India vs Pakistan Score Updates, U19 World Cup 2026: भारताचा पाकिस्तानवर 58 धावांनी विजय
India vs Pakistan Cricket Updates, U19 World Cup 2026 Match Updates And Highlights in Marathi : भारताने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलंय. भारताने पाकिस्तानला लोळवून ही कामगिरी केली. भारताची उपांत्य फेरीत पोहचण्याची ही सलग सहावी वेळ ठरली.

टीम इंडियाच्या अंडर 19 युवा ब्रिगेडने धमाका केलाय. अंडर 19 टीम इंडियाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवून ही कामगिरी केली आहे. भारताने पाकिस्तानसमोर 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानला नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हे आव्हान 33.3 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. त्यात पाकिस्तान टीम अपयशी ठरली. इतकंच काय तर पाकिस्तानला 50 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने पाकिस्तानचं 46.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. भारताचा हा या स्पर्धेतील एकूण पाचवा विजय ठरला. आता टीम इंडिया उपांत्य फेरीत अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार आहे. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चढाओढ असणार आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : कनिष्क चौहान मॅन ऑफ द मॅच
पाकिस्तान विरुद्द बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देणारा कनिष्क चौहान हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. कनिष्कने 29 बॉलमध्ये 35 रन्स केल्या. त्यानंतर कनिष्कने 10 ओव्हरमध्ये 30 रन्स देत 1 विकेट मिळवली.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : भारताचा पाकिस्तानवर 58 धावांनी विजय
अंडर 19 टीम इंडियाने सुपर 6 मधील सामन्यात पाकिस्तानवर 58 धावांनी मात केली आहे. भारताने पाकिस्तानसमोर 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानने गुडघे टेकले. भारताने पाकिस्तानला 194 धावांवर गुंडाळलं. भारताने यासह हा सामना जिंकला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीत धडक दिली आहे.
-
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : भारत निकालाआधीच सेमी फायनलमध्ये, पाकिस्तान जिंकली तरीही शून्य फायदा
टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानला नेट रनरेटनुसार उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हे आव्हान 33.3 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. पाकिस्तान यात अपयशी ठरली. अशाप्रकारे भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : पाकिस्तानला झटपट 2 झटके, टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित
टीम इंडियाने पाकिस्तानला झटपट 2 झटके दिले आहेत. आर एस अंब्रिश याने पाकिस्तानचा कॅप्टन फरहान यूसुफ याला 38 रन्सवर आऊट केलं. तर त्यानंतर भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे याने अहमद हुसैन याला 2 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती 31.1 ओव्हरमध्ये 4 आऊट 159 अशी झाली आहे. यासह टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. पाकिस्तानला नेट रनरेटच्या हिशोबाने उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी 253 धावांचं आव्हान हे 33.3 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. मात्र हे आता अशक्य आहे. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : टीम इंडिया विकेट घ्या विकेट, पाकिस्तान भक्कम स्थितीत
पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध 253 धावांचा पाठलाग करताना 24 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 122 धावा केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 26 ओव्हरमध्ये 131 धावांची गरज आहे. मात्र पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हे आव्हान 34 ओव्हरच्या आतच पूर्ण करायचं आहे. आता पाकिस्तानला तसं करण्यापासून रोखण्यासाठी भारताला विकेट घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांकडून धारदार बॉलिंगची अपेक्षा आहे.
