Video: वेल डन! फडणवीसांचा एक निर्णय, जो प्रत्येक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीनं कम्पलसरी राबवावा!

देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट, हिंगणा यांनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या 100 मुलांना मायेचा आधार दिलाय.

Video: वेल डन! फडणवीसांचा एक निर्णय, जो प्रत्येक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीनं कम्पलसरी राबवावा!
कोरोनामुळे अनाथ झालेल्या 100 मुलांचं पालकत्व फडणवीसांनी स्वीकारलं

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जवळचे लोक गमावले. काही मुलांनी तर आई-वडिलांना गमावलं. कोरोनानं छत्र हरवलेल्या अनाथ मुलांसाठी काही सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. अशावेळी सरकारी पातळीवर याबाबत काही ठोस निर्णयाची अपेक्षा सर्वांना आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट, हिंगणा यांनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या 100 मुलांना मायेचा आधार दिलाय. तर देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मुलांच्या खर्चाची जबाबदारी घेतल्याचं जाहीर केलंय. (Devendra Fadnavis adopt 100 Children orphaned by corona)

फडणवीसांनी 100 अनाथ मुलांचा हात दिला

नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी प्रमुख असलेल्या श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सोबत’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या 100 मुलांना आधार देण्याचं काम या ट्रस्टद्वारे करण्यात येत आहे. त्याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या मुलांची संपूर्ण जबाबदारी आपण घेतो. ट्रस्टने मुलांची सर्व व्यवस्था राबवावी, मी संपूर्ण पाठबळ देतो, असं म्हटलंय. त्याचबरोबर कुणाला हा विचार संकुचित वाटेल. पण मी ही एक लोकप्रतिनिधी आहे. मलाही मतदारसंघ आहे. या 100 मुलांव्यतिरिक्त दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जेवढे असे मुलं असतील त्या सर्वांची जबाबदारी मी घेईन, असं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिलंय.

‘इतरांकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार’

इतकंच नाही तर हा प्रकल्प पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी जाईन. ही व्यवस्था सुरु ठेवण्यासाठी दानशूर लोकांना बोलेन आणि त्यांच्याकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करेन, असं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिलंय.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी स्मृती इराणींचं आवाहन

कोरोनामुळे अनाथ झालेल्या या मुलांच्या पुढील पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची बेकायदेशीररित्या दत्तक प्रक्रियाही सुरू झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी आज देशातील जनतेला महत्त्वपूर्ण आवाहन केले. कोरोनामुळे अनाथ झालेली मुले तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील जवळचे कुणी नसेल तर त्या मुलांबाबत पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केले आहे.

कोरोना महामारीत अनेक कुटुंबे बळी ठरली आहेत. काही कुटुंबांमध्ये कर्ता पुरुष व पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्या दाम्पत्यांची मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्या जबाबदारीचा, पालनपोषणाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करीत केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आज एकापाठोपाठ एक ट्विट्स केले. या माध्यमातून त्यांनी अनाथ मुलांच्या योग्य पुनर्वसनासाठी एक विशेष मोहिमच हाती घेतली आहे.

संबंधित बातम्या :

कपडे-भांड्यांसाठी 5 हजार, नष्ट घरांसाठी दीड लाख, तौत्के वादळग्रस्त्रांना मदत जाहीर

मंत्रिमंडळाची मान्यता, वैद्यकीय शिक्षण विभाग 15 ते 20 हजार पदं भरणार : अमित देशमुख

Devendra Fadnavis adopt 100 Children orphaned by corona

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI