Sunetra Pawar: सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर, नांदेड दौऱ्यात बोअरवेलबाबत कडक निर्देश, दुष्काळ आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय काय?
DCM Sunetra Pawar Big Decision: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादांप्रमाणेच कामाचा धडाका लावला. त्यांनी सकाळी 9 वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयात आढाव घेतली. त्यात बोअरवेलबाबत कडक निर्देश दिले.

DCM Sunetra Pawar Big Decision: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दु्ष्काळाची आढावा बैठक घेतली. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याची आणि चाऱ्याची उपलब्धता, रब्बी पेरणीची स्थिती, तर आगामी काळातील नियोजन, उपाय योजनांविषयी बैठकीत सविस्तर आढावा घेतला. त्यात विंधन विहीर, बोअरवेलबाबत कडक निर्देश दिले. दरम्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीत आमदार खासदारांनी काजू बदाम खाल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या आढावा बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारल्याचे दिसून आले.
बोअरवेलबाबत कडक निर्देश
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुष्काळी आढावा बैठकीत अनेक महत्त्वाच्या मु्द्यावर आदेश दिले. या बैठकीला सर्व अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. शासन दुष्काळात सर्वा सोबत आहे.पाणी आणि चारा नियोजन केले जात आहे. याचा मी स्वतः आढावा घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शासन नियमाप्रमाणेच पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रखडलले प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यात भूजल पातळी वाढविण्यासाठी जल तारा प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवात केल्याची माहिती त्यांनी दिली.
200 फुटापेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदण्यावरवर बंदीचे कडक निर्देश त्यांनी दिले. चारा प्रश्नासाठी 3 कोटी मंजूर केल्याचे आणि 14 हजार शेतकर्यांना चारा वाटप केला गेल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकर्यांनी चारा पिके घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले. सक्तीने कर्ज वसुली करू नये. टंचाई निवारणासाठी नोडलं अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
धर्माबादमध्ये पाणी कपातीचा निर्णय
यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी धर्माबाद नगरपालिका प्रशासनाने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. बाभळी बंधारा आणि इळेगाव नदीपात्रातील जलसाठा केवळ जानेवारीपर्यंतच पुरेल एवढाच शिल्लक असल्याने दररोजचा पाणीपुरवठा ३ दशलक्ष लिटरवरून निम्म्यावर म्हणजेच दीड दशलक्ष लिटरवर आणला आहे. शहराची ४२ हजार ५०० लोकसंख्या लक्षात घेता ३ हजार नळजोडण्या, ९५ बोअरवेल आणि ३३ हातपंपांचे पर्याय उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी पाण्याची नासाडी रोखून काटकसरीने वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी केले आहे.
