धनगर आरक्षणावरून आता भाजपचा आणखी एक खासदार आक्रमक; आंदोलनाचाही इशारा

ओबीसी आरक्षणावरून भाजपमधील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणावरूनही भाजपच्या मराठा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. (vikas mahatme warning of agitation for dhangar reservation)

धनगर आरक्षणावरून आता भाजपचा आणखी एक खासदार आक्रमक; आंदोलनाचाही इशारा
vikas mahatme

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी, नागपूर: ओबीसी आरक्षणावरून भाजपमधील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणावरूनही भाजपच्या मराठा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आता धनगर आरक्षणावरून भाजपचे खासदार विकास महात्मे यांनी दंड थोपटले आहेत. राज्य सरकारने धनगर समाजाला प्राधान्याने आरक्षण द्यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विकास महात्मे यांनी दिला आहे. (vikas mahatme warning of agitation for dhangar reservation)

खासदार विकास महात्मे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणासह विविध समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार आरक्षणाच्या चक्रव्युहात अडकलं आहे. मराठा, ओबीसी, पदोन्नतीतील आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी सरकारला इशारे देण्यात आले आहेत. धनगर आरक्षणासाठी तर या सरकारने काहीच केलं नाही, असा आरोप महात्मे यांनी केला आहे.

धनगर समाजाला एक हजार कोटी द्या

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केले होते. महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम धनगर समाजाला द्यावी, अशी मागणी करतानाच धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

फडणवीसांची टीका

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली. राज्य मागासवर्ग आयोग नेमण्यात आलं आहे. त्याचं स्वागतच आहे. पण 13-12-2019 रोजीच कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने राज्य मागासवर्ग आयोग नेमायला हवा होता. आता आयोग नेमणे म्हणजे सरकारला उशिरा सूचलेलं शहाणपण आहे. यात सरकारने बरेच महिने घालवले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ओबीसींना एकही जागा राहिली नसती

दुर्देव सुदैव काही म्हणा. कोरोनामुळे निवडणुका पुढे गेल्या आहेत. अन्यथा कोणत्याही स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींसाठी एकही जागा शिल्लक राहिली नसती, असं सांगतानाच आता सरकारला इम्पिरिकल डाटावर वेगाने काम करावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं. (vikas mahatme warning of agitation for dhangar reservation)

 

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग नेमणे हे उशिरा सूचलेलं शहाणपण; फडणवीसांची टीका

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री; अनलॉकच्या गोंधळावरून फडणवीसांचा टोला

‘भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला, आता चोराच्या उलट्या बोंबा’, पटोलेंचा पलटवार

(vikas mahatme warning of agitation for dhangar reservation)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI