संख्याबळ असताना का घाबरले? घोडेबाजार का? नशा उतरलीच पाहिजे; संजय राऊत भाजपवर जोरदार बरसले

विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या घडामोडींवरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५० कोटी रुपयांचा 'घोडेबाजार' झाला. पुण्यापासून कोकणापर्यंत अनेक ठिकाणी माघारींसाठी हे पैसे वापरले गेले. राऊतांनी सत्ताधाऱ्यांच्या बहुमतावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाशी विसंगती दाखवली.

संख्याबळ असताना का घाबरले? घोडेबाजार का? नशा उतरलीच पाहिजे; संजय राऊत भाजपवर जोरदार बरसले
संजय राऊतांचे टीकास्त्र
| Updated on: Jun 05, 2026 | 11:00 AM

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठीचे अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी काल सर्वच पक्षातून प्रयत्न सुरू होते, बंडखोरांची मनधरणी करण्यात येत होती. काही ठिकाणी यश आलं. तर काही भागात प्रामुख्याने महाविकास आघाडील धक्का बसला. या सर्व घडमोडीनंतर आता ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा या विषयावर प्रतिक्रिया दिली.

पुरेसं संख्याबळ असतानाही घोडेबाजार का ?

दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च केले. पुण्यातील माघार, छत्रपचती संभाजीनगरमधील , कोकणातील माघार.. आज मी ट्टिटही केलंय. याशिवाय आणखी तीन ठिकाणीही माघार घेतल्याचे दिसून आले. माघारी आणि बिनविरोध यासंदर्भात जे व्यवहार झाले, त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च आले. ज्या 11 निवडणुका होणार आहे, तेथेहीव मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना माझं असं म्हणणं आहे की, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, मग असं असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

पंतप्रधान म्हणतात खर्च टाळा, मग पैसे उडवायची परवानगी आहे का ? 

मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, तुमच्याकडे जिंकून येण्याचं संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध , माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय, घोडेबाजार का करताय ? एका बाजूले देशाचा पंतप्रधान मोदी म्हणतात काटकसर करा , मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या- घोडे उडवू नका. मग अशा प्रकारे ( विधान परिषद निवडणुकांमध्ये) पैसे उडवायला परवानगी दिली आहे का ? असा खोच सवाल राऊत यांनी विचारला. कोटी कोटी रुपये उडवायला परवानगी दिली आहे का , कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले. त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या एका हॉटेलमध्ये दिले, असा आरोप राऊत यांनी केला. छ. संभाजीनगरमध्येही तेवढीच रक्कम देण्यात आली. पुण्यातले आकडे तर आज प्रसिद्धच झाले आहेत. उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलंय हे समोर आलंय, असं ते म्हणाले.

भाजपच्या कृपेने महाराष्ट्राच जे चित्र निर्माण झालंय, ते फक्त लोकशाहीला कलंक लावणारं नाही तर या महाराष्ट्राची प्रतिमा, प्रतिभा, संस्कृती यांनाही काळीमा फासणारा हा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली. तुमच्याकडे (सत्ताधारी) पुरेसं नव्हे तर पाशवी संख्याबळ आहे, पाशवी.. तरीही तुम्ही हे उद्योग का करत आहात ? तुम्हाला ही नशा चढली आहे, पैसे उडवायचे, माणसं विकत घ्यायचीच आहेतच. लोक पहात आहेत आणि आता झुरळं पण रस्त्यावर उतरायला लागली आहेत. तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेलं, असं राऊतांनी सुनावलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us