Wardha Youth Death : पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचा ओव्हरडोज, वर्ध्यात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सेवाग्राम रुग्णालयात रजतवर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी विचारपूस केली असता, त्याने पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले. सेवाग्राम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, 9 मार्च रोजी रजतचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरूवातीला सेवाग्राम पोलिसांत नोंद करण्यात आली.

Wardha Youth Death : पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचा ओव्हरडोज, वर्ध्यात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचा ओव्हरडोज, वर्ध्यात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 10:18 PM

वर्धा : पॅरासिटामॉल (Paracetamol) गोळ्यांचा ओव्हरडोज घेतल्याने 27 वर्षीय युवकाचा मृत्यू (Death) झाला आहे. या युवकावर तब्बल 40 दिवस उपचार करण्यात आले. मात्र डॉक्टरांना त्याला वाचविण्यात यश आले नाही. याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रजत मेंढे (27) असे मयत तरुणाचे नाव असून तो शिवाजी चौक येथील रहिवासी आहे. वर्ध्याच्या एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये तो सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. अनेकदा छोट्या मोठ्या आजारासाठी नागरिक डॉक्टरांच्या सल्याविना औषधोपचार घेत असतात. अनेकांना याचा लाभ होतो. मात्र काहींच्या शरीरावर औषधाचे दुष्परिणाम सुद्धा होतात. यामुळे डॉक्टरांच्या सल्याविना औषधी घेणे नागरिकांनी टाळावे. (Youth dies during treatment in wardha due to overdose of paracetamol tablets)

प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान मृत्यू

रजत मेंढे हा 29 जानेवारी रोजी रात्री कर्तव्यावर आला. सकाळी तो तेथेच झोपून होता. 30 जानेवारी रोजी सकाळी त्याने वडिलांना फोनवर संपर्क साधत प्रकृती बिघडली असल्याची माहिती दिली. वडिलांनी वर्ध्यात येत त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेले. सेवाग्राम रुग्णालयात रजतवर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी विचारपूस केली असता, त्याने पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले. सेवाग्राम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, 9 मार्च रोजी रजतचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरूवातीला सेवाग्राम पोलिसांत नोंद करण्यात आली. त्यानंतर प्रकरण आज वर्धा पोलिसांकडे आज वर्ग करण्यात आले.

बीडमध्ये उभ्या असलेल्या एसटीमध्ये वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला

बीड आगारात उभ्या असलेल्या एसटी बसमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. मागील चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या दरम्यान उभ्या एसटीमध्ये वयोवृद्ध व्यक्तीचा नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास सुरू केला आहे. सदर व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून अद्याप ओळख पटलेली नाही. (Youth dies during treatment in wardha due to overdose of paracetamol tablets)

इतर बातम्या

Breaking : बीडमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, तलवारीने वार, पती-पत्नी जखमी

Washim Accident : वाशिममध्ये कार व दुचाकीच्या अपघातात दोन जण जागीच ठार

Non Stop LIVE Update
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.