AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप

Vishakha Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यावरून राऊत यांनी सरवणकर यांच्यावर टीका केली आहे.

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप
Vishakha Raut and Sada SarwankarImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 21, 2026 | 7:58 PM
Share

रणजीत इंगळे, प्रतिनिधी :  मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नगरसेवक पदावर टांगती तलवार

जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा विषय अद्याप महापालिका सभागृहासमोर आलेला नाही. त्यामुळे राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. हा विषय सभागृहात मांडल्यानंतर त्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

जात समितीवर दबाव होता – राऊत

जात प्रमाणपत्र समितीच्या निर्णयानंतर विशाखा राऊत यांनी म्हटले की, ‘माझ्यावर दबाव नव्हता, त्या जिल्हा जात समितीवर दबाव होता. माझे पेपर व्यवस्थित आहेत, माझे आजोबा पालघरचे होते, म्हणून तिकडून मी सर्टिफिटेक काढले. त्यांच्यावर वेगळा दबाव होता, दबावातून हे सर्व झाले. मी 1911 आणि 1937 चा पुरावा दिला, मोडी लिपीचा पुरावा दिला. आजोबा पणजोबाचे पुरावे दिले असताना सर्टिफिटेक रद्द केले.’

सदा सरवणकर यांच्यावर आरोप

पुढे बोलताना विशाखा राऊत यांनी, ‘भाजपकडून दबाव नाही, शिंदेसेनेकडून दबाव आहे. मी कायदेशीर लढाई लढणार. सदा सरवणकर एक महिना आगोदर सांगून गेले, माझी मुलगी नगरसेवक होणार म्हणून. त्यांना स्वप्न पडले होते का? शिंदे यांनी स्क्रूटीनी समितीवर दबाव टाकला तसा दबाव मुंबई महापालिका मध्ये टाकतील असा आरोप केला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राऊत यांना नेमकं काय उत्तर दिले जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा