AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचं दोन दिवस मॅरेथॉन मंथन, कोअर कमिटीचे बडे नेते हजर, विनोद तावडेंना स्थान नाही

भाजपचं येत्या 5 आणि 6 जानेवारी अर्थात उद्या आणि परवा सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत महामंथन होणार आहे.

भाजपचं दोन दिवस मॅरेथॉन मंथन, कोअर कमिटीचे बडे नेते हजर, विनोद तावडेंना स्थान नाही
विनोद तावडे
| Updated on: Jan 04, 2021 | 12:30 PM
Share

मुंबई : राज्य भाजपने मॅरेथॉन बैठकांचा आयोजन (BJP Meeting) केलं आहे. येत्या 5 आणि 6 जानेवारी अर्थात उद्या आणि परवा सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत महामंथन होणार आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुका, सध्याची राजकीय स्थिती, ग्राम पंचायत आणि महापालिकांच्या निवडणुका हे विषय फोकस असण्याची चिन्हं आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्य कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित असताना, विनोद तावडे यांना मात्र या बैठकीला स्थान देण्यात आलेलं नाही.  विनोद तावडे हे राज्य कार्यकारिणीमध्येही नाहीत. त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित राहू शकतात. मात्र पक्षाचा जुना जाणता नेता असताना, महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर असणं अपेक्षित नाही. (Vinod Tawde has no place  in Maharashtra BJPs marathon meeting  to be held on 5th & 6th January)

5 तारखेला प्रदेश पदाधिकारी आणि विविध मोर्चाच्या अध्यक्षांची बैठक आहे. तर संध्याकाळी 7 वाजता कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विनोद तावडे यांना कोर कमिटीत स्थान नाही. दुसऱ्या दिवशी 6 तारखेला पाचही महापालिका निवडणुकी संदर्भात इलेक्शन कमिटीची बैठक होणार आहे.

विनोद तावडेंना स्थान नाही

भाजपच्या या अतिमहत्त्वाच्या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीला विनोद तावडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय आहे. जरी विनोद तावडे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये असले, तरी राज्याच्या दृष्टीने तावडे हे भाजपमधील महत्त्वाचे नेते म्हणून चर्चेत होते. त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीटही मिळालं नाही. तेव्हापासून तावडेंची नाराजी दिसून आली आहे. त्यातच या बैठकीला तावडेंना निमंत्रण नसणं हे लक्ष वेधून घेणारं आहे.

भाजपची कोअर कमिटी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जुलै 2020 मध्ये राज्य भाजप कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यावेळी विनोद तावडे यांचं नाव नव्हतं.

भाजपची कार्यकारिणी 

महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

उपाध्यक्ष –माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष असतील

सेक्रेटरी –

माजी आमदार प्रमोद जठार, , संजय पुराम, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, अर्चना तेहटकर

विधानसभेत मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद माधुरी पिसाळ

(Vinod Tawde has no place in the BJP meeting)

संबंधित बातम्या : 

भाजपची कार्यकारिणी जाहीर, प्रीतम मुंडे राज्यात, पंकजा मुंडे केंद्रात

खडसे, तावडे, पंकजा मुंडेंना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.