Rajasthan Crisis | काँग्रेस आमदारांना आमिष देण्याबाबत कथित ऑडिओ क्लिप, केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Rajasthan Crisis | काँग्रेस आमदारांना आमिष देण्याबाबत कथित ऑडिओ क्लिप, केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा
Follow us
| Updated on: Jul 17, 2020 | 12:26 PM

जयपूर : राजस्थानमधील राजकीय नाट्य रंगतदार होत असताना एका कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. जयपूरमधील भाजप नेते संजय जैन यांच्यामार्फत काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांच्या संपर्कात राहून सरकार उलथण्यासाठी काँग्रेस आमदारांना लाच देण्याचा  दावा या कथित क्लिपमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rajasthan Political Crisis FIR against BJP Union Minister Gajendra Singh Shekhawat in alleged Audio Clip)

कथित ऑडिओ क्लिपची दखल घेत काँग्रेसने तात्काळ आमदार विश्वेंद्र सिंह आणि भवरलाल शर्मा यांचं पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“गुरुवारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमधून समोर आली. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजप नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकार पाडण्यासाठी आमदारांना लाच देण्याविषयी बोलत आहेत” असं सुरजेवाला म्हणाले.

“राजस्थान सरकार आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) यांच्याकडे एफआयआर नोंदवून दोषींना अटक करावी, अशी आमची मागणी आहे. कारण आता पुष्कळ पुरावे समोर आले आहेत.” असं सुरजेवाला यांनी सांगितलं.

त्यानंतर मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना पैशाचे आमिष दाखवल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. “मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. ऑडिओमध्ये माझा आवाज नाही” असा दावा शेखावत यांनी केला.

काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांचं प्राथमिक सदस्यत्व काँग्रेस पक्षाकडून रद्द करण्यात आलं आहे. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

आमदारांची यादी भाजपला देण्याच्या आरोपावर सचिन पायलट यांनी पुढे येऊन आपली भूमिका जाहीर करायला हवी, असेही सुरजेवाला म्हणाले.

दरम्यान, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप बनावट आहे. मुख्यमंत्र्यांसह विशेष कर्तव्यावर असलेले अधिकारी लोकेश शर्मा आमदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण मुख्यमंत्री तणावात आहेत, असा दावा आमदार भवरलाल शर्मा यांनी कथित ऑडिओ क्लिपबाबत केला.

संबंधित बातम्या :

सचिन पायलट हायकोर्टात, हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी खिंड लढवणार

फाडफाड इंग्रजी आणि हँडसम दिसणे पुरेसे नाही, गहलोतांचा पायलटांना टोला

(Rajasthan Political Crisis FIR against BJP Union Minister Gajendra Singh Shekhawat in alleged Audio Clip)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.