Sameer Wankhede : समीर वानखेडे वाशिम न्यायालयात, नवाब मलिक खटल्यात प्रतिज्ञा पत्र सादर, 17 सप्टेंबरला होणार सुनावणी

विठ्ठल देशमुख

विठ्ठल देशमुख | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Aug 25, 2022 | 11:25 PM

याकरिता समीर वानखेडे यांच्याकडून प्रतिज्ञा पत्र घेतले. ते आज वाशिम न्यायालयात सादर केले. अशी माहिती समीर वानखेडे आणि त्यांचे वकील अॅड. उदय देशमुख यांनी दिली. या प्रकरणी आता 17 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

Sameer Wankhede : समीर वानखेडे वाशिम न्यायालयात, नवाब मलिक खटल्यात प्रतिज्ञा पत्र सादर, 17 सप्टेंबरला होणार सुनावणी
समीर वानखेडे वाशिम न्यायालयात, नवाब मलिक खटल्यात प्रतिज्ञा पत्र सादर

वाशिम : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे हे वाशिम येथे आले होते. यावेळी बोलताना समीर वानखेडे म्हणाले, खालच्या पातळीवर माझ्या कुटुंबावर टीका करीत आरोप लावण्यात आले आहेत. कुटुंबाची बदनामी करण्यात आली होती. यासंदर्भात 14 ऑगस्ट रोजी गोरेगाव पोलीस (Goregaon Police) स्टेशनला नवाब मलिक विरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार तक्रार दिली होती. माझे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी सुद्धा वाशिम न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या खटल्यात मी आज प्रतिज्ञा (affidavit) पत्र दाखल करण्याकरिता वाशिम येथे आलो आहे. माझा न्यायालयावर (Washim court) पूर्ण विश्वास आहे. नक्कीच मला न्याय मिळेल असे एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे हे वाशिम येथे आले असता बोलत होते.

जातिवाचक बदनामी केली होती

नवाब मलिक यांच्या जावई यांना समीर वानखेडे यांनी आपले कर्तव्य बजवताना एका प्रकरणात अटक केली. त्याचा द्वेष दाखवण्यासाठी समीर वानखेडे हे मुसलमान आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे आहे असे जातिवाचक प्रक्षोभनं केली. यामुळे सर्व कुटुंबावर भय निर्माण झाले होते. याची संपूर्ण चौकशी व्हावी याकरिता आम्ही वाशिम न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांना वाशिम न्यायालयात हजर करण्याची मागणी आम्ही केली होती. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबद्दल वापरलेले अपशब्द हे त्यांचे भाऊ संजय वानखेडे यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबाला लागू होते. याकरिता समीर वानखेडे यांच्याकडून प्रतिज्ञा पत्र घेतले. ते आज वाशिम न्यायालयात सादर केले. अशी माहिती समीर वानखेडे आणि त्यांचे वकील अॅड. उदय देशमुख यांनी दिली. या प्रकरणी आता 17 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI