AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajasthan Political Crisis | सचिन पायलट हायकोर्टात, हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी खिंड लढवणार

उपमुख्यमंत्रीपदावरुन निलंबित झालेले युवा नेते सचिन पायलट यांनी जयपूर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Rajasthan Political Crisis | सचिन पायलट हायकोर्टात, हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी खिंड लढवणार
| Updated on: Jul 16, 2020 | 4:14 PM
Share

नवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय वाद आता उच्च न्यायालयात (Sachin Pilot Group Filed A Petition In High Court) पोहोचला आहे. उपमुख्यमंत्रीपदावरुन निलंबित झालेले युवा नेते सचिन पायलट यांनी जयपूर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटीसविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सतीश चंद शर्मा निर्णय देतील. या प्रकरणात सचिन पायलट गटाच्या वतीने हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी बाजू मांडतील (Sachin Pilot Group Filed A Petition In High Court).

“विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल अपात्र ठरवता येत नाही. तसेच, उत्तरासाठी दिलेली दोन दिवसांची मुदतही कमी आहे”, असा दावा पायलट यांनी केला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

सचिन पायलट यांच्या गटाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी नियमांचे पालन केले नाही, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस उपस्थित न राहिल्याबद्दल अपात्र ठरवता येत नाही. तसेच, उत्तरासाठी दिलेली दोन दिवसांची मुदतही कमी आहे, असा युक्तिवाद केला जात आहे.

या सुनावणीप्रकरणी राजस्थान सरकारच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडणार आहेत. राजस्थान विधानसभा अध्यक्षांच्या वतीने कॅव्हिएट दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाला निर्णय देण्यापूर्वी अशोक गहलोत यांचा पक्षही ऐकावा लागणार आहे (Sachin Pilot Group Filed A Petition In High Court).

आज झालेल्या सुनावणी दरम्यान, हरीश साळवे यांनी सचिन पायलट यांची बाजू मांडली. यावेळी, “विधानसभा अध्यक्ष सभागृहाबाहेरील प्रकरणांमध्ये नोटीस बजावू शकत नाही, हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही नोटीस लगेच रद्द करण्यात यावे”, अशा बाजू पायलट समर्थक गटाकडून न्यायालयात मांडण्यात आला.

राजस्थान उच्च न्यायालयात सचिन पायलट यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाल्याच्या काहीच वेळानंतर सुनावणीला स्थगिती देण्यात आली. आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे.

कोण आहेत हरीश साळवे?

हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आहेत. ते देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. त्यांची एका दिवसाची फी जवळजवळ 30 लाख रुपये असल्याचेही सांगितले जाते. मात्र, कुलभूषण जाधव प्रकरणात त्यांनी केवळ 1 रुपया घेतला होता.

साळवे हे 1999 से 2002 पर्यंत देशाचे सॉलिसिटर जनरल देखील होते. त्यांचे वडील एन. के. पी. साळवे काँग्रेसचे माजी खासदार आणि क्रिकेट प्रशासकीय मंडळावर होते. हरीश साळवे यांनी भारताच्या वतीने नेदरलँडमधील हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) बाजू मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडपणे उल्लंघन केल्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला.

सलमान खानलाही वाचवलं

मुंबई सेशन्स कोर्टाने अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर सलमान आणि कुटुंबीयांसह त्याच्या सर्व फॅन्सची धडधड वाढली. सलमानला थेट तुरुंगात नेलं जाणार असल्याचीही चर्चा झाली. मात्र तेव्हाच वरिष्ठ वकील हरीश साळवे यांची एंट्री झाली आणि अवघ्या काही तासांमध्ये सलमानला जामीन मिळाला. हरीश साळवे खास सलमानसाठी दिल्लीतून मुंबईत आले होते.

मोठ्या खटल्यांचा अनुभव

कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती. टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली आणि त्यांचं नाव देशभरात गाजलं. केंद्र सरकारसोबतच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली होती. इतकंच नाही, तर बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली. सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली होती.

Sachin Pilot Group Filed A Petition In High Court

संबंधित बातम्या :

काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ 300 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सचिन पायलट यांचे समर्थन भोवले, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचे पक्षातून निलंबन

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.