AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर पाकिस्तानात चालते व्हा… अबू आजमींवर भाजप नेते भडकले; वंदे मातरमचा वाद पेटला

महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये संपूर्ण 'वंदे मातरम' गायन सक्तीचे केले आहे. 'वंदे मातरम'च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त हा निर्णय घेण्यात आला. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी यावर आक्षेप घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने आझमींवर तीव्र शब्दांत टीका करत "भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा" असा इशारा दिला.

तर पाकिस्तानात चालते व्हा... अबू आजमींवर भाजप नेते भडकले; वंदे मातरमचा वाद पेटला
अबू आजमींवर भाजप नेते भडकले; वंदे मातरमचा वाद पेटला
| Updated on: Oct 30, 2025 | 2:33 PM
Share

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम पूर्ण स्वरूपात म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गाण्याच्या रचनेच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त हा आदेश जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत सरकारी आदेशांनुसार शाळांमध्ये वंदे मातरमचे फक्त पहिले दोन श्लोक गायले जात होते. तथापि, ३१ ऑक्टोबर २०२५ (कार्तिक शुद्धी नवमी) रोजी या गाण्याच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गीत गायले जाईल.

मात्र समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी याच मुद्यावरून आक्षेप घेतला असून “वंदे मातरम बंधनकारक करणं योग्य नाही” असं म्हटलं आहे. त्यांच्य या भूमिकेनंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतल आहे. मंगलप्रभात लोढा तसेच नवनाथ बन यांनी आझमींवर जोरदार निशाणा साधला आहे. भारत माता, आणि वंदे भारतची ॲलर्जी असेल तर त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन राहावे, अबू अजमी यांनी देश सोडून जावेव,पाकिस्तानात जावं ही सुनावण्यात आलं.

हा पाकिस्तान नव्हे भारत आहे

भारतीय जनता पक्षाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तर अबू आझमींवर चांगलाच निशाणा साधला. ” अबू आझमींना कळलं पाहिजे हा पाकिस्तान नाही, तर भारत आहे . नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा भारत आहे, देवेंद्रजींचा महाराष्ट्र आहे. भारत मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा ” असं लोढा यांनी सुनावलं. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

अबू आझमी यांच्या मतदारसंघातील लोकांना आवाहन आहे त्यांच्या घरी जा आणि वंदे मातरम दिन आमच्यासोबत साजरा करा. वंदे मातरम स्वतंत्र्याचे गीत होते, मंत्र होता, आज पण याचे उच्चारण होते. या गीताला 150 वर्षं पूर्ण होत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठा कार्यक्रम साजरा करणार आहोत. कोणाची हिंमत असेल तर समोर यावं, नाहीतर आमचे कार्यकर्ते तुमच्या घरासमोर येत वंदे मातरमचे गायन करतील असा इशराही मंगलप्रभात लोढा यांना दिला.

वंदे भारतची ॲलर्जी असेल तर त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन रहा

भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी देखील अबू आझमींवर जोरदार टीका केली. भारतात राहयचं असेल तर वंदे मातरम्, भारत माता की जय म्हणाव लागेल. भारत माता, आणि वंदे भारतची ॲलर्जी असेल तर त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन राहावे.वेदांपेक्षा आम्हाल वंदे मातरम् प्रिय आहे. अबू अजमी यांना द्वेष असेल तर त्यांनी देश सोडून जावा अशा शब्दात नवनाथ बन यांनी आझमीवर निशाणा साधला.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.