AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath School Bus : अंबरनाथमध्ये स्कूल बसेसकडून शासकीय नियमांचं उल्लंघन, भरारी पथकाने कारवाई करण्याची मागणी

अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांना निवेदन सुद्धा दिलं असून, या सगळ्याची पडताळणी करून शाळांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असं जतकर यांनी सांगितलं.

Ambernath School Bus : अंबरनाथमध्ये स्कूल बसेसकडून शासकीय नियमांचं उल्लंघन, भरारी पथकाने कारवाई करण्याची मागणी
अंबरनाथमध्ये स्कूल बसेसकडून शासकीय नियमांचं उल्लंघनImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 12:40 AM
Share

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या स्कूल बसेस (School Buses)कडून शासनाचे नियम पाळले जात नसल्याचा आरोप मनविसेनं केला आहे. याबाबत मनविसेनं अंबरनाथच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत भरारी पथका (Bharari Squad)मार्फत स्कूल बसेसवर कारवाई (Action) करण्याची मागणी केली आहे. कोरोना काळानंतर यंदाच्या वर्षीपासून नियमितपणे शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या स्कूल बसेस पुन्हा रस्त्यावर उतरल्या आहेत. या स्कूल बसेसची फिटनेस चाचणी आणि एक्सपायरी तपासण्यासह शासनाने 2011 साली घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन त्यांच्याकडून होतंय का? याची चाचपणी करण्याची मागणी मनविसेनं केली आहे.

शहराध्यक्ष धनंजय गुरव यांच्याकडून गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

अंबरनाथ शहरात सध्या अनेक खासगी शाळांकडून स्कूल बसेस चालवल्या जातायत. यापैकी अनेक स्कूल बसेसकडून नियम पाळले जात नाहीत. त्यामुळं गटशिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना सूचना द्याव्यात आणि त्यानंतरही शाळांनी स्कूलबसचे नियम पाळले नाहीत, तर आम्हाला शाळांची भेट घ्यावी लागेल, असं मनविसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांना निवेदन सुद्धा दिलं असून, या सगळ्याची पडताळणी करून शाळांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असं जतकर यांनी सांगितलं. अंबरनाथ शहरात अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. अनेक कंत्राटदार हे शासनाचे नियम पाळत नसून या सगळ्यावर कारवाई होण्याची आवश्यकता यानंतर व्यक्त होत आहे.

पनवेल परिसरात स्कूल व्हॅनला आग

सीएनजी पंपवर सीएनजी भरुन बाहेर पडताच स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. येथील नागरिकांनी प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणली. मात्र या स्कूल बसमध्ये विद्यार्थी नव्हते. फक्त चालकच होता. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र स्कूल व्हॅन जळून खाक झाली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. (Violation of government rules by school buses in Ambernath, demands of action by Bharari squad)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.