-
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : पाकिस्तानला दुसरा झटका, हामझा झहरूला अर्धशतकापासून रोखलं
टीम इंडियाने पाकिस्तानला दुसरा झटका दिला आहे. कनिष्क चौहान याने हामझा झहूर याला आऊट केलं आहे. कनिष्कने यासह हामझाला अर्धशतकापासून रोखलं आहे. हामझाने 49 बॉलमध्ये 42 रन्स केल्या.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : हमझा जहूर-उस्मान खान जोडी जमली, टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात
पाकिस्तानची हमझा जहूर आणि उस्मान खान ही जोडी जमली आहे. भारताने 252 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 23 धावांवर पहिला झटका दिला. हेनिल पटेल याने समीर मिन्हास याला 9 धावांवर आऊट केलं. त्यानंतर हमझा झहूर आणि उस्मान खान ही जोडी जमली आहे. या दोघांनी पाकिस्तानला 13 ओव्हरमध्ये 75 धावांपर्यंत पोहचवलं आहे. उस्मान 26 आणि हामझा 37 धावांवर खेळत आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : पाकिस्तनाला पहिला झटका, समीर मिन्हास आऊट, हेनिल पटेलकडून शिकार
हेनिल पटेल याने पाकिस्तानला पहिला झटका दिला आहे. हेनिलने पाकिस्तनाचा ओपनर समीर मिन्हास याला आऊट केलं आहे. समीर मिन्हास याने 11 बॉलमध्ये 2 फोरसह 9 रन्स केल्या.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : पाकिस्तनाच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 253 धावांचं आव्हान
पाकिस्तनाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानकडून हमझा झहूर आणि समीर मिन्हास ही सलामी जोडी मैदानात आली आहे. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 253 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मात्र पाकिस्तानल उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हे आव्हान 33.3 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : टीम इंडिया ऑलआऊट, पाकिस्तान विरुद्ध 252 धावा
पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर टीम इंडिया 50 ओव्हर खेळण्यात अपयशी ठरली आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला 1 बॉलआधी ऑलआऊट केलंय. भारताने पाकिस्तान विरुद्ध 252 धावा केल्या. भारतासाठी वेदांत त्रिवेदी याने सर्वाधिक 68 धावांचं योगदान दिलं. आता पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हे विजयी आव्हान नेट रनरेटच्या हिशोबाने पूर्ण करावं लागणार आहे. पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी 253 धावांचं आव्हान हे 33.3 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : आरएस अंब्रिश माघारी, भारताला सातवा झटका
पाकिस्तानने भारताला सातवा झटका दिला आहे. आरएस अंब्रिश माघारी परतला आहे. आरएस अंब्रिश याने 38 बॉलमध्ये 2 फोरसह 29 रन्स केल्या. अंब्रिशनला अली रझा याने आऊट केलं.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : वेदांत त्रिवेदी आऊट, भारताला सहावा झटका
पाकिस्तानने टीम इंडियाला मोठा आणि सहावा झटका दिला आहे. मोमिन कमर याने वेदांत त्रिवेदी याला आऊट करत मोठी खेळी करण्यापासून रोखलं आहे. वेदांतने 98 बॉलमध्ये 68 रन्सची खेळी केली. वेदांतने या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. वेदांत आऊट झाल्याने भारताचा स्कोअर 40.2 ओव्हरमध्ये 6 आऊट 182 असा झाला आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : वेदांत त्रिवेदी आणि आरएस अंब्रिस जोडी जमली
वेदांत त्रिवेदीने भारताचा डाव सावरला आहे. अर्धशतकी खेळी केल्यानंतर शतकाच्या दिशेने कूच सुरू केली आहे. दुसरीकडे, त्याला आरएस अंब्रिशची साथ मिळताना दिसत आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना या जोडीकडून अपेक्षा आहेत.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : टीम इंडियाला पाचवा धक्का, वेदांत त्रिवेदीची झुंज सुरूच
अभिज्ञान कुंडूच्या रुपाने टीम इंडियाला पाचवा धक्का बसला आहे. अभिज्ञानने 27 चेंडूत 16 धावा केल्या आणि बाद झाला. वेदांत त्रिवेदी एकाकी झुंज देत आहे. 150 धावांच्या भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : वेदांत त्रिवेदीची झुंज, पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक
वेदांत त्रिवेदी याने टीम इंडियासाठी अर्धशतक झलकावलं आहे. तसेच भारताने 30 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 140 धावा केल्या आहेत. वेदांतसह अभिज्ञान कुंदू खेळत आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : भारताला चौथा झटका, विहान मल्होत्रा आऊट
पाकिस्तानच्या अहमद हुसैन याने टीम इंडियाला चौथा झटका देत विहान मल्होत्रा आणि वेदांत त्रिवेदी ही सेट जोडी फोडली आहे. अहमदने विहानला त्याच्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. विहानने 43 बॉलमध्ये 21 रन्स केल्या.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : वेदांत-विहान जोडी जमली, टीम इंडियाच्या किती धावा?
