Video : अजित पवारांकडून उस्मानाबादेत माणुसकीचं दर्शन, मुसळधार पाऊस सुरु असल्याने ‘गार्ड ऑफ ऑनर’ नाकारला

| Updated on: Jun 18, 2021 | 4:33 PM

उस्मानाबाद शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु होता. अशावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय अजितदादांचा ताफा पोहोचला असता त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलीस पुढे सरसावले. मात्र पावसात भिजणाऱ्या पोलिसांनी पाहून अजितदादांना गार्ड ऑफ ऑनर नाकारला.

Video : अजित पवारांकडून उस्मानाबादेत माणुसकीचं दर्शन, मुसळधार पाऊस सुरु असल्याने गार्ड ऑफ ऑनर नाकारला
अजित पवारांनी गार्ड ऑफ ऑनर नाकारला
Follow us on

उस्मानाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आज मराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची परिस्थिती आणि खरिपाच्या पेरणीबाबत आढावा घेण्यासाठी अजित पवार दोन्ही जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी उस्मानाबाद शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु होता. अशावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय अजितदादांचा ताफा पोहोचला असता त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलीस पुढे सरसावले. मात्र पावसात भिजणाऱ्या पोलिसांनी पाहून अजितदादांना गार्ड ऑफ ऑनर नाकारला आणि पोलिसांना भिजू नका असं सांगितलं. (Ajit Pawar declined guard of honor in Osmanabad due to heavy rains)

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे येत असल्यामुळे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तयारी केली होती. मात्र, अजित पवार आण राजेश टोपे दाखल झाले त्यावेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. अशावेळी पोलीस कर्मचारी मंत्रिमहोदयांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पुढे सरसावले. अजित पवार यांनी गाडीतून उतरताच पोलिसांना भिजू नका असं सांगत गार्ड ऑफ ऑनर नाकारला. अजित पवार हे आपली धडाडीची कार्यशैली आणि रोखठोक बोलीमुले नेहमीच चर्चेत असतात. आज उस्मानाबादमध्ये अजित पवारांनी दाखवलेली माणुसकीही चर्चेचा विषय ठरली आहे.

कोरोना परिस्थितीचा आढाव्यासाठी बैठक

अजित पवार उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि खरिपाची पेरणी याविषयीचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सतिश चव्हाण, शिक्षक आमदार सुरेश धस, विधान परिषदेचे आमदार सुरेश धस, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन आणि अन्य अधिकारी उपस्थित आहेत.

बीडमध्ये अजितदादांचा ताफा अडवला

कोरोना आणि खरीपाची पेरणी याबाबत आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार आणि राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला पालकमंत्री धनंजय मुंडे, सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा बाहेर पडत असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताफा अडवला. सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी शेकडो कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळा झाले होते. त्यात महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अजित पवारांना भेटू देण्याची मागणी केली. मात्र, त्यांची भेट दिली गेली नाही. बैठक संपल्यानंतर अजित पवार आणि राजेश टोपे यांचा ताफा निघाला असता तो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अडवला. तेव्हाही या कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेताच मंत्र्यांच्या गाड्या पुढे निघाल्या. त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

संबंधित बातम्या : 

Video : ‘अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं’, बीडमधील लाठीमाराच्या प्रकारानंतर पंकजा मुंडेंची टीका

Video : अजित पवारांच्या बैठकीदरम्यान मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, तरुण पोलिसांच्या ताब्यात

Ajit Pawar declined guard of honor in Osmanabad due to heavy rains