Video : अजित पवारांच्या बैठकीदरम्यान मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, तरुण पोलिसांच्या ताब्यात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हा तरुण अजित पवारांची भेट घेऊ इच्छित होता. मात्र, पोलिसांनी या तरुणाला रोखलं असता त्याने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली.

Video : अजित पवारांच्या बैठकीदरम्यान मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, तरुण पोलिसांच्या ताब्यात
बीडमध्ये अजित पवारांच्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी तरुणाची घोषणाबाजी
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 2:49 PM

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवार यांच्यासह या दौऱ्यात आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि खरीप पेरणीसंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जवळपास अडीच तास बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ही बैठक सुरु असतानाच एका तरुणाने अजित पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हा तरुण अजित पवारांची भेट घेऊ इच्छित होता. मात्र, पोलिसांनी या तरुणाला रोखलं असता त्याने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी हा तरुण करत होता. (Youth Sloganeering for Maratha reservation at Ajit Pawar’s meeting in Beed)

अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. त्यावेळी हनुमान फफाळ या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत अजित पवारांना भेटण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. पोलिसांनी संबंधित तरुणाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून बाहेर काढलं. त्यावेळी या तरुणाने घोषणाबाजीला सुरुवात केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा या तरुणाने दिल्या. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीमार

दुसरीकडे अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार आज बीडमध्ये घडला. जिल्हाधिकारी कार्यालयाती बैठक संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा बाहेर पडत असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताफा अडवला. सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी हजारो कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळा झाले होते. त्यात महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अजित पवारांना भेटू देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी भेट दिली गेली नाही. बैठक संपल्यानंतर अजित पवार आणि राजेश टोपे यांचा ताफा निघाला असता तो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अडवला. तेव्हाही या कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेताच मंत्र्यांच्या गाड्या पुढे निघाल्या. त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

संबंधित बातम्या :

जयंत पाटील शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना भेटणार; ‘या’ विषयावर होणार चर्चा

शिवसेना भवनासमोर राडा; अनिल परब म्हणतात, भाजपला उत्तर देऊ

Youth Sloganeering for Maratha reservation at Ajit Pawar’s meeting in Beed

Non Stop LIVE Update
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.