AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःला महादेवाचा अवतार म्हणणारा वसईचा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य कोण? संपूर्ण कुंडली समोर

वसईतील आमची वसई संस्थेचा संस्थापक ऋषिकेश वैद्य याच्यावर पुण्याच्या एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. स्वतःला महादेवाचा अवतार सांगून आणि अध्यात्माच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या या भोंदू बाबाचा पोलीस शोध घेत आहेत.

स्वतःला महादेवाचा अवतार म्हणणारा वसईचा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य कोण? संपूर्ण कुंडली समोर
Rushikesh Vaidya
| Updated on: Mar 27, 2026 | 1:15 PM
Share

सध्या राज्यात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची सातत्याने चर्चा आहे. त्यातच आता अध्यात्म आणि धर्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदूगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार वसईत उघडकीस आला आहे. स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणारा आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख असलेला ऋषिकेश वैद्य याच्यावर एका ३५ वर्षीय महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे. सध्या पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेनंतर ऋषिकेश वैद्य कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. नुकतंच याची सविस्तर माहिती समोर आली आहे.

कोण आहे ऋषिकेश वैद्य?

ऋषिकेश वैद्य हा वसई परिसरातील एक स्वयंघोषित धर्मगुरू आणि ‘आमची वसई’ नावाच्या संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष आहे. तो वसई (पश्चिम) येथील स्टेला परिसरात असलेल्या ‘ॐ राधा कृष्णा’ इमारतीमध्ये तळमजल्यावर आपल्या कुटुंबासह राहतो. सध्या त्याच्या घरात आई आणि भाऊ राहत असल्याची माहिती समोर येत आहे.

ऋषिकेश वैद्य हा ‘आमची वसई’ या संस्थेच्या माध्यमातून वसई-विरार पट्ट्यात सक्रिय होता. या संस्थेच्या नावाने तो सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करायचा. वसई किल्ल्यातील दीपोत्सव, शहरातील विविध धार्मिक उत्सव आणि आध्यात्मिक प्रवचने त्याने केली होती. याद्वारे त्याने हिंदू धर्मातील तरुण, तरुणी आणि महिलांना मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित केले होते. धर्माच्या नावाखाली तो समाजप्रबोधन करत असल्याचा आव आणायचा.

स्वतःला अध्यात्मिक गुरू मानणारा ऋषिकेश सोशल मीडियाचा वापर करून लोकांच्या संपर्कात राहायचा. याच माध्यमातून त्याने पीडित महिलेशी ओळख वाढवून तिला अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढले. यानतंर तिची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील एका महिलेला अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जाळ्यात ओढून स्वतःला महादेवाचा अवतार म्हणवून घेत ऋषिकेश वैद्य नावाच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये पुण्यातील एका लॉजवर महिलेला गुंगीकारक पदार्थ देऊन अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, तसेच मे २०२५ मध्ये वसईतील एका हॉटेलमध्ये पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पुढील तपासासाठी पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, सध्या फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?