पाकिस्तानने भारताला झटपट 3 झटके दिल्यानंतर विहान मल्होत्रा आणि वेदांत त्रिवेदी या दोघांना भारताचा डाव सावरला आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. तसेच भारताला 100 पार पोहचवलं आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : वेदांत-विहानचा संघर्ष सुरु, भारताला मोठ्या भागीदारीची गरज
भरताने अवघ्या 4 चेंडूत 3 विकेट्स गमावल्या. वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे आणि त्यानंतर एरॉन जॉर्ज हे झटपट आऊट झाले. त्यानंतर आता वेदांत त्रिवेदी आणि विहान मल्होत्रा या जोडीचा संघर्ष सुरु आहे. भारताने 15 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 75 धावा केल्या आहेत.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : भारताला तिसरा झटका, ओपनर एरॉन जॉर्ज आऊट
मोहम्मद सय्याम याने आठव्या ओव्हरमध्ये भारताला 2 झटके देत बॅकफुटवर फेकलं. त्यानंतर अब्दुल सुभान याने नवव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर भारताला तिसरा झटका दिला. सुभानने ओपनर एरॉन जॉर्ज याला आऊट केलं. एरॉनने 25 बॉलमध्ये 16 रन्स केल्या. एरॉन आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 8.1 ओव्हरमध्ये 3 आऊट 47 असा झाला आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : भारताला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके, वैभवनंतर आयुष म्हात्रे आऊट
टीम इंडियाच्या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद सय्याम याने धमाका केला. सय्याम याने भारताच्या स्टार जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सय्यामने आधी आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर वैभव सूर्यवंशीला 30 रन्सवर आऊट केलं. त्यानंतर ओव्हरमधील सहाव्या अर्थात शेवटच्या बॉलवर सय्यामने आयुष म्हात्रे याला मैदाानाबाहेरचा रस्ता दाखवला. आयुषसा भोपळाही फोडता आला नाही.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : भारताच्या सलामी जोडीची संयमी सुरुवात, वैभवच्या किती धावा?
वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज या भारताच्या सलामी जोडीने संयमी सुरुवात केली आहे. या दोघांनी 6 ओव्हरमध्ये 35 धावा जोडल्या आहेत. वैभव 20 आणि एरॉन 14 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
काय स्वस्त आणि काय महाग… जाणून घ्या…
नक्की काय स्वस्त आणि काय महाग, घ्या जाणून…
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Score Updates : सामन्याचा थरार सुरु, भारताची बॅटिंग
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 6 फेरीतील सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज ही सलामी जोडी बॅटिंगसाठी मैदानात आली आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Updates : पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन
हमजा जहूर (विकेटकीपर), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (कर्णधार), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम आणि अली रझा.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल आणि दीपेश देवेंद्रन.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Updates : पाकिस्तानने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय
पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. कर्णधार फरहान यूसुफ याने फिल्डिंगचा निर्णय करत भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. अशात पाकिस्तानसमोर भारताला कमी धावसंख्येवर रोखण्याचं आव्हान असणार आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Updates : उपांत्य फेरीतील एका स्थानासाठी चुरस? उर्वरित 3 संघ कोणते?
अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंडने धडक दिली आहे. तर चौथा संघ कोणता असणार? हे भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Updates : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सुपर 6 सामना, किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर 6 फेरीतील सामन्यातील पहिला चेंडू भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता टाकला जाणार आहे. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Updates : अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तान टीम
हमजा जहूर (विकेटकीपर), समीर मिन्हास, उस्मान खान, फरहान युसफ (कॅप्टन), अहमद हुसैन, हुजैफा अहसान, मोहम्मद शायन, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा, उमर झैब, अली हसन बलोच, दानियाल अली खान आणि निकाब शफीक.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Updates : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंडर 19 टीम इंडिया
आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), कनिष्क चौहान, आरएस अंबरिश, खिलन पटेल, हेनिल पटेल, उद्धव मोहन, हरवंश पंगालिया, मोहम्मद एनान, दीपेश देवेंद्रन आणि किशन कुमार सिंग.
-
U19 WC 2026 IND vs PAK Live Updates : भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना
उपांत्य फेरीसाठी आज रविवारी 1 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.
Published On - Feb 01,2026 11:46 AM
