वाशिम : देशात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) पाय पसरवण्यास सुरूवात केलीयं. राज्यातही सातत्याने कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण हे मुंबईत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाशिम Washim) जिल्हात देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसतयं. वाशिममध्ये काल दिवसभरात 83 नवीन कोरोना रूग्णांची (Patient) नोंद करण्यात आलीयं. मागील साडेतीन महिन्यात काल पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णाची वाढ झाल्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 46 हजार बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 45 हजार 206 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 641 जणांचा मृत्यू झाला आहे.
आता जिल्ह्यात 157 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल 83 नव्याने कोरोना बाधीत रूग्णांची नोंद करण्यात आलीयं. तर 10 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आलायं. जिल्हात मंगरुळपीर शहर 11, पारवा 1, जांब 1, मंगळसा 1, शेलगाव 1,अरक 1 ,चिखली 2, ईचा 1,पिंप्री 1,नागी 1,लाठी 1,जनुना 1,कासोळा 3, धानोरा 1, मालेगाव शहर 2, कारंजा सिंधी कॅम्प 1, शिवाजी फैल 1,दाफणीपुरा 1,महागाव 1,गवळीपुरा 7,दापुरा 1,वाघोळा 1, राहुल नगर 1, शीवन 2,कामरगाव 14,लाडेगाव 1,लक्ष्मीनगर 1,मोरद 1,साळीपुरा 1, तोरणाळा 1,अनई 1,कागजीपुरा 1,बिबीसापुरा 1,वलई 1,गौतमनगर 1,मंगळवारा 1,कोळी 1,धामणीखाडी 1,वाढवी 1,वडगाव 1,शाहा 1,उंबर्डा 1,बेंबळा 1,जानोरी 1 जिल्ह्याबाहेरील 2 बाधीतांची नोंद झाली आहे.
वाशिम जिल्हातील कोरोनाची परिस्थिती एकूण पॉझिटिव्ह – 46003, ऍक्टिव्ह 157, डिस्चार्ज – 45206, मृत्यू – 641 जिल्हामध्ये काही महिन्यांपूर्वी कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसल्यास लगेचच डाॅक्टरांशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरिकांना केले जात आहे. तसेच कोरोना रूग्णसंख्या रोखण्यासाठी महत्वाची पाऊले उचलली जात असल्याचे देखील चित्र आहे.