Washim Accident | 2 मैत्रिणी, 3 मित्र धरण पाहायला गेले, पाय घसरून पडल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू, वाशिममधील अडाण धरणातील घटना

अडाण धरणात पाणी आहे. या पाण्याला स्पर्श करण्याचा मोह या मुलांना आवरता आला नाही. डोहात तिचा पाय घसरला. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तिची मैत्रीणही पाण्यात पडली. तिच्या मैत्रिणीला पाण्याबाहेर काढता आले. पण, ईश्वरी खोल पाण्यात गेली. मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर काही जण तिला वाचविण्यासाठी पाण्यात शिरले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता.

Washim Accident | 2 मैत्रिणी, 3 मित्र धरण पाहायला गेले, पाय घसरून पडल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू, वाशिममधील अडाण धरणातील घटना
पाय घसरून पडल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 4:17 PM

वाशिम : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अडाण धरणाच्या पायथ्याशी असलेल्या धोकादायक डोहामध्ये (Doh) मुलगी पाय घसरून पडली. त्यामुळं एका 17 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 10 च्या दरम्यान घडली. मृतक मुलीचं नांव ईश्वरी गजानन भागवत (Ishwari Bhagwat) आहे. ती अमरावतीच्या तिवसा (Tivasa) येथील राहणारी होती. ईश्वरी भागवत ही तिची कारंजा येथील एक मैत्रीण व तीन मित्र असे 5 जण आज सकाळी अडाण धरण पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान ईश्वरी भागवत धोकादायक डोहात पाय घसरून पडली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या मैत्रिणीला वाचविण्यात यश आले. मात्र ईश्वरीचा मृत्यू झाला. घटनेनंतर ईश्वरीचा मृतदेह काढून कारंजा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहेत.

अमरावतीची मुलं वाशिमला गेली

ईश्वरी व तिची एक मैत्रीण तसेच तीन मित्रांनी एक प्लान केला. ईश्वरी व तिची मैत्रीण व मित्र अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील राहणारे. त्यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील अडाण धरण पाहण्याचे ठरविले. त्यासाठी ते सकाळीच धरणावर गेले. धरणातील पाण्याची स्पर्श करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. पाण्याशी खेळत असताना ईश्वरीचा तोल गेला. ती धरणात घसरून पडली. त्यानंतर तिला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, त्यात कुणीही यशस्वी होऊ शकले नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं सर्व घोळ झाला.

नेमकं काय घडलं

अडाण धरणात पाणी आहे. या पाण्याला स्पर्श करण्याचा मोह या मुलांना आवरता आला नाही. डोहात तिचा पाय घसरला. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तिची मैत्रीणही पाण्यात पडली. तिच्या मैत्रिणीला पाण्याबाहेर काढता आले. पण, ईश्वरी खोल पाण्यात गेली. मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर काही जण तिला वाचविण्यासाठी पाण्यात शिरले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. ईश्वरीच्या शरीरात पाणी गेलं होतं. तिला बाहेर काढून तिच्या पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तोपर्यंत ईश्वरीचा जीव गेला होता.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.