Video – खासदार रामदास तडस कुस्तीच्या आखाड्यात उतरतात तेव्हा… देवळीत खेळाडूंचा घेतला सराव!

खासदार रामदास तडस कुस्तीच्या आखाड्यात उतरले. तडस यांनी खेळाडूंचा सराव घेतला. देवळी येथे एप्रिल महिन्यात कुस्ती स्पर्धा आहे. त्याची ही तयारी...

Video - खासदार रामदास तडस कुस्तीच्या आखाड्यात उतरतात तेव्हा... देवळीत खेळाडूंचा घेतला सराव!
देवळीत आखाड्याचे प्रशिक्षण देताना खासदार रामदास तडस.
Image Credit source: tv 9
चेतन व्यास

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 05, 2022 | 12:24 PM

वर्धा : जिल्ह्याच्या देवळी येथे खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas) यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन एप्रिल महिन्यात केले आहे. या स्पर्धेकरिता देवळी येथील स्टेडियममध्ये (Stadium at Deoli) खेळाडू सराव करतात आहेत. विदर्भ केसरी कुस्ती (Vidarbha Kesari Wrestling) स्पर्धेचा सराव करत असलेल्या खेळाडूंना पाहण्यासाठी खासदार रामदास तडस हे स्टेडियमवर गेले होते. त्यावेळी त्यांना सरावात भाग घेण्याचा मोह आवरला नाही. खासदार तडस थेट आखाड्यात उतरले. आणि त्यांनी खेळाडूंना डावपेच शिकवले.

देवळीत विदर्भ कुस्ती स्पर्धेचं आयोजन

यावेळी उपस्थितांना त्यांच्यामधील कसलेला कुस्तीपटू पाहायला मिळाला. वर्धेचे खासदार रामदास तडस हे स्वतः विदर्भ केसरी राहिलेले आहेत. देवळी येथे एक ते तीन एप्रिल या कालावधीत विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन तडस यांनी केले आहे.

पाहा व्हिडीओ

कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय डावपेच!

खासदार तडस हे कुस्तीच्या आखाड्यात उतरले. त्यांनी एकेका खेळाडूला डावपेच सांगितले. तयारी कशी करायची. डाव कसा मारायचा, याचे प्रशिक्षण दिले. कुठे थांबायचं, दम कसा घ्यायचा. दमखम काय असतो, याची जाणीव खेळाडूंना करून दिली. मी फक्त राजकीय आखाडेच खेळत नाही, तर कुस्तीचे आखाडेसुद्धा खेळतो, हे त्यांनी दाखवून दिले. याच कुस्तीच्या आखाड्यात शिकून ते आता राजकीय डावपेचांचा वापर करत आहेत.

एटीएममध्ये रोकड भरण्याचे होते काम, 15 लाख रुपयांचा अपहार! खामगावातले प्रकरण काय?

नागपूर पोलीस आयुक्तांविरोधात सुपारी व्यापारी न्यायालयात! हायकोर्टात नेमकं काय झालं?

नागपूर मनपा निवडणूक, भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती, काँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती काय?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें