रात्रीची वेळ होती, भरधाव कारची ट्रकला धडक; तीन जणांचा झाला घात

काल रात्री कारने थेट ट्रकला धडक दिली. यात कार ट्रकवर आदळून अपघात झाला. ही वाहनं नागपूरकडं येत होती.

रात्रीची वेळ होती, भरधाव कारची ट्रकला धडक; तीन जणांचा झाला घात
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 10:32 AM

वर्धा : दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावरील वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. आता रात्री एक मोठा अपघात झाला. समृद्धी महामार्गाने वेग वाढवला. पण, आता या वेगाचे बळी जाताना दिसत आहेत. काल रात्री कारने थेट ट्रकला धडक दिली. यात कार ट्रकवर आदळून अपघात झाला. ही वाहनं नागपूरकडं येत होती. कार ट्रकवर आदळल्याचे दिसत आहे. दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला.

या तिघांचा झाला मृत्यू

नागपूरकडे येणाऱ्या कारने नागपूरकडे येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. ज्योती क्षीरसागर, भरत क्षीरसागर, ( दोघेही रा. मालेगाव, वाशिम) आणि अमरावतीची फाल्गुनी सुरवाडे या तिघांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

हे सुद्धा वाचा

कोटंबा शिवारातील घटना

समृध्दी महामार्गावर भरधाव कारने ट्रकला मागाहून धडक दिली. त्यात कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटंबा शिवारात हा भीषण अपघात घडला. शनिवारी १ एप्रिल रोजी रात्री 11 च्या सुमारास हा अपघात घडला.

कारमधील तिघेही ठार

समृध्दी महामार्गावर एमएच ४० बी एल ८२३५ क्रमांकाचा ट्रक नागपूरकडे जात होता. दरम्यान नागपूरकडे जात असलेल्या एमएच ३७ जी ३५५८ क्रमांकाच्या अनियंत्रित झालेल्या कारने ट्रकला मागून धडक दिली. त्यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचालक डॉक्टर ज्योती क्षीरसागर, भरत क्षीरसागर राहणार मालेगाव, जिल्हा वाशिम आणि डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे राहणार अमरावती यांचा मृत्यू झाला.

मृतक ज्योती आणि फाल्गुनी या मैत्रिणी डेंटिस्ट डॉक्टर होत्या, असं सांगण्यात आलं. नागपूरला कामानिमित्त जात असताना हा अपघात घडला. घटनास्थळी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मोहन पारिसे, ज्ञानेश्वर कोराते, विनोद कोडापे यांनी भेट दिली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी नोंद केली.

घाटात दरी कोसळून एक ठार

दुसऱ्या एका घटनेत, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात गाडी दरीत कोसळली. सायंकाळच्या सुमारास हा अपघात झालाय. यात सुनील चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. सुनील चव्हाण हे कोल्हापूरहून अणुस्कुरा घाट मार्गाने पाचलला येत होते. तीव्र उताराहून स्विफ्ट गाडी जवळपास 300 फुटाच्या आसपास दरीत कोसळून सुनील चव्हाण यांचा जागीच मृत्यू झालाय.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.