खडसे, तावडे, पंकजा मुंडेंना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी?

भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराज नेत्यांचं राजकीय पुनर्वसन कसं होणार याबाबत अनेत तर्कवितर्क लावले जात आहेत (Possibility of Changes in BJP central Committee).

खडसे, तावडे, पंकजा मुंडेंना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी?
Follow us
| Updated on: Jul 18, 2020 | 1:45 PM

नवी दिल्ली : भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराज नेत्यांचं राजकीय पुनर्वसन कसं होणार याबाबत अनेत तर्कवितर्क लावले जात आहेत (Possibility of Changes in BJP central Committee). त्यातच आता पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार, एकनाथ खडसे, संभाजी निलंगेकर यांना भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी लवकरच पक्ष संघटनेमध्ये फेरबदल करुन या सर्व नेत्यांना थेट राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या टीममध्ये स्थान दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकतीच भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीचीही घोषणा झाली. यात अनेक नेत्यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे त्यांची लवकरच राष्ट्रीय स्तरावर वर्णी लागेल असा अंदाज लावला जात होता. त्याच पार्श्वभूमीवर आता याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप भाजपकडून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीची घोषणा करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील भूमिकेविषयी सूचक इशारा केला होता.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  शुक्रवारी (17 जुलै) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध विषयांवर दोघांची जवळपास दीड तास चर्चा चालली. या भेटीत देखील या राजकीय आणि संघटनात्मक बदलावर चर्चा झाल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र, फडणवीस यांनी या भेटीत असं काही झाल्याचं नाकारलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“ही राजकीय भेट नसून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात रस नाही” असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. “यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो. अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली,” अशी माहिती फडणवीस यांनी या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत दिली होती. फडणवीसांसह भाजपचे महाराष्ट्रातील चार नेतेही फडणवीस यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर होते.

संबंधित व्हिडीओ:

हेही वाचा :

आपआपसात मारामाऱ्या करा, पण लोकांचा फायदा करा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | “ही राजकीय भेट नाही, सरकार पाडण्यात रस नाही” फडणवीसांची अमित शाहांशी दीड तास चर्चा

Rajasthan Crisis | काँग्रेस आमदारांना आमिष देण्याबाबत कथित ऑडिओ क्लिप, केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा

Possibility of Changes in BJP central Committee

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.