर्व बाहेर आले पाहिजे.

महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्या मंत्र्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी वाल्मिकी कराड याला शरण येण्याचे आदेश दिले आहेत का? असा प्रश्न विजय वड्डेटीवार यांनी उपस्थित केला. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, या वाल्मिक कराडची हिंमत तर इतकी की शरण होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे.

रोहित पवार म्हणतात…

रोहित पवार यांनी वाल्मिकी कराड याचे शरण येणे म्हणजे जनतेचा उठाव असल्याचे म्हटले. आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. तपास करताना या गुन्ह्यात कोणतेही कच्चे दुवे राहणार नाहीत याचीही पोलिसांनी काळजी घ्यावी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.