Wardha : वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या घरी सापडली गर्भपातासाठी लागणारी शासकीय औषधं, सूत्रांची माहिती

| Updated on: Jan 16, 2022 | 1:03 AM

आर्वी पोलीस, वैद्यकीय विभाग आर्वी आणि वर्धा वैद्यकीय विभागाच्या चमूने सकाळी 11 वाजल्यापासून डॉ.कदम यांच्या घराची तपासणी केली. यावेळी शासकीय गर्भपात करण्यासाठी लागणारे इंजेक्शन घरी आढळल्याची माहिती मिळते.

Wardha : वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या घरी सापडली गर्भपातासाठी लागणारी शासकीय औषधं, सूत्रांची माहिती
वर्धा गर्भपात प्रकरणी आरोग्य विभागाकडून अद्याप तक्रार नाही
Follow us on

वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणानंतर आता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या धाड सत्रात रोज नवनवीन पुरावे पोलिसांच्या हाती लागत आहेत. शनिवारी डॉ. कदम यांच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये डॉ. कदम यांच्या घरातून काळवीटाच्या कातड्यासह गर्भापातासाठी वापरण्यात येणारी शासकीय औषधं सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. (Government medicine for abortion found at Dr. Kadam’s house in Wardha)

गर्भपातासाठी लागणारे इंजेक्शन आढळले

शनिवारी सकाळपासून कदम यांच्या घरात पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तपास करीत होते. आर्वी पोलीस, वैद्यकीय विभाग आर्वी आणि वर्धा वैद्यकीय विभागाच्या चमूने सकाळी 11 वाजल्यापासून डॉ.कदम यांच्या घराची तपासणी केली. यावेळी शासकीय गर्भपात करण्यासाठी लागणारे इंजेक्शन घरी आढळल्याची माहिती मिळते. तसेच घरातून आजच्या तपासात 25 ते 30 रजिस्टर जप्त केले आहेत. गर्भपात प्रकरणात आर्वी पोलिसांचा कसून तपास सुरूच आहे.

काळवीटाची कातडी प्रकरणी वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथील डॉ. कदम यांच्या घरात तपासणी दरम्यान काळवीटाची कातडी जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी हॉस्पीटल गाठून कातडी जप्त केलीय. काळवीटाची कातडी आढळल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.

आर्वी येथील डॉ. कदम रुग्णालयातील गर्भपात प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. याच प्रकरणाच्या तपासदरम्यान पोलीसांनी रुग्णालयाच्या वर असलेल्या कदम यांच्या घरात शोध मोहीम राबवली. त्यावेळी पोलिसांना घरात वन्यप्राण्याची कातडी आढळून आली तर काही कागदपत्रे जप्त केल्याचे माहिती आहे. कातडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या चमूनं पंचनामा करत कातडी जप्त केलीय. प्रथमदर्शनी ही कातडी मादी काळवीटाची असल्याचं वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं. जप्त केलेली कातडी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर ही कातडी कशाची आणि किती जुनी आहे, ही बाब स्पष्ट होईल, असं वनविभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केलयं. (Government medicine for abortion found at Dr. Kadam’s house in Wardha)

इतर बातम्या

Uttarakhand Crime : डेहराडूनमध्ये नात्याला काळिमा; सावत्र आईवर बलात्कार करुन जबरी मारहाण, गंभीर जखमी पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

Ulhasnagar Crime : सराईत गुंड ‘अंडापाव’ला गुजरातमधून अटक; उल्हासनगरातील अपहृत मुलीची सुखरूप सुटका