Uttarakhand Crime : डेहराडूनमध्ये नात्याला काळिमा; सावत्र आईवर बलात्कार करुन जबरी मारहाण, गंभीर जखमी पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

Uttarakhand Crime : डेहराडूनमध्ये नात्याला काळिमा; सावत्र आईवर बलात्कार करुन जबरी मारहाण, गंभीर जखमी पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आपल्या सावत्र आईवर वारंवार बलात्कार करायचा आणि त्यानंतर आईला मारहाणही करायचा. हत्येची घटना घडली त्यादिवशीनी त्याने असाच अत्याचार करून नंतर आईला बेदम मारहाण केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 16, 2022 | 12:39 AM

डेहराडून : वाढत्या गुन्हेगारीची कीड आता नातेसंबंधांना लागली आहे. डेहराडूनमध्ये अशीच एक नातेसंबंधांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. एका तरुणाने आपल्या सावत्र आईवर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर अत्याचार करून झाल्यानंतर त्याने आपल्या सावत्र आईला बेदम मारहाण करून जीवे ठार मारले. डेहराडूनमधील डाकपठार पोलीस चौकी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपीकडून वारंवार अत्याचाराचा अतिरेक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आपल्या सावत्र आईवर वारंवार बलात्कार करायचा आणि त्यानंतर आईला मारहाणही करायचा. हत्येची घटना घडली त्यादिवशीनी त्याने असाच अत्याचार करून नंतर आईला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

नशेत करायचा सावत्र आईवर बलात्कार

आरोपी तरुणाच्या बापाने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर पीडित महिलेशी लग्न केले होते. याच सावत्र आईवर आरोपीने अनेकदा बलात्कार केला आणि तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपी बुधवारी सायंकाळी दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने सावत्र आईवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच डाकस्टोन पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि जखमी महिलेला विकासनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला डेहराडूनला हलवण्यात आले. डेहराडूनच्या कोरोनेशन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पीडित महिलेला अधिक उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. परंतु महिलेच्या पती तसे न करता तिला विकासनगरला परत घेऊन येत होता. याचदरम्यान वाटेतच महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. (Rape and murder of stepmother in Uttarakhand, The accused absconded)

इतर बातम्या

High Court : कोरोनामुळे मुंबई हायकोर्टाच्या कामकाजाचे तास केले कमी; परिपत्रकाला सुप्रीम कोर्टात आव्हान

Ulhasnagar Crime : सराईत गुंड ‘अंडापाव’ला गुजरातमधून अटक; उल्हासनगरातील अपहृत मुलीची सुखरूप सुटका

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें