AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा: राजू शेट्टी

एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. | Raju Shetty

राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा: राजू शेट्टी
. यापूर्वीही राजू शेट्टी यांनी अनेकदा वाढीव वीज भरण्याचा विरोध दर्शविला आहे. सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच, असे आव्हानही त्यांनी दिले होते.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 02, 2021 | 6:28 PM
Share

बारामती: राज्यातील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही. एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. (Raju Shetty warns Mahavikas Aghadi govt over electricity bill issue)

ते मंगळवारी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  यावेळी त्यांनी सरकारच्या वीजबिल वसुलीच्या निर्णयाला पुन्हा एकदा विरोध केला. यापूर्वीही राजू शेट्टी यांनी अनेकदा वाढीव वीज भरण्याला विरोध दर्शविला आहे. सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच, असे आव्हानही त्यांनी दिले होते.

5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीवर ‘टाळे ठोको’ आंदोलन; भाजप देणार आघाडी सरकारला शॉक

शेतकरी आणि वीज ग्राहकांना वीज कापण्यासाठी राज्य सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. या नोटीसा मागे घ्या अन्यथा येत्या 5 फेब्रुवारी रोजी राज्यात एमएसएईबीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

ज्य सरकारने शेतकरी आणि ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. वीज बिल न भरल्यास वीज कापण्याचा इशाराही सरकारकडून देण्यात आला आहे. सरकारची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. या नोटीसा सरकारने मागे घ्याव्यात. नाही तर 5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीच्या साडेसातशे मंडळांना टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रीतील 1 कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आमची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील काल आम्ही भेटलो. आम्ही सर्वांना निर्वाणीचा इशारा दिल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान

जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर

ठाकरे सरकार पिंजऱ्यातून बाहेर पडत नाही, शिवसेना सर्व बटण दाबून करते, नारायण राणेंनी फटकारले

(Raju Shetty warns Mahavikas Aghadi govt over electricity bill issue)

Follow Us
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण